एक्स्प्लोर

व्वा रे पठ्ठे! सरपंच सकाळी शिवसेनेत, दुपारी राष्ट्रवादीत, संध्याकाळी भाजपात, मुरबाडमधील प्रकार

ग्रामपंचायत निवडणुकांच्या निकालानंतर 'हा सरपंच आमचाच' अशा दाव्यांची मोठी मालिकाच ठाणे जिल्ह्यात पहायला मिळते आहे. मात्र हे दावे करण्यासाठी निवडून आलेल्या सरपंच आणि उपसरपंचांची कशी पळवापळव होते याचे बोलके चित्र मुरबाड तालुक्यात पाहायला मिळते आहे.

कल्याण : राजकारणात कोण कधी कोणत्या पक्षात जाईल याचा नेम नाही. असाच काहीसा प्रकार मुरबाड तालुक्यातील भुवन ग्रामपंचायतीच्या सरपंच पदाच्या निवडीनंतर पाहायला मिळाला. दुपारच्या सुमारास भुवन ग्रामपंचायतीतील निवनियुक्त सरपंच, उपसरपंच कुटुंबासह राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या प्रमोद हिंदूराव यांच्याकडून शुभेच्छा मिळवत होते. तर हेच पदाधिकारी सायंकाळी मुरबाडचे भाजप आमदार किसन कथोरे यांच्या हस्ते शुभेच्छा स्वीकारत होते. तर आज सकाळी हे सर्व शिवसनेचे ठाणे जिल्हा उपाध्यक्ष सुभाष पवार यांच्या सोबत पाहायला मिळाले. तिन्ही पक्षाचे नेते या ग्रामपंचायतीवर आपला झेंडा फडकल्याची घोषणा करत होते. अवघ्या काही तासांच्या फरकाने झालेल्या या राजकीय नाट्याची दिवसभर चर्चा सुरू होती. दरम्यान याबाबत भाजप आमदार किसन कथोरे यांनी हे सरपंच आमच्याच पक्षाचे असल्याचा दावा केलाय तर राष्ट्रवादीचे पदाधिकारी प्रमोद हिंदुराव यांनी देखील निवडून आलेले सरपंच आमचेच असल्याच स्पष्ट केलं आहे.

राजकीय पक्षांच्या अधिकृत चिन्हांशिवाय होणाऱ्या ग्रामपंचायत निवडणुकांमध्ये आपल्याच पक्षाचा वरचष्मा असल्याचे सांगण्यासाठी राजकीय पक्षांकडून मोठमोठे दावे केले जातात. नुकत्याच झालेल्या ग्रामपंचायत निवडणुकांच्या निकालानंतर अशा दाव्यांची मोठी मालिकाच ठाणे जिल्ह्यात पहायला मिळते आहे. मात्र हे दावे करण्यासाठी निवडून आलेल्या सरपंच आणि उपसरपंचांची कशी पळवापळव होते याचे बोलके चित्र मुरबाड तालुक्यात पाहायला मिळते आहे.

मुरबाड तालुक्यातील भुवन ग्रामपंचायतीच्या निवडणुका नुकत्याच पार पडल्या. भुवन ग्रामपंचायतीच्या सरपंच पदाच्या आरक्षणात यंदा खुल्या गटातील महिलांसाठी सरपंच पद आरक्षित झाले आहे. त्यामुळे त्यासाठीही चुरस पहायला मिळत होती. यात दर्शना बांगर यांची सरपंच पदी एकमताने निवड झाली. तर उपसरपंचपदी सुनील बांगर यांची निवड झाली. सरपंच पदाची निवड प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर नवनिर्वाचित सरपंच आणि उपसरपंच यांनी काल दुपारच्या सुमारास राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाचे प्रदेश उपाध्यक्ष प्रमोद हिंदूराव यांची भेट घेतली. यावेळी हिंदूराव यांनी सरपंचांच्या गळ्यात राष्ट्रवादी कॉंग्रेसची पट्टा टाकत त्यांचा सत्कार केला. काही मिनिटात भुवन ग्रामपंचायतींवर राष्ट्रवादी कॉंग्रेसचा झेंडा असे संदेश समाजमाध्यमांवर प्रसारित झाले.खुद्द हिंदूराव यांनी आपल्या फेसबुक पेजवरून याची माहिती दिली.

