एक्स्प्लोर
ठाण्याचे 29 वर्षीय सुपुत्र मेजर कौस्तुभ राणे काश्मिरमध्ये शहीद
काश्मिरमध्ये शहीद झालेले 29 वर्षीय मेजर कौस्तुभ राणे हे ठाणे जिल्ह्यातील मीरारोडचे रहिवासी होते.
मीरा रोड : उत्तर काश्मिरच्या बांदीपोरा जिल्ह्यातील गुरेज सेक्टरमध्ये भारतीय लष्कराने दहशतवाद्यांविरोधात केलेल्या मोठ्या कारवाईत महाराष्ट्राचे सुपुत्र मेजर कौस्तुभ प्रकाश राणे यांना वीरमरण आलं.
शहीद झालेले 29 वर्षीय मेजर कौस्तुभ राणे हे ठाणे जिल्ह्यातील मीरारोडचे रहिवासी होते. त्यांच्या पश्चात आई-वडील, बहीण, पत्नी आणि अडीच वर्षांचा मुलगा असा परिवार आहे.
मीरा रोडच्या शीतल नगर येथील हिरल सागर इमारतीत राणे कुटुंब राहतं. ते मूळचे कोकणातल्या वैभववाडीचे आहेत. पण सुमारे 30 वर्षांपासून मीरारोड परिसरात राहतात.
घुसखोरी करणाऱ्या दहशतवाद्यांशी सोमवारी रात्रीपासूनच भारतीय जवानांचा लढा सुरु होता. मेजर राणेंसह तीन जवान आज सकाळी शहीद झाल्याचं सैन्याकडून सांगण्यात आलं.
मेजर कौस्तुभ राणे शहीद झाल्याचं वृत्त समजताच परिसरात शोककळा पसरली. याच भागात कौस्तुभ राणे लहानाचे मोठे झाले. येथील हॉली क्रॉस शाळेत त्यांनी आपलं शिक्षण घेतलं होतं. तर त्यांचे वडीलही 'राणे काका' म्हणून या भागात सुपरिचित आहेत.
कौस्तुभ यांचे वडील टाटा कंपनीत कार्यरत होते, तर आई ज्योती राणे मालाडच्या शिक्षण प्रसारक मंडळीच्या उत्कर्ष मंदिर शाळेच्या माजी मुख्याध्यापिका आहेत. सध्या दोघेही निवृत्त आहेत. तर कौस्तुभ यांच्या पत्नी कनिका आणि दीड वर्षांचा मुलगाही येथेच राहायला आहेत. कनिका मुलाला घेऊन गावी गेल्या होत्या तर आई-वडीलही गावी जायच्या तयारीत होते.
यंदा कौस्तुभ यांना सेना पदकाने सन्मानित करण्यात आले होते. कौस्तुभ यांच्या सैन्यातील कामगिरीबद्दल राणे कुटुंबियांसह मीरा रोड परिसरातील रहिवाशांनाही खूपच अभिमान होता.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
बॉलीवूड
जळगाव
करमणूक
परभणी
Advertisement