एक्स्प्लोर
वाहतूक कोंडीमुळे ठाण्यातील सभेसाठी सुप्रिया सुळेंची बुलेट स्वारी
मुंबई: राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्या आणि खासदार सुप्रिया सुळे यांनी बुलेटस्वारी केली. मालाडमधील सभा आटोपून त्या थेट ठाण्याला निघाल्या. पण वाहतूक कोंडी टाळण्यासाठी सुप्रिया सुळेंनी थेट बुलेटवरुन जाणं पसंत केलं.
बुलेट चालवणाऱ्या व्यक्तीने हेल्मेट न घातल्याने वाहतुकीचे नियमच धाब्यावर बसवले. सुप्रिया सुळेंनीही हेल्मेट न घातलेल्या बुलेटस्वाराच्या मागे बसून स्वत:चा जीव धोक्यात घातला. दरम्यान, मागे बसलेल्या सुप्रिया सुळेंनीही हेल्मेट घातलं नव्हतं. विशेष म्हणजे पोलिसांनीही त्यांना थांबवलं नाही.
दरम्यान, आज मालाडमधील सभेत सुप्रिया सुळेंनी भाजप आणि शिवसेनेवर जोरदार हल्लाबोल केला. उद्धव ठाकरे म्हणतात पोलीस भाजपला विकले आहेत. आम्ही पोलिसांबद्दल एकही अपशब्द खपवून घेणार नाही, गाठ आमच्याशी आहे. खरंच वाघ असाल तर ‘मातोश्री’ची सर्व पोलीस सुरक्षा काढा आणि माझ्यासारखं एकटं फिरून दाखवा, असं शब्दात सुप्रिया सुळेंनी उद्धव ठाकरेंवर निशाणा साधला.
संबंधित बातम्या:
‘उद्धव ठाकरेंनी पोलिसांशिवाय फिरुन दाखवावं’, सुप्रिया सुळेंचं आव्हान
पाहा व्हिडीओ
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
निवडणूक
पुणे
विश्व
छत्रपती संभाजी नगर
Advertisement