एक्स्प्लोर

बुलेट ट्रेनला दिव्यात पहिला ब्रेक, जमीन देण्यास गावकऱ्यांचा विरोध

सरकारकडून बुलेट ट्रेनसाठी जमीन अधिग्रहण करताना आधुनिक तंत्रज्ञानाच्या साहाय्याने मोजदाद करण्यात आली आहे.

ठाणे : बुलेट ट्रेनसाठी केंद्र आणि राज्य सरकारने जरी शक्ती पणाला लावली असली, तरी मुंबईपासून हाकेच्या अंतरावर असलेल्या दिव्यातील अनेक नागरिकांचा बुलेट ट्रेनला कडाडून विरोध होत आहे. ठाणे आणि पालघर जिल्ह्यातल्या जवळपास 108 गावांमधल्या जमिनी या प्रकल्पासाठी संपादित होणार आहेत. धक्कादायक म्हणजे ज्यांची जमीन या प्रकल्पासाठी संपादित होणार आहे, त्यांना न विचारताच प्रशासनाने त्या जमिनीचं सर्वेक्षण सुरु केलं आहे. त्यामुळेच सरकारला शेतकऱ्यांच्या रोषाला सामारे जावं लागतं आहे. सरकारकडून बुलेट ट्रेनसाठी जमीन अधिग्रहण करताना आधुनिक तंत्रज्ञानाच्या साहाय्याने मोजदाद करण्यात आली आहे. मात्र हे सर्व करताना ज्यांची जमीन अधिग्रहण करणार त्यांनाच सरकार आणि प्रशासन विसरलं आहे. त्यांना विश्वासात न घेता थेट सर्व्हे सुरु केला. त्यामुळेच त्यांना शेतकऱ्यांच्या रोषाला त्यांना सामोरं जावं लागत आहे. वेगवेगळ्या कारणांसाठी जमीन अधिग्रहित दिवा येथील आगासान, पडले, देसई, म्हातर्डी अशा गावातील लोकांची जमीन बुलेट ट्रेन प्रकल्पाच्या अंतर्गत येणार आहे. ही जमीन शेतीसाठीही वापरली जाते. सुरुवातीला कोकण रेल्वेने यांची जमीन घेतली. याच गावांमधून दोन डीपी रोड जाणार आहेत. ठाणे महानगरपालिकेने 37 एकरची जमीन वेगवेगळ्या कारणासाठी आरक्षित केली आहे. त्यात बुलेट ट्रेनच्या नावाखालीही सरकार जमीन घेत असल्याने लोकांचा संताप वाढला आहे. गावकऱ्यांनी मिळून संघर्ष समिती स्थापन केली असून तिच्या माध्यमातून जिल्हाधिकाऱ्यांकडे लढा सुरु केला आहे. बुलेट ट्रेनसाठी एकूण किती जमीन लागणार? बुलेट ट्रेनसाठी अधिग्रहित केली जाणारी एकूण जमीन - 1400 हेक्टर (ज्यात सर्वात जास्त जमीन गुजरातमध्ये आहे) महाराष्ट्रात अधिग्रहित केली जाणारी जमीन - 353 हेक्टर यात ठाणे आणि पालघर जिल्हे प्रभावित होतील ठाणे आणि पालघरमधील जमीन जाणारी एकूण गावं - 108 आजपर्यंत नोटीस बजावलेली गावं - 17 नॅशनल हाय स्पीड रेल कॉरिडोर लिमिटेडने जमीन अधिग्रहणासाठी ठेवलेले पैसे - 10 हजार कोटी आजपर्यंत सरकारने जितके मोठे प्रकल्प राबवले, त्यात जमीन अधिग्रहण हाच महत्वाचा मुद्दा राहिला आहे. स्वतःच्या जमिनीला आईप्रमाणे बघणाऱ्या शेतकऱ्यांचे कधीही यातून समाधान झाले नाही. आधीच 'सफेद हत्ती' असलेल्या बुलेट ट्रेनचा प्रकल्प आपल्यावर थोपवला जातोय, ही भावना असताना, ज्यांची जमीन यात जाणार आहे त्यांनाच विश्वासात न घेणे म्हणजे सरकार हुकुमशाहप्रमाणे कारभार करतंय की काय असा प्रश्न निर्माण होत आहे.

