मुंबई : महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे संस्थापक आणि अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackeray) यांचा आज वाढदिवस विविध उपक्रमांनी साजरा करण्यात आला. राज ठाकरे यांनी यावेळी शुभेच्छा देण्यासाठी येणाऱ्या महाराष्ट्र सैनिकांना महत्त्वाचं आवाहन केलं होतं. महाराष्ट्र सैनिक मोठ्या संख्येने मला भेटायला, शुभेच्छा द्यायला येतात. त्यावेळी तुमची होणारी भेट, तुमच्याकडून मिळणाऱ्या शुभेच्छा हीच माझ्यासाठी तुमच्याकडून मिळणारी मोठी भेट असते. पण तरीही महाराष्ट्र सैनिक येताना पुष्पगुच्छ, केक , मिठाई किंवा भेटवस्तू घेऊन येतात. मात्र, या वर्षीपासून कोणतीही भेटवस्तू आणू नका, असं राज ठाकरे यांनी आवाहन केलं होतं. राज ठाकरे यांना मराठी कलाविश्वातून देखील अनेकांनी शुभेच्छा दिल्या आहेत. अभिनेत्री तेजस्विनी पंडित (Tejaswini Pandit) हिनं देखील सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर पोस्ट करुन राज ठाकरेंना शुभेच्छा दिल्या आहेत. 


अभिनेत्री तेजस्विनी पंडित हिची पोस्ट


प्रिय राजसाहेब


हेवा वाटतो तुमचा, तुमच्या मराठी आणि महाराष्ट्रवरच्या प्रेमाचा.
इतका निस्वार्थी भावना असणारा, आणि इतरांसाठी जगणारा माणूस क्वचितच सापडतो आता ! 
साहेब तुमच्या राजकारणाविषयी , तुम्ही घेतलेल्या भूमिकेंविषयी लोकांचं काय म्हणणं आहे याच्याशी मला काही घेणंदेण पण नाही , 
किंबहुना “तुम्हाला जाणलेल्या” कुठल्याच व्यक्तीच्या मनातलं प्रेम त्यामुळे तसूभरही कमी होऊ शकत नाही, हेच तुम्ही कमावलं आहे. 
तुम्ही तुमच्या ध्यासाच्या आणि स्वप्नाच्या दिशेने चालत रहा ! 
आमचा तुम्हाला आणि तुमच्या विचारांना बिनशर्त पाठिंबा आहे.  


मनासारखा राजा आणि राजासारखं मन ! 
हसत रहा साहेब  
वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा !






 


मनसेची पुढील वाटचाल कशी असणार?


मनसेनं तूर्तास स्वबळाचा नारा दिलेला आहे. राज्यातील सर्वच जागांवर तयारी करण्याचे राज ठाकरेंकडून पदाधिकारी आणि नेत्यांना आदेश देण्यात आले आहेत. आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर  मतदार संघनिहाय आढावा घेण्यासाठी कोण टीम असतील या तुम्हाला सांगण्यात येणार नाही. ते त्यांचं काम करतील आणि रिपोर्ट देतील. विधानसभेला जे उमेदवार दिले जाणार ते पारदर्शक आणि पक्षाचे प्रामाणिक असलेले लोकच असतील. एक महिन्याने संपूर्ण राज्यातला मतदारसंघ आणि आढावा घेतल्यानंतर पुन्हा बैठक होईल. राज्यातील सर्व मतदारसंघाचा आढावा घेण्यासाठी टीम बनवल्या जाणार आहेत, असं राज ठाकरे म्हणाले.  


या सर्व टीम राज्यभर मतदारसंघनिहाय आढावा घेतील. पक्ष सरचिटणीस आणि नेते पदाधिकाऱ्यांकडून मतदारसंघनिहाय माहिती मागवतील ती लवकरात लवकर द्यावी पक्ष संघटन वाढवण्यासाठी सर्वांनी अथक प्रयत्न करण्याची सूचना राज ठाकरे यांनी केली. युती आघाडी याबाबत लक्ष देऊ नका, असे राज ठाकरे यांनी काल मनसेच्या मेळाव्यात सांगितले.


संंबंधित बातम्या : 



Amol Kirtikar : मतमोजणीच्या दिवशी मोबाईलवर बोलणाऱ्या 'त्या' व्यक्तीविरोधात गुन्हा दाखल, पण FIR कॉपी देण्यास पोलिसांचा नकार