एक्स्प्लोर
भोसरी एमआयडीसी प्रकरणावरून एकनाथ खडसेंचा सरकारला घरचा आहेर
प्रकाश मेहता आणि सुभाष देसाईंवर कारवाईसाठी टाळाटाळ करणाऱ्या मुख्यमंत्र्यांना माजी महसूल मंत्री एकनाथ खडसेंनी विधानसभेत चांगलंच कोंडीत पकडलं. भोसरी एमआयडीसी प्रकरणावरुन खडसेंचे सरकारला शाल जोडे मारत, भोसरी एमआयडीसीतली 3 एकर जमीन मोकळी करुन देणार का? असा प्रश्न उपस्थित विचारला. खडसेंच्या या प्रश्नामुळे मुख्यमंत्र्यांची चांगलीच पंचाईत झाल्याचं पाहायला मिळालं.
![भोसरी एमआयडीसी प्रकरणावरून एकनाथ खडसेंचा सरकारला घरचा आहेर The Question Of The Eknath Khadse To State Government On Bhosari Midc Issue भोसरी एमआयडीसी प्रकरणावरून एकनाथ खडसेंचा सरकारला घरचा आहेर](https://static.abplive.com/wp-content/uploads/sites/4/2017/08/11235007/khadse-.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=1200&height=675)
मुंबई : प्रकाश मेहता आणि सुभाष देसाईंवर कारवाईसाठी टाळाटाळ करणाऱ्या मुख्यमंत्र्यांना माजी महसूल मंत्री एकनाथ खडसेंनी विधानसभेत चांगलंच कोंडीत पकडलं. भोसरी एमआयडीसी प्रकरणावरुन खडसेंचे सरकारला शाल जोडे मारत, भोसरी एमआयडीसीतली 3 एकर जमीन मोकळी करुन देणार का? असा प्रश्न उपस्थित विचारला. खडसेंच्या या प्रश्नामुळे मुख्यमंत्र्यांची चांगलीच पंचाईत झाल्याचं पाहायला मिळालं.
नाशिक जिल्ह्यातील इगतपुरीत मॅग्नेटिक महाराष्ट्रासाठी 600 एकर जमीन संपादित करण्यात आली. मात्र, शिवसेनेच्या जवळच्या बिल्डरला फायदा मिळावा, यासाठी यातली 400 एकर जमीन देसाईंनी आरक्षित भूखंडातून वगळल्याचा आरोप विरोधकांनी सुभाष देसाईंवर केला आहे.
यावरुनच खडसेंनी हरकतीच्या मुद्द्याद्वारे मुख्यमंत्र्यांवर निशाणा साधला. भोसरी एमआयडीसी जमीनीचा उल्लेख करुन खडसे म्हणाले की, ''1967 साली भोसरी एमआयडीसीनं काही एकर जमीन वेस्ट म्हणून घोषित केली. त्यानंतर त्याच्या खरेदी व्यवहारात माझा कोणताही सहभाग नसताना, माझ्यावर कारवाई करण्यात आली. आणि ती जागा मोकळी केल्याचं विधानसभेला सांगितलं होतं. पण सध्या राज्य सरकार इतकंच उदार झालं असेल, तर मग 50 वर्षांपूर्वीची भोसरी प्रकरणातील 3 एकर जमीन आरक्षित भूखंडातून वगळणार का?''
खडसेंच्या या प्रश्नावरुन मुख्यमंत्र्यांची चांगलीच पंचाईत झाली होती. मुख्यमंत्र्यांनी यावर सावध पवित्रा घेत, खडसेंची मागणी निश्चित तपासून पाहिली जाईल, आणि त्यात तथ्य असेल, तर त्यावर कायदेशीर निर्णय घेतला जाईल, असं सांगितलं.
काय म्हणाले एकनाथ खडसे?
संबंधित बातम्या
आता सुभाष देसाईंच्या राजीनाम्याची मागणी
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
क्रिकेट
पुणे
क्रिकेट
क्रिकेट
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-mid.png)