त्यानंतर सायंकाळी सातच्या सुमारास भुवन ग्रामपंचायतींचे सरपंच आणि उपसरपंचांनी मुरबाड विधानसभा मतदारसंघाचे भाजप आमदार किसन कथोरे यांच्या बदलापूर येथील निवासस्थानी जाऊन त्यांची भेट घेतली. यावेळी भुवन ग्रामपंचायत भाजपच्या ताब्यात आल्याची माहिती त्यांना देण्यात आली. काही मिनिटातच भुवन ग्रामपंचायतीवर भाजपचा झेंडा असे संदेश समाजमाध्यमांवर प्रसारित झाले.

तर सकाळी हे दोघेही शिवसनेचे ठाणे जिल्हा उपध्यक्ष सुभाष पवार यांच्या सोबत पाहायला मिळाले सरपंच आणि उपसरपंच यांच्या गळ्यात शिवसेनेचा पट्टा टाकत सेनेत प्रवेश केला. या नवनियुक्त सरपंच आणि उपसरपंचानी राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या नेत्यांची भेट घेतली त्याच कपड्यांवर भाजप आमदारांच्या आणि सेनेच्या नेत्यांच्या भेटीला हे गेल्याने आश्चर्य व्यक्त केले जात होते. याबाबत दुपारी राष्ट्रवादी कॉंग्रेस आणि सायंकाळी भाजप आणि सकाळी शिवसेना अशा 24 तासात तीन पक्षांच्या प्रवास करणाऱ्या भुवन ग्रामपंचायतींच्या सरपंच आणि उपसरपंचांची चर्चा दिवसभर रंगली होती.

उपसरपंचांचं स्पष्टीकरण

24 तासात तीन पक्ष बदलल्याचे चित्र निर्माण झाल्याने संभ्रम निर्माण झाला होता. अखेर उपसरपंच सुनील बांगर यांनी आम्ही शिवसैनिक असून या ग्रामपंचायतीच्या सात मधील चार जागा शिवसेना व एक जागा राष्ट्रवादीने जिंकली ग्रामपंचायतीवर सत्ता शिवसेनेची आहे. आम्ही शिवसेनेत आहोत, हिंदुराव त्या ठिकाणी आले म्हणून आम्ही भेट घेतली तर स्थानिक आमदार म्हणून किसन कथोरेंची भेट घेतली. कुणी तरी राजकीयदृष्टया बदनाम करण्यासाठी हे नाट्य रचल्याचा आरोप त्यांनी केला आहे.

महत्त्वाच्या बातम्या

शॉकिंग! महावितरणचा 'स्मार्ट' झटका; हिंगोलीत रोजंदारीवरील महिलेला 2 लाख 18 हजार लाईट बिल, कुठून आणणार पैसे?
शॉकिंग! महावितरणचा 'स्मार्ट' झटका; हिंगोलीत रोजंदारीवरील महिलेला 2 लाख 18 हजार लाईट बिल, कुठून आणणार पैसे?
सर्पदंशाने आश्रमशाळेतील तीन मुलींचा मृत्यू, मंत्रालयात पडसाद; CM फडणवीसांकडून अधिकाऱ्याच्या निलंबनाचे आदेश
सर्पदंशाने आश्रमशाळेतील तीन मुलींचा मृत्यू, मंत्रालयात पडसाद; CM फडणवीसांकडून अधिकाऱ्याच्या निलंबनाचे आदेश
Mumbai Crime News: कुटुंबापासून दूर मुंबईत शिक्षणासाठी आला, मॅनेजमेंटच्या विद्यार्थ्यानं 12 व्या मजल्यावरून उडी मारून आयुष्य संपवलं; मन सुन्न करणारी घटना!
कुटुंबापासून दूर मुंबईत शिक्षणासाठी आला, मॅनेजमेंटच्या विद्यार्थ्यानं 12 व्या मजल्यावरून उडी मारून आयुष्य संपवलं; मन सुन्न करणारी घटना!
Maharashtra Goverment Cabinet Decision: मुंबईत गोपाळकाला ऐवजी रक्षाबंधनाची स्थानिक सुट्टी जाहीर; मंत्रिमंडळाच्या बैठकीत राज्य सरकारचे 8 महत्वाचे निर्णय
मुंबईत गोपाळकाला ऐवजी रक्षाबंधनाची स्थानिक सुट्टी जाहीर; मंत्रिमंडळाच्या बैठकीत राज्य सरकारचे 8 महत्वाचे निर्णय

