Ashok Saraf on Sharad Pawar, Mumbai : "लोकांना कला आवडत गेली मी करत गेलो. अशात मराठी नाट्य परिषदेकडून मिळालेला पुरस्कार हा महत्वाचा होता. त्याहून पुढे पवारसाहेबांच्या हस्ते हा पुरस्कार मिळणं हे खूप महत्वाचं होतं. शरद पवार माझे आवडते नेते आहेत. माझं एक काम होतं ते त्यानी तीन मिनिटात केलं होतं. मला विश्वास नव्हता, मी म्हटलं तिथे बोला. ते म्हटले काम झालय आणि खरचं झालं. अजूनही ते प्रत्येकाला नावाने ओळखतात. मी पहिल्यादा भेटलो तेव्हा ते हसले तेव्हा मला ते ओळखतात हे कळालं. दुसऱ्यांदाही भेटले तेव्हाही गर्दीत त्यांनी मला ओळखलं. पवार यांनी बरचं काम करून ठेवलं, उदय सामंत हे बरचं काही करून दाखवतील याची खात्री आहे", असं अभिनेते अशोक सराफ म्हणाले. नाटककार गो. ब. देवल स्मृतिदिनानिमित्त आयोजित पुरस्कार वितरण व कलावंत मेळाव्यात ते बोलत होते. 


फणसाळकर साहेब या जमातीने माझावर जिवापाड प्रेम केलंय


अशोक सराफ म्हणाले, फणसाळकर साहेब या जमातीने माझावर जिवापाड प्रेम केलंय. पोलीस कुठंही अडकलो तरी सोडतात. मी एकदा गाडी चालवत होतो. माझापुढे टॅक्सी आली होती, त्या टॅक्सीने एकाला उडवलं मी त्याला भाटिसा हॉस्पिटलला नेले. पोलिसांनी केस घेतली डॉ खेर होते. मी गेल्यावर पोलिस आले. तेव्हा पोलीस म्हणाले तुम्हाला चौकीला यावं लागेल, ताडदेव पोलिस स्टेशनला गेलो. तेवढ्यात एक पोलिस उपनिरीक्षक आले ते म्हणाले माझा मुलाचा वाढदिवस आहे. 1 वर्षाचा आहे  तुम्ही येता का ? मी गेलो पेढा भरवला, नंतर परत येऊन त्याच जागी बसलो. 9 ते 10 वाजले पोलीस ठाण्याचे वरिष्ठ आले. मागच्या झोपडपट्टीतील ३ हजार लोकं मला बघायला आले होते. कशाला तर मला बघायला, हे कळाल्यावर मला सोडलं, असंही अशोक सराफ यांनी सांगितलं. 


महाराष्ट्र भूषण पुरस्कार मिळाला, त्यावेळी मी थोड काय तरी केलं असं जाणवलं


पुढे बोलताना अशोक सराफ म्हणाले, माझासाठी आनंदाचा क्षण आहे. शब्दात मांडणं कठीण आहे. एका लाईनीत चौथा मिळालेला हा पुरस्कार आहे. हे पुरस्कार कुठून मिळतात, कुणाच्या हस्ते मिळतात हे महत्वाचं आहे. शासनाचा मिळालेला महाराष्ट्र भूषण पुरस्कार मिळाला. त्यावेळी मी थोड काय तरी केलं असं जाणवलं. त्यानंतर तिसऱ्या दिवशी दिल्लीच्या संगीत अकादमीचा पुरस्कार मिळाला. त्यानंतर मंगेशकर फॅमिलीतर्फे  मास्टर दिनानाथ मंगेशकर पुरस्कार मिळाला, असंही अशोक सराफ यांनी नमूद केलं. 


इतर महत्वाच्या बातम्या 


Sunetra Pawar on Nilesh Lanke : पार्थ पवारांनी भेट घेतल्यानंतर रान उठवलं गेलं, गजा मारणेच्या भेटीवरुन सुनेत्रा पवारांचा निलेश लंकेंवर निशाणा