महत्त्वाच्या बातम्या

मतचोरीबाबत राष्ट्रपतींना इंडिया आघाडीचं निवेदन, द्रौपदी मुर्मूंकडून आश्वासन; राहुल गांधी म्हणाले, आम्ही त्यांना सांगितलं
मतचोरीबाबत राष्ट्रपतींना इंडिया आघाडीचं निवेदन, द्रौपदी मुर्मूंकडून आश्वासन; राहुल गांधी म्हणाले, आम्ही त्यांना सांगितलं
मी नाराज असल्याचे वृत्त निराधार; शिवसेना पक्ष पहिल्या क्रमांकावर आणण्यासाठी काम करणार, कीर्तीकरांचे स्पष्टीकरण
मी नाराज असल्याचे वृत्त निराधार; शिवसेना पक्ष पहिल्या क्रमांकावर आणण्यासाठी काम करणार, कीर्तीकरांचे स्पष्टीकरण
डोनाल्ड ट्रम्प वर्षभर मला द्या, मला द्या करत बसले; अखेर, भारतीय वंशाच्या नवी पिल्लईंना 'शांततेचा' नोबेल जाहीर
डोनाल्ड ट्रम्प वर्षभर मला द्या, मला द्या करत बसले; अखेर, भारतीय वंशाच्या नवी पिल्लईंना 'शांततेचा' नोबेल जाहीर
Maharashtra Live News Updates: इंडिया आघाडीचा एल्गार; ज्ञानेश कुमारांच्या राजीनाम्यापर्यंत आंदोलन करण्याची घोषणा
Maharashtra Live News Updates: इंडिया आघाडीचा एल्गार; ज्ञानेश कुमारांच्या राजीनाम्यापर्यंत आंदोलन करण्याची घोषणा

व्हिडीओ

Nana Patekar Funeral Full VIDEO : 'नटसम्राट' अनंतात विलीन.. डोणजे गावी शासकीय इतमामात अंत्यसंस्कार
Abhijeet Dipke on PM Modi : 'मोदींनी 'आणीबाणी'अधिकृत ठरवली', अभिजीत दिपकेंची टीका : ABP Majha
Eknath Shinde On Nana Patekar : एकनाथ आपल्याला मदत केली पाहिजे, नाना पाटेकरांशी ते बोलणं शेवटचं
Devendra Fadnavis on Nana Patekar Passes Away : भाऊ, मार्गदर्शक, मित्र हरपला; फडणवीस भावुक- मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
Nana Patekar Passes Away : अभिनेते नाना पाटेकर यांचं हृदयविकाराच्या झटक्याने निधन

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Yugendra Pawar: आमची एकत्र येण्याची इच्छा असेल आणि समोरच्याची नसेल तर काय करावं? सोमेश्वर कारखान्याचा चेअरमन आमच्याशिवाय ठरणार नाही : युगेंद्र पवार
सोमेश्वरमध्ये तिरंगी लढत,आमच्या शिवाय कारखान्याचा चेअरमन ठरणार नाही: युगेंद्र पवार
मतचोरीबाबत राष्ट्रपतींना इंडिया आघाडीचं निवेदन, द्रौपदी मुर्मूंकडून आश्वासन; राहुल गांधी म्हणाले, आम्ही त्यांना सांगितलं
मतचोरीबाबत राष्ट्रपतींना इंडिया आघाडीचं निवेदन, द्रौपदी मुर्मूंकडून आश्वासन; राहुल गांधी म्हणाले, आम्ही त्यांना सांगितलं
यूपी बिहारमधून लहान मुलं पकडून आणतात, गोळी घालतात; भयमुक्त ठाणे म्हणत मोर्चा
यूपी-बिहारमधून लहान मुलं पकडून आणतात, गोळी घालतात; भयमुक्त ठाणे म्हणत मोर्चा, मविआ नेत्यांचे पोलिस आयुक्तांना निवेदन
Gokul Election: 'आम्ही आमदार खासदारांचे पुत्र नसल्याने डावलले' गोकुळला उमेदवारी नाकारल्याने भाजप जिल्हाध्यक्ष नाथाजी पाटलांची नाराजी
'आम्ही आमदार खासदारांचे पुत्र नसल्याने डावलले' गोकुळला उमेदवारी नाकारल्याने भाजप जिल्हाध्यक्ष नाथाजी पाटलांची नाराजी
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 09 ऑक्टोबर 2026 | शुक्रवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 09 ऑक्टोबर 2026 | शुक्रवार
मी नाराज असल्याचे वृत्त निराधार; शिवसेना पक्ष पहिल्या क्रमांकावर आणण्यासाठी काम करणार, कीर्तीकरांचे स्पष्टीकरण
मी नाराज असल्याचे वृत्त निराधार; शिवसेना पक्ष पहिल्या क्रमांकावर आणण्यासाठी काम करणार, कीर्तीकरांचे स्पष्टीकरण
Sai Paranjpye: ज्येष्ठ नाटककार, लेखिका आणि दिग्दर्शिका सई परांजपे यांना यंदाचा विष्णुदास भावे गौरव पदक पुरस्कार जाहीर
ज्येष्ठ नाटककार, लेखिका आणि दिग्दर्शिका सई परांजपे यांना यंदाचा विष्णुदास भावे गौरव पदक पुरस्कार जाहीर
Rohit Pawar: खोटे गुन्हे नोंदवायची एवढी हौस असेलच, तर विद्यार्थ्यांवरील गुन्हे रद्द करून माझ्यावर गुन्हे नोंद करा, रोहित पवार यांचं पुणे पोलिसांना आव्हान
पुणे पोलीस आयुक्त साहेब, किती खोटे बोलणार? किती खोट्या FIR करणार? रोहित पवार यांचा सवाल
Embed widget