मुंबई : उत्तर पश्चिम मुंबई लोकसभा मतदारसंघात (Mumbai North West Election Result) मतमोजणीच्या दिवशी मोबाईल वापरणाऱ्या व्यक्तीच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. हा गुन्हा दाखल करताना तक्रारदार उमेदवार यांच्या तक्रारीवरून गुन्हा दाखल न करता तहसीलदार यांच्या तक्रारीवर गुन्हा दाखल करून तक्रार करणाऱ्या उमेदवाराला साक्षीदार बनवण्यात आलं आहे


संबंधित मोबाइल वापर करणाऱ्या व्यक्तीवर गुन्हा दाखल झाल्यानंतरसुद्धा तक्रारदार उमेदवार भरत शाह यांना एफआयआर कॉपी देण्यास पोलिसांचा नकार देण्यात आला. त्यामुळे हे प्रकरण दाबण्याचा प्रयत्न केला जात असल्याचा उमेदवार भरत शाह यांनी केला. 


लोकसभेचा निकाल 4 जून रोजी लागला आणि उत्तर पश्चिम मुंबई लोकसभा मतदारसंघातून शिवसेना पक्षाचे उमेदवार रवींद्र वायकर यांचा विजय झाला. मात्र त्या दिवशी वायकर यांच्याशी संबंधित व्यक्ती मतमोजणी केंद्रात मोबाईलचा वापर करत असल्याचं दिसून आलं. त्यानंतर मतमोजणी केंद्रावरील खोलीत परवानगी नसताना सुद्धा मोबाईल वापरत असल्याची तक्रार पोलीस स्टेशन आणि निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांकडे हिंदू समाज पक्षाचे उमेदवार भरत शाह यांनी केली होती. 


या तक्रारीची दखल घेत पोलिसांनी उमेदवाराची तक्रार न घेता तहसीलदारांची तक्रार घेत गुन्हा दाखल केला आहे. तर या प्रकरणात उमेदवार भरत शाह यांना साक्षीदार बनवण्यात आलं आहे. 


नेमकं काय घडलं?


मुंबई उत्तर-पश्चिम मतदारसंघात मतमोजणीच्या दिवशी नाट्यमय घटना घडली. आधी शिवसेना ठाकरे गटाच्या अमोल कीर्तिकरांना दोन हजार मतांनी विजयी घोषित करण्यात आलं. त्यानंतर फेरमतमोजणी घेण्यात आली आणि त्यामध्ये शिंदे गटाचे उमेदवार रवींद्र वायकरांना 48 मतांनी विजयी घोषित करण्यात आलं. आता या प्रकरणी अमोल कीर्तिकरांनी निवडणूक आयोगाकडे तक्रार केली आहे आणि सर्वोच्च न्यायालयातही याचिका दाखल केली आहे. 


मतमोजणी केंद्रात मोबाईलवर बोलणारा व्यक्ती वायकरांशी संबंधित? 


मुंबई उत्तर-पश्चिम मतदारसंघाची मतमोजणी प्रक्रिया जिथे पार पडत होती, त्याच मुख्य खोलीमध्ये मंगेश पंडिलकर हा व्यक्ती मोबाईलवर बोलत असल्याचा त्या ठिकाणी असलेल्या अपक्ष उमेदवारांना निदर्शनास आलं. मतमोजणी केंद्रावर मोबाईल नेण्यास परवानगी नसताना सुद्धा हा व्यक्ती वारंवार मोबाईल वापरत असल्याचं अपक्ष उमेदवारांनी सांगितलं. 


त्या संबंधित तोंडी तक्रार निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांकडे त्यांनी केली. त्यानंतर समज व्यक्तीचा मोबाईल पोलिसांनी जप्त केला. तसेच सदर व्यक्ती रवींद्र वायकर यांच्याकडून मतमोजणी केंद्रावर आला असल्याचं तक्रारदार अपक्ष उमेदवारांचे म्हणणं आहे


ही बातमी वाचा :