News
News
टीव्हीabp shortsABP शॉर्ट्सव्हिडीओ पॉडकास्ट
X

दोनशेच्या नोटेसाठी ATM रिकॅलिब्रेशनचे आदेश, बँकांना खर्च....

दोनशेची नोट एटीएममधून वितरित व्हावी, यासाठी एटीएम रिकॅलिब्रेट करावी लागणार आहेत.

FOLLOW US: 
Share:
मुंबई: नोटाबंदीनंतर दोन हजाराच्या नोटेसाठी केलेल्या रिकॅलिब्रेशननंतर, आता पुन्हा एकदा बँकांना आपली एटीएम रिकॅलिब्रेट अर्थात करावी लागणार आहेत. दोनशेची नोट एटीएममधून वितरित व्हावी, यासाठी एटीएम रिकॅलिब्रेट करावी लागणार आहेत. भारतीय रिझर्व्ह बँकेने तसे आदेश बँकांना दिले आहेत. पण या रिकॅलिब्रेशनसाठी बँकांना थोडाथोडका नव्हे तर तब्बल 1 हजार कोटी रुपये खर्च येणार आहे. जवळपास 2 लाख 20 हजार एटीएम रिकॅलिब्रेट करण्यासाठी 5 ते 6 महिने लागू शकतात. नोटाबंदी, थकीत कर्ज या आणि अन्य कारणांमुळे बँका आधीच अडचणीत असल्याचं सांगत आहेत. त्यात एटीएम रिकॅलिब्रेट करण्याचा खर्च बँकांना करावा लागणार आहे. सध्या एटीएममध्ये 100, 500 आणि 2 हजार रुपयांच्या नोटा मिळतात. मात्र नोटाबंदीनंतर दोनशेची नवी नोट बाजारात आली. या नोटेच्या रचनेमुळे ती नोट एटीएममध्ये मिळत नाही. ती केवळ बँकेतच मिळते. त्यामुळे ही नोटही एटीएममधून मिळावी, यासाठी एटीएमच्या रचनेत बदल करण्याचे आदेश आरबीआयने दिले आहेत. दोन हजारऐवजी छोट्या-छोट्या नोटा चलनात आणण्याचा बँकांचा उद्देश आहे. त्यासाठीच आरबीआय हे पाऊल उचलत आहे.  दरम्यान, एटीएम रिकॅलिब्रेट करण्यासाठी बँकांना किमान 5 ते 6 महिन्यांचा कालावधी लागू शकतो. नोटाबंदीनंतर एटीएममध्ये दोन हजारांच्या नोटा उपलब्ध झाल्याने, एटीएममधून पैसे काढण्याचं प्रमाण वाढलं आहे. दोनशेच्या नोटा एटीएममध्ये उपलब्ध झाल्याने ते प्रमाण कमी होईल, असा विश्वास आरबीआयला आहे. संबंधित बातम्या दोनशे रुपयांची नोट लवकरच चलनात, केंद्राची अधिसूचना 200 रुपयांची नोट चलनात आणण्याची तारीख ठरली!
Published at : 04 Jan 2018 08:33 AM (IST) Tags: RBI आरबीआय bank ATM एटीएम बँक

आणखी महत्वाच्या बातम्या

Video: रोहित पवार लवकरच सत्तेत सहभागी होतील; अजित पवारांच्या आमदाराचा मोठा दावा, अधिवेशनात चर्चा

Video: रोहित पवार लवकरच सत्तेत सहभागी होतील; अजित पवारांच्या आमदाराचा मोठा दावा, अधिवेशनात चर्चा

तिरुपतीप्रमाणेच पंढरीच्या विठुरायाचे टोकन दर्शन; आषाढी एकादशीला मुख्यमंत्र्यांचे हस्ते पहिले पूजन

तिरुपतीप्रमाणेच पंढरीच्या विठुरायाचे टोकन दर्शन; आषाढी एकादशीला मुख्यमंत्र्यांचे हस्ते पहिले पूजन

मोठी बातमी ! गोपीचंद पडळकरांसह विधानपरिषदेच्या 5 रिक्त जागेवर निवडणूक कार्यक्रम जाहीर; मतदानाची तारीख ठरली

मोठी बातमी ! गोपीचंद पडळकरांसह विधानपरिषदेच्या 5 रिक्त जागेवर निवडणूक कार्यक्रम जाहीर; मतदानाची तारीख ठरली

Video: धनंजय मुंडेंच्या राजीनाम्याबाबत करुणा शर्मांची अंदर की बात; राष्ट्रवादीत गेल्यानेच माझ्या पतीचं वाटोळं झालं

Video: धनंजय मुंडेंच्या राजीनाम्याबाबत करुणा शर्मांची अंदर की बात; राष्ट्रवादीत गेल्यानेच माझ्या पतीचं वाटोळं झालं

Abu Azmi: औरंगजेब उत्तम प्रशासक, त्याच्या काळात भारताचा जीडीपी 24 टक्के अन् बॉर्डर अफगाणिस्तानापर्यंत पसरली होती: अबू आझमी

Abu Azmi: औरंगजेब उत्तम प्रशासक, त्याच्या काळात भारताचा जीडीपी 24 टक्के अन् बॉर्डर अफगाणिस्तानापर्यंत पसरली होती: अबू आझमी

टॉप न्यूज़

Accident News: ट्रक व दुचाकी यांच्यात समोरासमोर धडक; दुचाकीवरील दोन मुलांचा दुर्दैवी अंत, सांगोला महामार्गावरील भीषण दुर्घटना 

Accident News: ट्रक व दुचाकी यांच्यात समोरासमोर धडक; दुचाकीवरील दोन मुलांचा दुर्दैवी अंत, सांगोला महामार्गावरील भीषण दुर्घटना 

दत्ता गाडेच्या विचित्र आरोपामुळे पीडिता तणावात, वसंत मोरेंची भेट घेऊन सगळं सांगितलं; स्वागरेटमध्ये पहाटे नेमकं काय घडलं?

दत्ता गाडेच्या विचित्र आरोपामुळे पीडिता तणावात, वसंत मोरेंची भेट घेऊन सगळं सांगितलं; स्वागरेटमध्ये पहाटे नेमकं काय घडलं?

धक्कादायक! तब्बल 69 ATM कार्डसह पकडला चोरटा; चिकट पदार्थ टाकून पैसे काढण्याचं टेक्निक

धक्कादायक! तब्बल 69 ATM कार्डसह पकडला चोरटा; चिकट पदार्थ टाकून पैसे काढण्याचं टेक्निक

Mahadev Munde : मुंबईत अधिवेशन सुरू अन् बीडमध्ये महादेव मुंडेंच्या पत्नीचं आमरण उपोषण स्थगित; पोलिसांना एक महिन्याचा अल्टीमेटम

Mahadev Munde : मुंबईत अधिवेशन सुरू अन् बीडमध्ये महादेव मुंडेंच्या पत्नीचं आमरण उपोषण स्थगित; पोलिसांना एक महिन्याचा अल्टीमेटम