एक्स्प्लोर

Mumbai Mayor BMC Election 2026: मुंबईच्या महापौरपदाबाबत अजिबात तडजोड करु नका, देवेंद्र फडणवीसांना दिल्लीतून आदेश आला, शिंदे सेनेच्या आकांक्षांना सुरुंग लागणार?

Mumbai Mayor BMC Election 2026: भाजपने यंदा मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुकीत 89 जागा जिंकल्या आहेत. यंदा भाजपची मुंबईत महापौर बसवण्याची इच्छा पूर्ण होणार आहे.

Mumbai Mayor BMC Election 2026: पहिल्यांदाच बृहन्मुंबई महानगरपालिकेची निवडणूक जिंकून मुंबई काबीज करणाऱ्या भाजपसमोर महापौरपदावरुन नवी डोकेदुखी उभी राहिली आहे. यंदा भाजपने कोणत्याही परिस्थितीत आपल्या पक्षाचा महापौर मुंबई महानगरपालिकेत बसवायचाच, असा चंग बांधला होता. मात्र, भाजपला (BJP) निवडणुकीत 89 जागाच जिंकता आल्या. त्यामुळे 114  हा बहुमताचा आकडा गाठण्यासाठी भाजपला एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांच्या शिवसेनेच्या 29 नगरसेवकांची गरज लागणार आहे. भाजपची हीच अडचण ओळखून एकनाथ शिंदे यांनी मुंबई महानगरपालिकेचे महापौरपद पहिल्या अडीच वर्षांसाठी आपल्याला मिळावे आणि स्थायी व इतर समित्यांमध्ये योग्य वाटा मिळावा, अशी भूमिका घेतली होती. त्यामुळे भाजप आणि शिंदे सेनेत तणाव निर्माण झाला असतानाच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांना दिल्लीतील पक्षश्रेष्ठींनी महत्त्वाचा संदेश पाठवला आहे. त्यानुसार भाजप मुंबईच्या महापौरपदाबाबत कोणतीही तडजोड करायला तयार नाही. 

मुंबई महानगरपालिकेत भाजपने अधिक जागा जिंकल्या असून भाजप हा सर्वात मोठा पक्ष ठरला आहे. त्यामुळे मुंबईच्या महापौरपदावर आपलाच हक्क असल्याचे मित्रपक्षांना सांगा, असा स्पष्ट संदेश भाजपच्या दिल्लीतील नेतृत्त्वाने देवेंद्र फडणवीस यांना दिल्याची माहिती विश्वसनीय सूत्रांनी दिली आहे. भाजपला मोठ्या प्रतीक्षेनंतर मुंबई महानगरपालिकेत इतके निर्णायक आणि मोठे यश मिळाले आहे. त्यामुळे महापौरपदावर भाजपचाच हक्क कसा आहे, ही भूमिका मित्रपक्ष असलेल्या शिवसेनेसमोर मांडा. मात्र, हे करताना कोणतीही कटुता येणार नाही, याचीही दक्षता घ्या, असे भाजपच्या पक्षनेतृत्त्वाने देवेंद्र फडणवीस यांना कळवल्याची माहिती आहे.

मुंबई महापौरपद आपल्याकडेच यायला हवे, ही भाजपच्या हजारो कार्यकर्त्यांची भावना आहे. या भावनेचा सन्मान केला पाहिजे. ही गोष्ट शिंदे सेना आणि अजित पवार यांच्या राष्ट्रवादीला पटवून द्या. याशिवाय, मुंबई महानगरपालिकेतील अन्य पदे आणि अन्य महानगरपालिकांमध्ये शिंदे गट आणि राष्ट्रवादीशी चर्चा करुन सन्मानजनक तोडगा काढा, असेही भाजपच्या नेतृत्त्वाने देवेंद्र फडणवीसांना सांगितले आहे. 

Mumbai Election Results 2026: मुंबईत कोणत्या पक्षाल किती जागा मिळाल्या?

भाजप- 89
ठाकरे गट- 65
शिवसेना- 29
काँग्रेस- 24
एमआयएम-8
मनसे- 6
राष्ट्रवादी काँग्रेस- 3
समाजवादी पार्टी- 2
शरद पवार गट-1

Mumbai News: मुंबईत कोणत्या पक्षाला किती टक्के मतं मिळाली?

