एक्स्प्लोर

पत्नीला सरप्राईझ द्यायला परदेशातून मुंबईत, बिल्डिंगमधून पडून तरुणाचा मृत्यू

मूळ पुण्याच्या असलेल्या 32 वर्षीय आयटी प्रोफेशनलचा मुंबईत सहाव्या मजल्यावरुन पडून मृत्यू झाला.

मुंबई : पत्नीला वाढदिवसाचं सरप्राईज देण्यासाठी परदेशातून आलेल्या तरुणाचा मुंबईत अपघाती मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना समोर आली आहे. मूळ पुण्याच्या असलेल्या 32 वर्षीय आयटी प्रोफेशनलचा मुंबईत सहाव्या मजल्यावरुन पडून मृत्यू झाला. पत्नीच्या वाढदिवसानिमित्त तिला सरप्राईज देण्यासाठी बेल्जियमला राहणारा तेजस दुबे मायदेशी आला. आयटी इंडस्ट्रीत कार्यरत असलेली तेजसची पत्नी पुण्यात राहते. शनिवारी तिचा वाढदिवस असल्यामुळे तेजस शुक्रवारी मुंबईत पोहचला. दुसऱ्या दिवशी कारने पुण्याला जाण्याचा त्याचा प्लान होता. शुक्रवारी रात्री तो मुंबईतील मित्र रोहित सिन्हाकडे थांबला. तेजस आणि रोहित इंजिनिअरिंगपासून मित्र होते. सांताक्रुझला सहाव्या मजल्यावरील फ्लॅटमध्ये रोहित भाड्याने राहतो. तेजस-रोहितचा आणखी एक मित्र तिथे आला. पहाटे तीन वाजेपर्यंत तिघं गप्पा मारत बसले होते. तिसरा मित्र पहाटे ओशिवऱ्यातील घरी निघून गेला, तर तेजस आणि रोहित बेडरुममध्ये झोपायला गेले. पहाटे पाच वाजताच्या सुमारास तेजसला जाग आली. त्याचा बेड फ्रेंच विंडोच्या बाजूलाच होता. दुर्दैवाने खिडकी उघडी होती आणि तिला बाहेरुन ग्रीलही नव्हतं. अंधारात चालताना तेजसचा तोल गेला आणि तो थेट सहाव्या मजल्यावरुन खाली पडला. वॉचमनने या गोष्टीची माहिती त्याचा मित्र रोहितला दिली. तेजसला तात्काळ रुग्णालयात नेण्यात आलं, मात्र डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केलं. झोपण्यापूर्वी तिघांनी मद्यपान केलं होतं का, याविषयी पोलिस माहिती घेत आहेत.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

महात्मा फुले अन् सावित्रीमाईंचा भव्य दिव्य पुतळा; स्मारकासाठी किती खर्च?
महात्मा फुले अन् सावित्रीमाईंचा भव्य दिव्य पुतळा; स्मारकासाठी किती खर्च?
Raj Thackeray: राज ठाकरेंचा विदर्भ दौरा आटोपला, मित्राविरुद्ध उमेदवार; नागपूरमध्ये मनसे विधानसभा लढणार?
राज ठाकरेंचा विदर्भ दौरा आटोपला, मित्राविरुद्ध उमेदवार; नागपूरमध्ये मनसे विधानसभा लढणार?
Jay Shah: जय शाहांची मोठी घोषणा; IPL क्रिकेटर्स आणखी मालामाल, प्रत्येक मॅचसाठी पैसे मिळणार
जय शाहांची मोठी घोषणा; IPL क्रिकेटर्स आणखी मालामाल, प्रत्येक मॅचसाठी पैसे मिळणार
रोहित पवारांच्या कामात खोडा घालू नका, उभं करायला अक्कल लागते, शरद पवारांचा राम शिंदेंना टोला
रोहित पवारांच्या कामात खोडा घालू नका, उभं करायला अक्कल लागते, शरद पवारांचा राम शिंदेंना टोला
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Amruta Fadnavis Full Speech : नाव न घेता ठाकरे-पवारांवर हल्ला, अमृता फडणवीसांचं UNCUT भाषणMahayuti Meeting : जागावाटपासंदर्भात वर्षा बंगल्यावर महायुतीची खलबतंABP Majha Headlines : 11 PM: 29 Sept 2024 : Maharashtra News : एबीपी माझा हेडलाईन्सRaj Thackeray on Ladki Bahin Yojana : 'लाडकी'च्या निधीवरुन 'राज'कीय फटकारे Special Report

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
महात्मा फुले अन् सावित्रीमाईंचा भव्य दिव्य पुतळा; स्मारकासाठी किती खर्च?
महात्मा फुले अन् सावित्रीमाईंचा भव्य दिव्य पुतळा; स्मारकासाठी किती खर्च?
Raj Thackeray: राज ठाकरेंचा विदर्भ दौरा आटोपला, मित्राविरुद्ध उमेदवार; नागपूरमध्ये मनसे विधानसभा लढणार?
राज ठाकरेंचा विदर्भ दौरा आटोपला, मित्राविरुद्ध उमेदवार; नागपूरमध्ये मनसे विधानसभा लढणार?
Jay Shah: जय शाहांची मोठी घोषणा; IPL क्रिकेटर्स आणखी मालामाल, प्रत्येक मॅचसाठी पैसे मिळणार
जय शाहांची मोठी घोषणा; IPL क्रिकेटर्स आणखी मालामाल, प्रत्येक मॅचसाठी पैसे मिळणार
रोहित पवारांच्या कामात खोडा घालू नका, उभं करायला अक्कल लागते, शरद पवारांचा राम शिंदेंना टोला
रोहित पवारांच्या कामात खोडा घालू नका, उभं करायला अक्कल लागते, शरद पवारांचा राम शिंदेंना टोला
Drone terror: रात्री दहशत पसरवणाऱ्या ड्रोन नाट्यावर पडदा, नक्की काय होते कारण? पोलिसांनी केला उलगडा...
रात्री दहशत पसरवणाऱ्या ड्रोन नाट्यावर पडदा, नक्की काय होते कारण? पोलिसांनी केला उलगडा...
Vidhansabha 2024 : राज ठाकरेंची भेट, BRS ला रामराम; कोण आहेत प्रहारचे जयकुमार बेलखडे?
राज ठाकरेंची भेट, BRS ला रामराम; कोण आहेत प्रहारचे जयकुमार बेलखडे?
Video : नादच खुळा... अभिजीत बिचुकलेंची एंट्री, मै हूँ डॉन गाणं वाजलं; बिग बॉसच्या घरात 'नवा राडा'
Video : नादच खुळा... अभिजीत बिचुकलेंची एंट्री, मै हूँ डॉन गाणं वाजलं; बिग बॉसच्या घरात 'नवा राडा'
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 28 सप्टेंबर 2024 | शनिवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 28 सप्टेंबर 2024 | शनिवार
Embed widget