एक्स्प्लोर

उल्हासनगरच्या तरुणाचं आईला अनोखं बर्थडे गिफ्ट, 50 व्या वाढदिवशी सरप्राईज हेलिकॉप्टर राईड

 लग्न झालं, दोन मुलं झाली, पण आईची 'ती' इच्छा कशी पूर्ण करावी? अखेर आईच्या 50 व्या वाढदिवसाला तिला सरप्राईज म्हणून हेलिकॉप्टरने फिरवण्याची कल्पना मुलाला सुचली.

 उल्हासनगर : ज्या आईनं मुलांना अक्षरशः घरकामं करून वाढवलं, शिक्षण दिलं, मोठं केलं, त्या आईला तिच्या 50 व्या वाढदिवशी मुलानं सरप्राईज म्हणून चक्क हेलिकॉप्टरची राईड गिफ्ट केली. मुलाचं हे अनोखं गिफ्ट पाहून आईला आनंदाश्रू अनावर झाले. उल्हासनगरच्या प्रदीप गरड यानं त्याच्या आईला दिलेल्या या अनोख्या गिफ्टची शहरात मोठी चर्चा आहे.

रेखा दिलीप गरड या मूळच्या सोलापूर जिल्ह्यातील बार्शी तालुक्यातल्या.. लग्न होऊन उल्हासनगरात आल्या. मात्र मुलं लहान असतानाच अचानक पती दिलीप गरड यांचं निधन झालं. त्यावेळी मोठा मुलगा सातवीला मधली मुलगी पाचवीला, तर लहान मुलगा पहिलीत होता. यानंतर रेखा यांनी अतिशय कष्टाने तिन्ही मुलांना वाढवलं. मुलांना पालनपोषणासाठी रेखा यांनी अक्षरशः लोकांच्या घरची घरकामं केली. मोठा मुलगा प्रदीप याला त्यांनी आश्रमशाळेत शिकवलं. तिथे प्रदीप यानेही अतिशय जिद्दीने शिक्षण पूर्ण केलं आणि नोकरीला लागला. प्रदीप हा बारावीला असताना अचानक एक दिवस त्यांच्या घरावरून हेलिकॉप्टर गेलं. यावेळी आपल्याला कधी यात बसायला मिळेल? असं रेखा या सहज बोलून गेल्या. ती गोष्ट प्रदीपच्या मनात पक्की बसली. पुढे नोकरीत प्रगती करत प्रदीप हा आई आणि कुटुंबाला घेऊन चाळीतून स्वतःच्या फ्लॅटमध्ये आला.

 लग्न झालं, दोन मुलं झाली, पण आईची 'ती' इच्छा कशी पूर्ण करावी? अखेर आईच्या 50 व्या वाढदिवसाला तिला सरप्राईज म्हणून हेलिकॉप्टरने फिरवण्याची कल्पना प्रदीपला सुचली. त्यानुसार चौकशी करून त्यानं सगळी तयारी केली आणि आज सकाळी वाढदिवसानिमित्त सिद्धिविनायकाचं दर्शन घ्यायचं असल्याचं सांगत आईला थेट जुहू एअरबेसला नेलं. तिथं हेलिकॉप्टर पाहून आईला आनंदाश्रू आवरता आले नाहीत. आईसह प्रदीप, प्रदीपचं लहान भाऊ संदीप, प्रदीपची पत्नी, मुलं यांनीही हेलिकॉप्टर राईडचा आनंद घेतला. यानंतर या सगळ्यावर तुमची पहिली प्रतिक्रिया काय? असा प्रश्न विचारताच प्रदीप यांच्या आईला भावना आवरता आल्या नाहीत.

 या सगळ्यानंतर बोलताना प्रदीप याचाही कंठ दाटून आला होता. आईने आपल्याला खूप हालअपेष्टा सहन करून वाढवलं मोठं केलं, इतकंच नव्हे तर स्वतःच्या पायावर उभं केलं. त्यामुळं तिची अपूर्ण इच्छा पूर्ण करण्याची संधी मिळणं हेच माझ्यासाठी भाग्य असल्याचं प्रदीप कृतज्ञपणे सांगतो. या सगळ्यामुळे आईचा आनंद गगनात मावेनासा आल्यानंतर प्रदीपनंही आनंद व्यक्त केला. 

 ज्या आईनं आपल्याला बोट धरून चालायला शिकवलं, त्याच आईची इच्छा पूर्ण करत तिला घेऊन हेलिकॉप्टरनं आकाशाला गवसणी घालणारा प्रदीप गरड हा आजच्या युगातला श्रावणबाळच म्हणावा लागेल.. त्यामुळंच असा मुलगा सगळ्यांना मिळो, असं त्याची आई सुद्धा म्हणायला विसरत नाही.