भाजप- 21.2 टक्के
ठाकरे गट- 13.13 टक्के
शिवसेना- 5 टक्के
काँग्रेस- 4.44 टक्के
एमआयएम-1.25 टक्के
मनसे- 1.37 टक्के
राष्ट्रवादी काँग्रेस- 0.45 टक्के
सपा- 0.28 टक्के
शरद पवार गट- 0.22 टक्के

आणखी वाचा

मुंबईच्या महापौरपदाच्या आरक्षणाच्या सोडतीमधील 'तो' नियम ठरणार महत्त्वाचा, भाजपला फटका बसण्याची शक्यता; उद्धव ठाकरेंचं वक्तव्य जाणीवपूर्वक?

Covers Business, Environment and climate change, Health, Science & tech and Policies! Believes in strength of quill!
Read More

महत्त्वाच्या बातम्या

Satej Patil: महायुतीच्या भांडणात गोकुळ अडचणीत, दररोज उठून डेऱ्यांना कोर्टात जावं लागत आहे; सतेज पाटलांचा हल्लाबोल, धनंजय महाडिकांना सुद्धा खोचक टोला
महायुतीच्या भांडणात गोकुळ अडचणीत, दररोज उठून डेऱ्यांना कोर्टात जावं लागत आहे; सतेज पाटलांचा हल्लाबोल, धनंजय महाडिकांना सुद्धा खोचक टोला
Sanjay Raut: 'भाजपत गेल्या 10 वर्षात नव्हती ती बंडाळी, मंत्रिमंडळात चार प्रमुख मंत्र्यांनी राजीनामा द्यायला नकार दिलाय, हेच मोदी जुने असते तर....' संजय राऊतांचा मोठा दावा
'भाजपत गेल्या 10 वर्षात नव्हती ती बंडाळी, मंत्रिमंडळात चार प्रमुख मंत्र्यांनी राजीनामा द्यायला नकार दिलाय, हेच मोदी जुने असते तर....' संजय राऊतांचा मोठा दावा
Ambernath BJP vs Shiv Sena: 'नगराध्यक्षांना टार्गेट कराल तर कल्याण-डोंबिवलीसारखी परिस्थिती होईल'; अंबरनाथ नगरपालिकेत भाजप-शिवसेनेत जुंपली; नेमकं काय घडलं?
'नगराध्यक्षांना टार्गेट कराल तर कल्याण-डोंबिवलीसारखी परिस्थिती होईल'; अंबरनाथ नगरपालिकेत भाजप-शिवसेनेत जुंपली; नेमकं काय घडलं?
Manoj Jarange : मराठ्यांवर किती जळणार? ओबीसींच्या नावावर सगळं खाल्लं, महाराष्ट्र सदनही सोडलं नाही; जरांगेंची भुजबळांवर टीका
मराठ्यांवर किती जळणार? ओबीसींच्या नावावर सगळं खाल्लं, महाराष्ट्र सदनही सोडलं नाही; जरांगेंची भुजबळांवर टीका

व्हिडीओ

Majha Infra Vision Siddhesh Kadam Manisha Khatri : 'डीजे' ते कुंभमेळा, शाश्वत विकासाचा रोड मॅप
Devendra Fadnavis Majha Infra Vision : CM फडणवीसांनी माझा इन्फ्रा व्हिजनमध्ये मांडला विकासाचा रोडमॅप
Majha Infra Vision Eknath Shinde : समृद्धी, कोस्टल, जरांगे ते DJ; एकनाथ शिंदेंचं माझा इन्फ्रा व्हिजन
Majha Infra Vision Mahendra Kalyankar: धारावीमधील झोपडपट्टी धारकांना 350 चौरस फूट घरे मोफत; महेंद्र कल्याणकर काय म्हणाले?
Majha Infra Vision Nitesh Rane: जिहादमुक्त किनारपट्टी, वाढवण बंदर, दिशा सालियान; नितेश राणे UNCUT

