एक्स्प्लोर

प्रेयसीच्या पतीच्या हत्येचा कट, ठाण्यात विवाहित आरोपीला अटक

ठाण्यात बसने बडोद्याला निघालेल्या दोघांसह 27 वर्षीय सूत्रधाराला पोलिसांनी गजाआड केलं.

मुंबई : विवाहबाह्य संबंधातून विवाहित प्रेयसीच्या पतीच्या हत्येचा कट रचणाऱ्या विवाहित प्रियकराला पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत. बडोद्यात राहणाऱ्या प्रेयसीच्या पतीचा काटा काढण्याचा डाव आखलेल्या ठाण्यातील व्यावसायिकाला पोलिसांनी अटक केली. मंगळवारी रात्री ठाण्यात बसने बडोद्याला निघालेल्या दोघांसह 27 वर्षीय सूत्रधाराला पोलिसांनी गजाआड केलं. दोघा साथीदारांपैकी एकाकडून बंदूक, तर दुसऱ्याकडून खेळण्यातील बंदूक जप्त करण्यात आली. तिघांवर कलम 115 अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 'टाइम्स ऑफ इंडिया'ने यासंदर्भात वृत्त दिलं आहे. आरोपी निलेशचं लग्न झालं असून त्याला सहा महिन्यांचं बाळ आहे. ठाण्यातील एका महिलेशी त्याचे विवाहबाह्य प्रेमसंबंध जुळले, तिचं लग्न दीड वर्षांपूर्वी बडोद्यातील इसमाशी झालं आहे. दोघंही एकमेकांच्या संपर्कात होते. आपला पती क्रूर असून छळत असल्याचं तिने निलेशला सांगितल्याची माहिती पोलिसांनी दिली. प्रेयसीचे हाल पाहवत नसल्याने निलेशने तिची पतीच्या तावडीतून सुटका करण्याचा चंग बांधला. निलेशने भाडोत्री शूटर्सशी संपर्क साधला. महिलेच्या पतीची हत्या करण्यासाठी त्याने निलेशकडे चार लाख रुपयांची मागणी केली. निलेशने 70 हजार रुपयांचा पहिला हप्ता दिल्यानंतर शस्त्र विकत घेण्यात आलं. पोलिसांना याची माहिती मिळताच पाळत ठेवून त्यांनी मुख्य सूत्रधार आणि दोन साथीदारांना अटक केली. आरोपी निलेशने आपल्या प्रेयसीला याबाबत काहीच कल्पना नसल्याचा दावा केला आहे. मात्र पोलिस अधिक तपास करत आहेत. तिघांना सहा दिवसांची पोलिस कोठडी ठोठावण्यात आली आहे.
आणखी वाचा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

अभिनेता म्हणून हा माणूस चांगला, पण माणूस म्हणून किती खालच्या पातळीचा; विजय पाटकरांवर राजेभोसलेंचा पलटवार
अभिनेता म्हणून हा माणूस चांगला, पण माणूस म्हणून किती खालच्या पातळीचा; विजय पाटकरांवर राजेभोसलेंचा पलटवार
आता, कला क्षेत्रातही बिनविरोध निवडणुकांची प्रवृत्ती घुसतेय, हे घातक; यशोमती ठाकूरांचे कलाकारांना आवाहन
आता, कला क्षेत्रातही बिनविरोध निवडणुकांची प्रवृत्ती घुसतेय, हे घातक; यशोमती ठाकूरांचे कलाकारांना आवाहन
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 24 मे 2026 | रविवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 24 मे 2026 | रविवार
जसं मराठी बोलता येतं तसंच हिंदी पण आलं पाहिजे, भाजप आमदार कालिदास कोळंबकरांना हिंदीचा गोडवा
जसं मराठी बोलता येतं तसंच हिंदी पण आलं पाहिजे, भाजप आमदार कालिदास कोळंबकरांना हिंदीचा गोडवा

व्हिडीओ

Anna Hazare Ahilyanagar : जेष्ठ समाजसेवक अण्णा हजारेंकडून कॉकरोज जनता पार्टीचे समर्थन...
Prashant Ambi on Sanjay Gaikwad : संजय गायकवाडांचे कार्यकर्ते फोनवर मला आई-बहिणी वरून शिव्या देतात
Laxman Hake PC : जरांगे नावाच्या एका अनपढ माणसामुळे ओबीसीचं आरक्षण संपलं, हाके आक्रमक
Donald Trump daughter Special Report : डोनाल्ड ट्रम्प यांच्या मुलीच्या हत्येचा कट ? धक्कादायक माहिती..
Rehabilitate Beggars from the Street : तरुणाची व्यथा, वर्दीतली माणुसकी Special Report

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Revati Sule Marriage : सुप्रिया सुळे यांनी लेक रेवती आणि जावई सारंग यांच्यासह घेतली पंतप्रधान नरेंद्र मोदींची भेट, लेकीच्या विवाह सोहळ्याचं विविध नेत्यांना निमंत्रण
सुप्रिया सुळे यांनी घेतली पंतप्रधान नरेंद्र मोदींची भेट, लेक रेवती आणि जावई सारंग यांच्या विवाह सोहळ्याचं निमंत्रण, दिल्लीत विविध नेत्यांच्या भेटी
IPL 2026 Playoffs : आयपीएल प्लेऑफसाठी चार संघ ठरले, पहिल्या दोन लढती फिक्स, बंगळुरु-गुजरात, हैदराबाद- राजस्थान कधी आमने सामने येणार? संपूर्ण वेळापत्रक
आयपीएल प्लेऑफसाठी चार संघ निश्चित, पहिल्या दोन लढती फिक्स, बंगळुरु-गुजरात, हैदराबाद- राजस्थान कधी आमने सामने येणार?
अभिनेता म्हणून हा माणूस चांगला, पण माणूस म्हणून किती खालच्या पातळीचा; विजय पाटकरांवर राजेभोसलेंचा पलटवार
अभिनेता म्हणून हा माणूस चांगला, पण माणूस म्हणून किती खालच्या पातळीचा; विजय पाटकरांवर राजेभोसलेंचा पलटवार
बीडमध्ये राजकीय नेत्याच्या मुलाकडून महिलेवर अत्याचार, पैसेही उकळले; विवाहितेची पोलिसात धाव, गुन्हा दाखल
बीडमध्ये राजकीय नेत्याच्या मुलाकडून महिलेवर अत्याचार, पैसेही उकळले; विवाहितेची पोलिसात धाव, गुन्हा दाखल
विजेचा खांब पडून एकाचा मृत्यू; घरावरील उघड्या वायरचा करंट बसून चिमुकलाही ठार; दोन दुर्घटनेनंतर नागरिक संतप्त
विजेचा खांब पडून एकाचा मृत्यू; घरावरील उघड्या वायरचा करंट बसून चिमुकलाही ठार; दोन दुर्घटनेनंतर नागरिक संतप्त
Ladki Bahin Yojana :शासनानं राबवलेल्या लाडकी बहीण योजनेमुळं खूप ताण पडलाय, वेगवेगळ्या ठिकाणी जितकं फंडिंग यायला पाहिजे तितकं येत नाही : उदयनराजे भोसले
लाडकी बहीण योजना शासनानं राबवली त्याच्यामुळं खूप ताण पडलाय, उदयनराजे भोसले यांचं मोठं वक्तव्य

Embed widget