एक्स्प्लोर

मजुरांची नोंदणी करण्याचे सुप्रीम कोर्टाचे आदेश; मनसेच्या मागणीला यश

मजुरांची अधिकृतरित्या नोंदणी करण्याचे आदेश सुप्रीम कोर्टाने राज्यांना दिले आहेत. महाराष्ट्र नवनिर्माण सेना ही मागणी वारंवार करत होते. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी देखील राज्य सरकार यासाठी सकारात्मक असल्याचे सांगितले आहे.

मुंबई : राज्यातील मजुरांची अधिकृतरित्या नोंदणी व्हावी, अशी मागणी वारंवार महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे हे करत आहेत. त्यांच्या या मागणीची दखल घेत सुप्रीम कोर्टाने मजुरांची नोंदणी करण्याचे आदेश राज्यांना दिले आहेत. यावर महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी सकारात्मक दृष्टीने यापुढे सर्व गोष्टी हळूहळू सुरळीत होतील, असं म्हणत मजुरांच्या नोंदणी कार्यक्रमाला होकारचं दर्शविला आहे असंच म्हणावं लागेल.

संपूर्ण भारतात कोरोनाने शिरकाव केल्यामुळे गेल्या अडीच महिन्यांपासून मुंबईतून परप्रांतीय मजुरांनी पुन्हा आपापलं राज्य गाठलेलं आहे. गेल्या अनेक वर्षांपासून महाराष्ट्रासह मुंबईत इतर राज्यातून येणाऱ्या मजुरांचे लोंढे थांबविण्याच्या दृष्टीने आपल्या राज्यात कोण अधिकृतरित्या आलेले आहेत याची माहिती सरकारकडे असावी यासाठी मजुरांची कायदेशीररित्या नोंदणी व्हावी अशी मागणी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे हे करीत होते. मात्र, यापूर्वीच्या तत्कालीन सरकारने या मागणीकडे तसं गांभीर्याने पाहिलं नव्हतं . मात्र, आता खुद्द सुप्रीम कोर्टाने राज ठाकरे यांच्या या मागणीची दखल घेत राज्यांना मजुरांच्या नोंदणी संदर्भातल्या सूचना दिलेल्या आहेत. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेची ही मागणी भारतीय राज्य घटनेला धरुनच आहे. यापूर्वीच्या कोणत्याही सरकारने त्याची अंमलबजावणी केलेली नाही. असा आरोप महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे नेते संदीप देशपांडे यांनी केलेला आहे.

सोनू सूद देवदूत वगैरे नाही, करोडो रुपये येतात कुठून? : संजय राऊत

मजुरांच्या नोंदणी संदर्भात राज्य सरकार सकारात्मक कोरोनाच्या पार्श्वभूमीवर परप्रांतीय मजुरांनी आपला जीव वाचवण्यासाठी सध्या महाराष्ट्र सोडून आपापल्या राज्यात स्थलांतर केलेलं आहे. त्यामुळे मराठी तरुणांना रोजगाराच्या नव्या संधी महाराष्ट्रात उपलब्ध झालेल्या आहेत. आता इथून पुढं सर्व गोष्टी राज्य सरकार हळूहळू पूर्ण करत आहे. त्याचप्रमाणे मजुरांच्या नोंदणी संदर्भात ही आपला सकारात्मक दृष्टिकोन असल्याचं मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी सांगितलेलं आहे.

सोनू सूद आणि भाजपचा काहीही संबंध नाही : गिरीश महाजन

घुसखोरी करणाऱ्यांचे प्रमाण कमी होईल मजुरांची नोंदणी करण्याचे आदेश सुप्रीम कोर्टाने दिल्यामुळे यापुढं राज्यात येणाऱ्या प्रत्येक मजुरांची नोंदणी अधिकृतरीत्या होणार आहे. त्यामुळे आपल्या राज्यात घुसखोरी करणाऱ्यांचे प्रमाण कमी होणार आहे. या मजुरांचा फायदा घेऊन राजकारण करणाऱ्या राजकीय टोळ्यांनाही याचा फटका बसणार आहे. गुन्हेगारी तसेच बेरोजगारीवर सुद्धा थोड्या प्रमाणात चाप बसेल असं मनसेच्या वतीने सांगण्यात येत आहे.

