एक्स्प्लोर
ठाणे पालिकेच्या शाळेत विद्यार्थिनींवर अत्याचार, सुरक्षारक्षक अटकेत
ठाणे : ठाणे महापालिकेच्या शाळेत विद्यार्थिनींचं लैंगिक शोषण करण्याचा प्रयत्न झाल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. खाजगी सुरक्षारक्षकाने पाचवीत शिकणाऱ्या दोन विद्यार्थिनींचं लैंगिक शोषण करण्याचा प्रयत्न केल्याचा आरोप आहे. सुरक्षारक्षकाने दोन्ही चिमुरडींना मोबाईलमधील अश्लील चित्रफित दाखवून हा प्रकार केला.
ठाणे पूर्वेकडील मनपा शाळा क्रमांक 16 मध्ये हा धक्कादायक प्रकार घडला आहे. सुरक्षारक्षकाने मधल्या सुट्टीत दोन विद्यार्थिनींना फूस लावून सुरक्षारक्षकांच्या केबिनमध्ये नेले. तसेच मोबाईलमधील अश्लील चित्रण दाखवून क्लिप बनवण्याचा घृणास्पद प्रकार केला. या प्रकाराने हादरलेल्या दोन्ही मुली त्यादिवशी गप्प राहिल्या. मात्र,पुन्हा दोन दिवसांनी या नराधमाने त्यांना स्वच्छतागृहात जाताना अडवल्याने हिंमत करुन त्याला लोखंडी रॉडने चोप देत धूम ठोकली.
घरी गेल्यावर घडलेला सर्व प्रकार त्यांनी कुटुंबीयांना सांगितला. संतप्त पालकांनी शाळेत जाऊन मुख्याध्यापिका आणि शिक्षिकांना जाब विचारला. मात्र कोणतीही कारवाई न झाल्याने अखेर कोपरी पोलीसात गुन्हा दाखल केल्यानंतर सुरक्षारक्षकाला अटक झाली. त्याबरोबरच त्याचा मोबाईल जप्त केला. या मोबाईलमध्ये शंभरहून अधिक अश्लील क्लिप आढळल्याची माहिती पोलिसांनी दिली.
दरम्यान 35 वर्षीय सुरक्षारक्षक विकास चव्हाणच्या अटकेसोबतच पालिका प्रशासनाने शाळेच्या मुख्याध्यापिकेसह अन्य 4 शिक्षिकांना तडकाफडकी निलंबितही केलं आहे.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
महाराष्ट्र
विश्व
व्यापार-उद्योग
सोलापूर
Advertisement