एक्स्प्लोर
ठाण्यातील चेकमेटवरील दरोड्या प्रकरणी सात संशयित ताब्यात
ठाणे : मंगळवारी ठाण्यात पडलेल्या दरोड्याप्रकरणी सात जणांना ताब्यात घेण्यात आलं आहे. यापैकी काही जणांना नाशिकमधून चौकशीसाठी ताब्यात घेतलं गेलंय.
बँकांमध्ये पैसे पुरवणाऱ्या चेकमेट प्रायव्हेट सर्विसेस या कंपनीवर मंगळवारी पहाटे सशस्त्र दरोडा पडला होता. तीन हात नाका परिसरात पहाटे 4 वाजता ही घटना घडली. या दरोड्यात 5 ते 6 कोटी रुपये लुटले गेल्याची माहिती आहे.
ठाण्यात बँकांत पैसे भरणाऱ्या कंपनीवर दरोडा, 12 कोटींची लूट
7 ते 8 इसमांनी चाकू, चॉपर, बंदुकीचा धाक दाखवून लूट केल्याची माहिती आहे. इतकंच नाही तर चोरट्यांनी सीसीटीव्हीसह पोबारा केला आहे. हा प्रकार घडला तेव्हा कंपनीत दोन सुरक्षा कर्मचारी हजर होते. ठाणे मेंटल हॉस्पिटल रोड जवळ एका सोसायटीत या कंपनीचं कार्यालय आहे. स्टँडर्ड चार्टर्ड, आयसीआयसीआय, येस बँक सारख्या नामवंत बँकांसाठी ही कंपनी काम करते.अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
मुंबई
निवडणूक
पुणे
विश्व
Advertisement