मराठी तरुणांना रोजगार मिळणार मराठी तरुणांना रोजगार उपलब्ध करुन देण्यासाठी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने सुरुवाती पासूनच पुढाकार घेतलेला आहे. सध्या परप्रांतीय मजूर जरी आपल्या राज्यात परत गेले असले तरीही मराठी तरुणांसाठी मनसे विविध योजना राबवत आहे. कोणत्या क्षेत्रात कोणत्या प्रकारचे मनुष्यबळ पाहिजे याची माहिती घेण्याचे काम सध्या युद्धपातळीवर सुरू आहे. त्याप्रमाणे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने राज्यातील बेरोजगार तरुणांना याठिकाणी संधी देण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचेही मनसेच्या वतीने सांगण्यात आलेलं आहे.

Lockdown Again? गर्दी वाढली तर महाराष्ट्रात पुन्हा लॉकडाऊन, मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंचा गर्भित इशारा

महत्त्वाच्या बातम्या

Maharashtra Live News Updates: कोल्हापुरातील बहुचर्चित गोकुळ दूध संघाच्या निवडणुकीसाठी आज मतदान
Maharashtra Live News Updates: कोल्हापुरातील बहुचर्चित गोकुळ दूध संघाच्या निवडणुकीसाठी आज मतदान
अर्थ खात्याची फार चिंता पडली असेल तर रोहित पवारांनी अजितदादांच्या पक्षात यावं, महायुतीच्या अंतर्गत निर्णयावर त्यांना बोलण्याचा अधिकार काय?  भाजपचा हल्लाबोल
अर्थ खात्याची फार चिंता पडली असेल तर रोहित पवारांनी अजितदादांच्या पक्षात यावं, महायुतीच्या अंतर्गत निर्णयावर त्यांना बोलण्याचा अधिकार काय?  भाजपचा हल्लाबोल
माझ्या नशिबी धोंडेच पडणार, पण त्याच धोंड्याने उद्याची लोकशाही उभी राहणार, उद्धव ठाकरेंचं वक्तव्य
माझ्या नशिबी धोंडेच पडणार, पण त्याच धोंड्याने उद्याची लोकशाही उभी राहणार, उद्धव ठाकरेंचं वक्तव्य
शेतकऱ्यांना दिलेल्या 5 हजारांच्या मदतीवरुन टीका, फडणवीसांनी विरोधकांना सुनावलं; कर्नाटकचं उदाहरण दिलं
शेतकऱ्यांना दिलेल्या 5 हजारांच्या मदतीवरुन टीका, फडणवीसांनी विरोधकांना सुनावलं; कर्नाटकचं उदाहरण दिलं

व्हिडीओ

Shetitil Navdurga | Seema Chavan | पिकं बदलत गेली… पण भरघोस उत्पन्नाचा तिचा ध्यास कधीच बदलला नाही!
Kolhapur-Gokul Election : लावा भंडारा, बुक्का आणि मारा शिक्का! | Special Report ABP Majha
Ramanandacharya Narendracharya Maharaj Majha Katta : लोकांनी आपला गुरु कसा निवडावा? रामानंदाचार्य नरेंद्राचार्य माझा कट्ट्यावर : ABP Majha
SIR Election Commision And BJP : मुद्दा एसआयआरच्या घोळाचा, आरोप सत्तेच्या खेळाचा | Special Report ABP Majha
Shetitil Navdurga | Sarika Gaikwad | दुःखातून उभी राहिली, मातीतून यश घडवलं!

