मुंबईतील उच्चभ्रू वस्तीमध्ये महागड्या सायकल चोरणाऱ्या टोळीच्या मुख्य सूत्रधाराला अटक
दादर, वरळी, माहीम, शिवाजी पार्क या परिसरा मधील उच्चभ्रू वस्तीमध्ये महागड्या सायकल चोरी करणारी टोळी कार्यरत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली.
मुंबई : हल्ली बहुतेक जण आपलं आरोग्य जपण्यासाठी आणि शारिरिकरित्या फिट राहण्यासाठी नित्यनेमाने व्यायाम करत आहेत तर काही सायकल चालवत आहेत. ज्यामुळे रस्त्यांवर सायकलीच प्रमाण वाढलं आहे, मात्र अशातच मुंबईतील उच्चभ्रू सोसायटीमध्ये महागड्या सायकल चोरणार्या एका 18 वर्षीय तरुणाला माहिती पोलिसांनी अटक केली आहे.
22 जून रोजी माहीममध्ये राहणाऱ्या एका व्यक्तीने त्यांची सायकल चोरी झाल्याची तक्रार माहीम पोलीस ठाण्यात नोंदविली होती. माहिम पोलीस ठाण्याने गुन्हा नोंदवला आणि या प्रकरणाचा तपास सुरू केला. दादर, वरळी, माहीम, शिवाजी पार्क या परिसरा मधील उच्चभ्रू वस्तीमध्ये महागड्या सायकल चोरी करणारी टोळी कार्यरत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. यानंतर सापळा रचला त्यांचे असलेलं खबरी सतर्क केले. पोलिसांच्या या प्रयत्नाला लवकरच यश आलं.
माहिम येथे नयानगरमध्ये प्रेम विजय पाटील (वय 18) हा सायकल विक्री करण्याची बोलणी करण्यासाठी येणार असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. पोलीस आणि त्यानुसार सापळा रचला. विजय पाटील त्या ठिकाणी आला आणि पोलिसांच्या तावडीत सापडला पोलिसांनी त्याला अटक करून जेव्हा चौकशी केली तेव्हा सायकल चोरी करणाऱ्या टोळीचा तो मुख्य सूत्रधार निघाला. विजय पाटील आणि त्याच्या साथीदारांवर मुंबईतील माहिम, दादर, शिवाजी पार्क,वरळी अशा विविध पोलीस स्टेशनमध्ये गुन्हे दाखल आहेत.
विजय पाटीलकडून केलेल्या चौकशीतून त्याचे अजून तीन साथीदार असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. तसेच विजय कडून 24 महागड्या सायकल ही पोलिसांनी जप्त केल्या. विजय पाटील याला 2 जुलै पर्यंत पोलिस कोठडी सुनावण्यात आली असून त्याच्या इतर तीन साथीदारांचा शोध पोलिसांकडून केला जातो.
मुंबई पोलीस उपआयुक्त परिमंडळ पाच प्रणय अशोक यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस आयुक्त माहीम विभाग अरुंधती राणी आणि वरिष्ठ पोलीस निरीक्षक विलास शिंदे, पोलीस निरीक्षक दिनेश दहातोंडे सहाय्यक पोलीस निरीक्षक प्रवीण खराडे, अतुल आव्हाड, पोलीस उपनिरीक्षक योगेश बेंडकुळे, झनक सिंग गुणावत या पथकाद्वारे ही कामगिरी बजावण्यात आली आहे.