व्हिडीओ

Manoj Jarange Patil Defender Car : 2 कोटींची आलिशान डिफेंडर गाडी कोणाची? मनोज जरांगे काय म्हणाले...
Manoj Jarange Patil Sangli : मराठा आमदार-खासदारांचे फोन; गुपचूप पाठिंबा असल्याचा जरांगेंचा दावा
Manoj Jarange On Maratha Protest: मराठा समाजाचा पुन्हा एकदा मुंबईकडे कूच करण्याचा विचार; मनोज जरांगे काय काय म्हणाले?
Parbhani Police on MD case : अमली पदार्थाचं जाळं भेदलं, मराठवाड्यात मोठं रॅकेट उद्ध्वस्त
Sharad Pawar NCP MP Meet PM Modi : मोदींच्या दरबारी कोणती 'तुतारी'? Special Report

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
शॉकिंग! महावितरणचा 'स्मार्ट' झटका; हिंगोलीत रोजंदारीवरील महिलेला 2 लाख 18 हजार लाईट बिल, कुठून आणणार पैसे?
शॉकिंग! महावितरणचा 'स्मार्ट' झटका; हिंगोलीत रोजंदारीवरील महिलेला 2 लाख 18 हजार लाईट बिल, कुठून आणणार पैसे?
Mumbai Local Train Accident: मुंब्रा खाडीजवळ साईराज चालत्या ट्रेनमधून बाहेर फेकला गेला, आधी रॉडला अडकला मग खाडीत पडून मृत्यू
मुंब्रा खाडीजवळ साईराज चालत्या ट्रेनमधून बाहेर फेकला गेला, आधी रॉडला अडकला मग खाडीत पडून मृत्यू
सर्पदंशाने आश्रमशाळेतील तीन मुलींचा मृत्यू, मंत्रालयात पडसाद; CM फडणवीसांकडून अधिकाऱ्याच्या निलंबनाचे आदेश
सर्पदंशाने आश्रमशाळेतील तीन मुलींचा मृत्यू, मंत्रालयात पडसाद; CM फडणवीसांकडून अधिकाऱ्याच्या निलंबनाचे आदेश
Manoj Jarange Patil Defender Car: मनोज जरांगे पाटील वापरत असलेली ती डिफेंडर कार कोणाची?
मनोज जरांगे पाटील वापरत असलेली ती डिफेंडर कार कोणाची?
परभणीतील धक्कादायक घटना; स्थानिकांनी लाल फडकं दाखवलं पण, रेल्वे थांबलीच नाही, सुषमा अंधारेंकडून व्हिडिओ शेअर
परभणीतील धक्कादायक घटना; स्थानिकांनी लाल फडकं दाखवलं पण, रेल्वे थांबलीच नाही, सुषमा अंधारेंकडून व्हिडिओ शेअर
Sachin Ahir Shivsena: इकडे सचिन अहिरांनी मुंबईत शिंदेंची शिवसेना बांधायला घेतली तिकडे भावाचीही बैठकांना हजेरी, सुनील अहिरही उद्धव ठाकरेंची साथ सोडणार?
इकडे सचिन अहिरांनी मुंबईत शिंदेंची शिवसेना बांधायला घेतली तिकडे भावाचीही बैठकांना हजेरी, सुनील अहिरही उद्धव ठाकरेंची साथ सोडणार?
Sunita Ahuja On Govinda: अभिनेत्री कोमलसोबत गोविंदा एअरपोर्टवर स्पॉट, पत्नी सुनीता अहुजानं थेट अक्कल काढली; म्हणाली...
अभिनेत्री कोमलसोबत गोविंदा एअरपोर्टवर स्पॉट, पत्नी सुनीता अहुजानं थेट अक्कल काढली; म्हणाली...
Sunetra Pawar: रेवती-सारंगच्या रिसेप्शनला पार्थ-जयची उपस्थिती, पण सुनेत्रा पवार का नव्हत्या? राष्ट्रवादीच्या नेत्याने कारण सांगितलं
रेवती-सारंगच्या रिसेप्शनला पार्थ-जयची उपस्थिती, पण सुनेत्रा पवार का नव्हत्या? राष्ट्रवादीच्या नेत्याने कारण सांगितलं
Embed widget