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
काॅकरोच पार्टीचे दिल्लीत 3 तास धरणे आंदोलन, सीजेपी कार्यकर्तीच्या वडिलांना अमानुष मारहाण, आरोपी स्वत: पाॅडकास्टमध्ये म्हणाला, मी त्यांच्या डोक्यात हल्ला केला, 60 टाके पडलेत, पण जेलमध्ये गेलो नाही
काॅकरोच पार्टीचे दिल्लीत 3 तास धरणे आंदोलन, सीजेपी कार्यकर्तीच्या वडिलांना अमानुष मारहाण, आरोपी स्वत: पाॅडकास्टमध्ये म्हणाला, मी त्यांच्या डोक्यात हल्ला केला, 60 टाके पडलेत, पण जेलमध्ये गेलो नाही
Satej Patil: महायुतीच्या भांडणात गोकुळ अडचणीत, दररोज उठून डेऱ्यांना कोर्टात जावं लागत आहे; सतेज पाटलांचा हल्लाबोल, धनंजय महाडिकांना सुद्धा खोचक टोला
महायुतीच्या भांडणात गोकुळ अडचणीत, दररोज उठून डेऱ्यांना कोर्टात जावं लागत आहे; सतेज पाटलांचा हल्लाबोल, धनंजय महाडिकांना सुद्धा खोचक टोला
Sanjay Raut: 'भाजपत गेल्या 10 वर्षात नव्हती ती बंडाळी, मंत्रिमंडळात चार प्रमुख मंत्र्यांनी राजीनामा द्यायला नकार दिलाय, हेच मोदी जुने असते तर....' संजय राऊतांचा मोठा दावा
'भाजपत गेल्या 10 वर्षात नव्हती ती बंडाळी, मंत्रिमंडळात चार प्रमुख मंत्र्यांनी राजीनामा द्यायला नकार दिलाय, हेच मोदी जुने असते तर....' संजय राऊतांचा मोठा दावा
Vidyanand Bapat : विद्यानंद बापट नास्तिक कधी बनले? कोणत्या लेखकांच्या पुस्तकांचा प्रभाव? विद्यानंद बापट यांनी कॉफी विथ कौशिक कार्यक्रमात नास्तिक होण्याचा प्रवास मांडला...
विद्यानंद बापट नास्तिक कधी बनले? कोणत्या लेखकांचा प्रभाव? नास्तिक होण्याचा प्रवास सांगत म्हणाले...
Wrestler Ashwini Mohite Paul : लग्न झाल्यानंतर त्रास सुरू झाला; नवरा पगार घ्यायचा, ते मटण खायचे अन् मुलीला उष्ट अन्न द्यायचे, धाराशिवच्या कुस्तीपटू अश्विनीच्या वडिलांनी सांगितली आपबिती
लग्न झाल्यानंतर त्रास सुरू झाला; नवरा पगार घ्यायचा, ते मटण खायचे अन् मुलीला उष्ट अन्न द्यायचे, धाराशिवच्या कुस्तीपटू अश्विनीच्या वडिलांनी सांगितली आपबिती
Vidyanand Bapat: भावना दुखावल्याच्या प्रकरणी बापटांविरोधात गणेश मंडळे तक्रार दाखल करणार; विद्यानंद बापट म्हणाले, भावना म्हणजे छाती, डोकं नाही दुखायला!
भावना दुखावल्याच्या प्रकरणी बापटांविरोधात गणेश मंडळे तक्रार दाखल करणार; विद्यानंद बापट म्हणाले, भावना म्हणजे छाती, डोकं नाही दुखायला!
Swatantra Bhardwaj : स्वतंत्र भारद्वाज पोलिसांच्या ताब्यात, दिल्ली पोलिसांची उत्तर प्रदेशच्या बुलंदशहरमध्ये कारवाई,राजधानीत वेगवान घडामोडी, नेमकं प्रकरण काय?
स्वतंत्र भारद्वाज पोलिसांच्या ताब्यात, दिल्ली पोलिसांची उत्तर प्रदेशच्या बुलंदशहरमध्ये कारवाई
ताप आल्यानंतर रुग्णालयात दाखल केलं, प्रकृती खालावली अन्...; नाशिकच्या आश्रम शाळेत शिकणाऱ्या आठ वर्षीय चिमुकलीचा दुर्दैवी अंत
ताप आल्यानंतर रुग्णालयात दाखल केलं, प्रकृती खालावली अन्...; नाशिकच्या आश्रम शाळेत शिकणाऱ्या आठ वर्षीय चिमुकलीचा दुर्दैवी अंत
Embed widget