एक्स्प्लोर
ठाण्यात महिलेचा पाय गटाराच्या लोखंडी जाळीत अडकला!
ठाणे शहरातील फूटपाथ, नाल्यावर लावलेल्या लोखंडी आणि जाळ्याच्या चेंबरची दूरवस्था झाली आहे. चेंबरची झाकणं बदला असा नागरिकांचा आक्रोश असतानाही पालिका प्रशासन मात्र ढीम्म असल्याचं चित्र आहे.
ठाणे : ठाण्यात रस्त्यावरुन चालणाऱ्या एका महिलेचा पाय गटारावर लावलेल्या लोखंडी जाळीत अडकल्याची घटना घडली. राममारुती रोडवर ही घटना घडली. जयश्री मधुकर रेमाडे असं या 54 वर्षीय महिलेचं नाव आहे.
बराच प्रयत्न करुनही जाळीतून पाय काढणं शक्य न झाल्याने शेवटी अग्निशमन दलाला पाचारण करावं लागलं. शेवटी तासाभरानंतर अग्निशमन दलाने जयश्री रेमाडेंचा पाय जाळीतून यशस्वीपणे सोडवला आणि त्यांना हॉस्पिटलमध्ये दाखल केलं.
ठाणे शहरातील फूटपाथ, नाल्यावर लावलेल्या लोखंडी आणि जाळ्याच्या चेंबरची दूरवस्था झाली आहे. चेंबरची झाकणं बदला असा नागरिकांचा आक्रोश असतानाही पालिका प्रशासन मात्र ढीम्म असल्याचं चित्र आहे. परिणामी संध्याकाळी ठाण्यातील राममारुती रोडवर पायी जाणाऱ्या 54 वर्षीय जयश्री मधुकर रेमाडे यांचा पाय ड्रेनेजेच्या चेंबरमध्ये पाय अडकला.
रेमाडे यांचा गुडघ्यापर्यंत पाय अडकल्याने त्या जखमी झाल्या. या घटनेनंतर वाहतूक ठप्प झाली तर बघ्यांची एकच गर्दी उसळली होती. अखेर पालिका आपत्ती व्यवस्थापन आणि अग्निशमन दलाच्या साहाय्याने महिलेची सुटका केली. त्यांना उपचारासाठी खाजगी रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे.
रस्त्यावरील चेंबरची झाकणं कुचकामी झाल्याचं आणि ती बदलण्याची मागणी तसंच तक्रारी करण्यात आल्या होत्या. मात्र गटारांची झाकणं बदलली नाहीत. या ठिकाणी वारंवार घटना घडत आहेत. काही दिवसांपूर्वी एका मुलीचा पायही अडकल्याचं स्थानिक नागरिकांनी सांगितलं.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
निवडणूक
पुणे
विश्व
छत्रपती संभाजी नगर
Advertisement