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

सुशीलकुमार मोदी यांचं निधन, बिहारमधील भाजपचा चेहरा हरपला
सुशीलकुमार मोदी यांचं निधन, बिहारमधील भाजपचा चेहरा हरपला
Sagli : सांगली रेल्वे स्टेशनवर बॉम्ब ठेवल्याची अफवा, पोलिसांकडून सांगली-मिरज स्टेशनची झाडाझडती 
Sagli : सांगली रेल्वे स्टेशनवर बॉम्ब ठेवल्याची अफवा, पोलिसांकडून सांगली-मिरज स्टेशनची झाडाझडती 
गुजरातचं पॅकअप, पावसामुळे सामना रद्द, कोलकाताचं अव्वल स्थान अधिक मजबूत
गुजरातचं पॅकअप, पावसामुळे सामना रद्द, कोलकाताचं अव्वल स्थान अधिक मजबूत
Pune Loksabha : शिरुर, मावळच्या तुलनेत पुण्यात मतदानाचा आकडा वाढण्याची चिन्हे; कोणाच्या काळजाचा ठोका चूकणार?
शिरुर, मावळच्या तुलनेत पुण्यात मतदानाचा आकडा वाढण्याची चिन्हे; कोणाच्या काळजाचा ठोका चूकणार?
Advertisement
for smartphones
and tablets

व्हिडीओ

Ghatkopar Hoarding Collapse New Video : घाटकोपर होर्डिंग कोसळतानाचा आणखी एक थरारक व्हिडीओGhatkopar Hoarding Special Report : वारा..पाऊस आणि अपघात..मुंबई नगरीत मृत्यू कोसळला ABP MAJHADevendra Fadnavis on Ghatkopar : घाटकोपर होर्डिंग दुर्घटनेची चौकशी होणार, फडणवीसांची माहितीGhatkopar Hoarding : पेट्रोल भरायला आला आणि  काळाने घाला घातला...घाटकोपर दुर्घटनेत तरुणाचा मृत्यू

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
सुशीलकुमार मोदी यांचं निधन, बिहारमधील भाजपचा चेहरा हरपला
सुशीलकुमार मोदी यांचं निधन, बिहारमधील भाजपचा चेहरा हरपला
Sagli : सांगली रेल्वे स्टेशनवर बॉम्ब ठेवल्याची अफवा, पोलिसांकडून सांगली-मिरज स्टेशनची झाडाझडती 
Sagli : सांगली रेल्वे स्टेशनवर बॉम्ब ठेवल्याची अफवा, पोलिसांकडून सांगली-मिरज स्टेशनची झाडाझडती 
गुजरातचं पॅकअप, पावसामुळे सामना रद्द, कोलकाताचं अव्वल स्थान अधिक मजबूत
गुजरातचं पॅकअप, पावसामुळे सामना रद्द, कोलकाताचं अव्वल स्थान अधिक मजबूत
Pune Loksabha : शिरुर, मावळच्या तुलनेत पुण्यात मतदानाचा आकडा वाढण्याची चिन्हे; कोणाच्या काळजाचा ठोका चूकणार?
शिरुर, मावळच्या तुलनेत पुण्यात मतदानाचा आकडा वाढण्याची चिन्हे; कोणाच्या काळजाचा ठोका चूकणार?
CSK विरोधातील सामन्याआधी RCB च्या अडचणी वाढल्या, दोन खेळाडू मायदेशी परतले, प्लेऑफचा प्रवास कठीण 
CSK विरोधातील सामन्याआधी RCB च्या अडचणी वाढल्या, दोन खेळाडू मायदेशी परतले, प्लेऑफचा प्रवास कठीण 
Kim Jong Un : कोरियाचा हुकूमशहा किम जोंगची आता लाल लिपस्टीकने 'सटकली'! लाल लिपस्टिकवर का केला सर्जिकल स्ट्राईक?
कोरियाचा हुकूमशहा किम जोंगची लाल लिपस्टीकने 'सटकली'! लाल लिपस्टिकवर का केला सर्जिकल स्ट्राईक?
मोठी बातमी: वादळी पावसामुळे पवईतील विद्युत उपकेंद्रात बिघाड, कुर्ला वाहिनीतून होणारा पाणीपुरवठा बंद
मोठी बातमी: वादळी पावसामुळे पवईतील विद्युत उपकेंद्रात बिघाड, कुर्ला वाहिनीतून होणारा पाणीपुरवठा बंद
EVM-VVPAT : ईव्हीएम-व्हीव्हीपॅट प्रकरण पुन्हा सर्वोच्च न्यायालयाच्या दारात पोहोचले; काय निर्णय होणार?
ईव्हीएम-व्हीव्हीपॅट प्रकरण पुन्हा सर्वोच्च न्यायालयाच्या दारात पोहोचले; काय निर्णय होणार?
Embed widget