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Pune Crime News: बुरखा घालून दुकानात घुसले, कोयते-बंदुका काढल्या; शेजारच्या दुकानदारानं डोकावून पाहिलं अन्..., आरडाओरड्याने दरोडेखोरांची पळापळ!
बुरखा घालून दुकानात घुसले, कोयते-बंदुका काढल्या; शेजारच्या दुकानदारानं डोकावून पाहिलं अन्..., आरडाओरड्याने दरोडेखोरांची पळापळ!
Chandrapur Leopard Attack: महाकालीच्या दर्शनासाठी पायी चाललेल्या नऊ वर्षीय चिमुकल्यावर बिबट्याची झडप; ऐन वर्दळीत हल्ला अन् एकच थरकाप उडाला, चंद्रपूरच्या विसापुरात खळबळ!
महाकालीच्या दर्शनासाठी पायी चाललेल्या नऊ वर्षीय चिमुकल्यावर बिबट्याची झडप; ऐन वर्दळीत हल्ला अन् एकच थरकाप उडाला, चंद्रपूरच्या विसापुरात खळबळ!
Gokul Milk Union Election 2026 : गोकुळसाठी आज मतदान, उद्या गुलाल; 35 केंद्रांवर होणार मतदान, निवडणूक यंत्रणा सज्ज, उत्कंठा शिगेला
गोकुळसाठी आज मतदान, उद्या गुलाल; 35 केंद्रांवर होणार मतदान, निवडणूक यंत्रणा सज्ज, उत्कंठा शिगेला
Maharashtra Weather Updates Rain Marathi News: चिपळूण, सांगलीसह अनेक जिल्ह्यात विजांच्या कडकडाटासह पावसाची हजेरी; आता किती दिवस कोसळणार?
चिपळूण, सांगलीसह अनेक जिल्ह्यात विजांच्या कडकडाटासह पावसाची हजेरी; आता किती दिवस कोसळणार?
Kolkata Stampede Marathi News: कुठे पर्स, कुठे विखुरलेल्या चप्पल; दुर्गापूजा मंडपात चेंगराचेंगरी, 19 जणांचा मृत्यू, कोलकातामधील थरकाप उडवणारे 8 फोटो
कुठे पर्स, कुठे विखुरलेल्या चप्पल; दुर्गापूजा मंडपात चेंगराचेंगरी, 19 जणांचा मृत्यू, कोलकातामधील थरकाप उडवणारे 8 फोटो
दिवाळीचा शिधा दसऱ्यादिवशी रवाना करणार, शेतकऱ्यांची दिवाळी काळी होणार नाही, दिलेला शब्द पाळणार : एकनाथ शिंदे
दिवाळीचा शिधा दसऱ्यादिवशी रवाना करणार, शेतकऱ्यांची दिवाळी काळी होणार नाही, दिलेला शब्द पाळणार : एकनाथ शिंदे
सिंधुदुर्ग जिल्ह्यातील कुडाळ तालुक्यात हॉटेल मॅनेजमेंटचे शिक्षण घेणाऱ्या 24 वर्षीय तरुणीला संपवलं; घराकडे जात असताना प्राणघातक हल्ला करून हल्लेखोर पसार
सिंधुदुर्ग जिल्ह्यातील कुडाळ तालुक्यात हॉटेल मॅनेजमेंटचे शिक्षण घेणाऱ्या 24 वर्षीय तरुणीला संपवलं; घराकडे जात असताना प्राणघातक हल्ला करून हल्लेखोर पसार
शिवसेना नेत्या शायना एनसींच्या मुलीचा साखरपुडा; राज ठाकरेंसह बॉलिवूडचा भाईजान उपस्थित, नव दाम्पत्यास शुभेच्छा
शिवसेना नेत्या शायना एनसींच्या मुलीचा साखरपुडा; राज ठाकरेंसह बॉलिवूडचा भाईजान उपस्थित, नव दाम्पत्यास शुभेच्छा
Embed widget