एक्स्प्लोर
Advertisement

माझ्या हत्येचा कट रचला होता : अनिल गोटे
तसंच भाजपमध्ये नुकताच प्रवेश केलेल्या एका गुन्हेगाराने आपल्या पत्नीबद्दल अश्लाघ्य भाषेत मजकूर लिहून तो सोशल मीडियामध्ये पसरवल्याचा आरोपही गोटे यांनी केला आहे.

मुंबई : 'माझ्या हत्येचा कट रचण्यात आला होता,' असा खळबळजनक आरोप धुळ्याचे आमदार अनिल गोटे विधानसभेत केला आहे. "मोबाईल फोनवर आलेल्या एका ऑडिओ क्लिपच्या माध्यमातून माझ्या हत्येचा कट रचल्याचं समोर आलं," असं गोटे यांनी सांगितलं. तसंच भाजपमध्ये नुकताच प्रवेश केलेल्या एका गुन्हेगाराने आपल्या पत्नीबद्दल अश्लाघ्य भाषेत मजकूर लिहून तो सोशल मीडियामध्ये पसरवल्याचा आरोपही गोटे यांनी केला आहे.
अनिल गोटे म्हणाले की, "अवधान गावात भाषण करत असताना माझ्यावर देशी कट्ट्यातून नेम धरला होता, पण एका अज्ञात डॉक्टराने कट्टा हिसकावून घेतल्याने माझे प्राण वाचले, अशी कबुली वाडेकर नावाचा व्यक्ती देत असल्याचा उल्लेख ऑडिओ क्लिपमध्ये आहे. स्थानिक भाजप आमदारानेच हत्येचा कट रचला होता. याबाबत धुळेच्या पोलीस अधीक्षकांना पत्र पाठवूनही अद्याप कारवाई झालेली नाही."
"महाराष्ट्र वेगाने गुन्हेगारीकडे वळत आहे. इथे आमदार सुरक्षित नसेल, त्याच्या पत्नीबद्दल अश्लाघ्य मजकूर व्हायरल करणाऱ्याला जामीन मिळात असेल तर इतरांचं काय होणार?" असा सवालही गोटे यांनी उपस्थित केला.
तसंच भाजपमध्ये गुन्हेगारांच्या वाढत्या प्रवेशावर बोलताना गोटे यांनी सरकारला घरचा आहेर दिला. गोटे म्हणाले की, "भाजपचे 62 पैकी 57 उमेदवार दुसऱ्या पक्षातून आले आहेत. 57 पैकी 28 हे सराईत गुन्हेगार आहेत. त्यांच्यावर खून, अपहरणासारखे गुन्हे आहेत."

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
फॅक्ट चेक
शेत-शिवार
पुणे
महाराष्ट्र
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
