एक्स्प्लोर
Advertisement
ठाण्यात 3 लेडीज बार, दहा लॉज, 20 हुक्का पार्लर्स भुईसपाट
ठाणे : ठाणे शहरातील अतिक्रमणांवर कारवाई करणाऱ्या महापालिकेनं आता आपला मोर्चा मुंब्रा, डायघर आणि शीळ भागाकडे वळवला आहे. या परिसरामध्ये केलेल्या धडक कारवाईत तीन लेडीज बार, दहा लॉज, 20 हुक्का पार्लर्स आणि 400 पेक्षा जास्त गॅरेजेस भुईसपाट करण्यात आली.
महापालिका आयुक्त संजीव जयस्वाल यांच्या नेतृत्वाखाली शीळ फाटा येथून पोलिस बंदोबस्तात कारवाईला सुरुवात करण्यात आली. या कारवाईमध्ये शुभम लॉज, कोकण किंग, वर्षा लॉज, सागर लॉज, सचिन लॉज, साई विहार लॉज, रोहित लॉज, प्रेम लॉज, हनुमान लॉज तोडण्यात आले.
ब्रिस्टो ग्रील, लीला बार, रॉक्स स्टार या लेडीज बारवर हातोडा चालवण्यात आला आहे. तर भाईजान, मेजबान, शेजवान, मोघल धाबा, फूड टॉक, नवाजा, गुगील्स रेस्टॉरंट, नाईट लाईफ, मोती महल, ग्रीन लॉन, दोस्ती, अंबानीज, आरक्षित भुखंडावरील ग्रीन पार्क, मून लाईट, आर. बी. एन. नाईट, लाईट नाईट, व्हॉटसअप, सुफी धाबा, बायपास धाबा, टकाटक, ब्लू लॉन या हुक्का पार्लर्सचा समावेश आहे.
ठाण्यातील अतिक्रमण आणि अनधिकृत बांधकामांविरोधात पालिकेची धडक कारवाई सुरु असताना सत्यम लॉजच्या खाली तीन मजल्यांचं अवैध बांधकाम आढळून आलं होतं. पालिका आयुक्त संजीव जैस्वाल यांच्या आदेशानंतर ते जमीनदोस्त कऱण्यात आलं होतं.
संबंधित बातम्या :
ठाण्यातील सत्यम लॉजच्या मालकासह 4 जणांना बेड्या
ठाण्यात उपवनमध्ये अनैतिक व्यवसायाची गुहा, लॉजच्या तळघरात 3 मजली इमारत
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
निवडणूक
भारत
व्यापार-उद्योग
निवडणूक
Advertisement