अजित पवार यांना बाजूला करण्याचा भाजपचा प्रयत्न, जितेंद्र आव्हाड यांचं वक्तव्य; दादांच्या कार्यकर्त्यांनाही सुनावलं

Jitendra Awhad : हिंमत असेल तर, भाजप बाबत बोला ना उठलं-सुठलं जितेंद्र आव्हाड यांच्यबर तोंड सुख घेऊयात असला प्रकार सुरू आहे, असं म्हणत जितेंद्र आव्हाड यांनी अजितदादांच्या कार्यकर्त्यांना सुनावलं आहे.

Continues below advertisement

मुंबई : अजित पवार (Ajit Pawar) यांना बाजूला करण्याचा प्रयत्न भाजप (BJP) करत आहे. चारी बाजूने त्याच्यावर हल्ले केले जात आहेत, असं वक्तव्य राष्ट्रवादी शरद पवार गटाचे (NCP Sharad Pawar) आमदार जितेंद्र आव्हाड (Jitendra Awhad) केलं आहे. जितेंद्र आव्हाड यांनी पुढे म्हटलं आहे की, अजित पवार यांचे कार्यकर्ते (NCP Ajit Pawar Party Workers) नुसतेच जितेंद्र आव्हाड यांच्यावर बोलत बसतात. हिंमत असेल तर, भाजप बाबत बोला ना उठलं-सुठलं जितेंद्र आव्हाड यांच्यबर तोंड सुख घेऊयात असला प्रकार सुरू आहे.

Continues below advertisement

मागासवर्गीय समाजाने शिकू नये यासाठी प्रयत्न सुरू, आव्हाडांची टीका

समाज कल्याण विभागाने मागासवर्गीय समाजासाठी आता जाचक अटी टाकल्या आहेत, त्यामुळं आता परदेशात कुणी विद्यार्थी शिकायला जाणार नाही. 75 टक्के अट त्यांनी घातली आहे. यांनी उत्पन्नाची अट देखील 8 लाख केली आहे. तसेच 30 लाखात शिक्षणं पूर्ण असं देखील सांगितलं आहे. मनुस्मृती ज्यावेळी डोक्यात जाते, त्यावेळी असले विचार समोर येतात. मागासवर्गीय समाजाने शिकू नये, यासाठी हे प्रयत्न सुरू आहेत. ओबीसी भटक्या जमाती यांच्या स्कॉलरशिपची अडचण यांनी निर्माण केली आहे. अत्यावश्यक गरजा या समाजात मुलांच्या पूर्ण होऊ नये, यासाठी हे सुरू आहे, असंही जितेंद्र आव्हाड यांनी म्हटलं आहे.

साहेबांवर टीका करणाऱ्याला सोडत नाही

ऑक्सफर्ड युनिव्हर्सिटी फी 55 लाख रुपये आहे, मग मागासवर्गीय विद्यार्थ्याने उरलेले 25 लाख रुपये कुठून आणायचे तुम्ही सांगा. शरद पवार यांच्यावर ज्यावर टीका होते, त्यावेळी कुणीही मोठा व्यक्ती असला तरी, त्याच्यावर मी टीका करतो. मी साहेब रागावतील याचा देखील कधी विचार करत नाही. आता महाराष्ट्रात मागील 4 दिवसांपासून भाजप घेरत आहे, माञ कुणीही याबाबत बोलत नाही. हे किती भयानक आहे. माझ्या बॉसवर कुणीही बोलणार असेल, तर मी त्यांना सोडत नाही, असं आव्हाड म्हणाले. 

अजित पवारांना बाजूला करण्याचा भाजपचा प्रयत्न

आता राज्यातील पराभवाला अजित पवार जबाबदार असतील तर, भाजप उत्तर प्रदेशमध्ये कमी जागा आल्या, मग भाजपने तिथं देखील कोणी अजित पवार यांनी शोधला आहे का? आधी अजित पवार गटाने स्वतःकडे पाहावं. कोण गजा मारणे बरोबर चहा प्यायला गेलं होतं ते पाहा. जिनके शिशेके घर होतें हैं, वो दुसरों के घरोपर पत्थर नहीं मारा करते. अजित पवार यांना बाजूला करण्याचा प्रयत्न भाजप करत आहे. चारी बाजूने त्याच्यावर हल्ले केले जात आहेत, असं वक्तव्य जितेंद्र आव्हाड यांनी केलं आहे.

महत्वाच्या इतर बातम्या :

Nilesh Lanke : गजा मारणेची भेट हा केवळ अपघात, त्याची पार्श्वभूमी मला माहिती नव्हती; निलेश लंकेंचे स्पष्टीकरण

Continues below advertisement
Sponsored Links by Taboola