एक्स्प्लोर
मुंबईच्या पशुवैद्यकीय कॉलेजच्या वसतिगृहात बिबट्या शिरल्यानं घबराट
मुंबई: मुंबईत पुन्हा एकदा बिबट्याचा वावर सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाला आहे. गोरेगावच्या पशुवैद्यकीय महाविद्यालयाच्या मुलींच्या हॉस्टेलच्या जिन्यावर हा बिबट्या दिसून आला आहे.
इतकंच नाही तर या हॉस्टेलच्या परिसरात असलेल्या एका कुत्र्यालाही बिबट्यानं मारल्याचं सीसीटीव्हीत दिसून आलं आहे. दरम्यान बिबट्याच्या वावरामुळे महाविद्यालयात भीतीचं वातावरण निर्माण झालं आहे.
मुंबईतील संजय गांधी उद्यान जवळच असल्यानं येथून हा बिबट्या या परिसरात आला असल्याचा अंदाज वर्तवण्यात येत आहे. दरम्यान, याबाबत वनविभागालाही कळविण्यात आलं आहे.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
नांदेड
मुंबई
निवडणूक
पुणे
Advertisement