एक्स्प्लोर
Advertisement
(Source: ECI/ABP News/ABP Majha)
घाटकोपर इमारत दुर्घटनेसाठी शितपच जबाबदार, चौकशी समितीचा अहवाल
घाटकोपरमधील साईसिद्धी इमारत 25 जुलै रोजी कोसळली होती. महापालिकेकडून नेमण्यात आलेल्या चौकशी समितीनं या दुर्घटनेला सुनील शितपला जबाबदार धरत त्यानं पिलर्ससोबत छेडछाड केल्यामुळे इमारत कोसळल्याचं नमूद केलं आहे.
मुंबई : घाटकोपरमधील साईसिद्धी इमारत दुर्घटनेप्रकरणी नेमलेल्या चौकशी समितीचा अहवाल समोर आला आहे. या अहवालात सुनील शितपला दुर्घटनेसाठी जबाबदार धरण्यात आलं आहे. 25 जुलै रोजी घाटकोपरमधील साईसिद्धी इमारत कोसळून 17 जणांचा मृत्यू झाला होता.
घाटकोपरमधील साईसिद्धी इमारत 25 जुलै रोजी कोसळली होती. महापालिकेकडून नेमण्यात आलेल्या चौकशी समितीनं या दुर्घटनेला सुनील शितपला जबाबदार धरत त्यानं पिलर्ससोबत छेडछाड केल्यामुळे इमारत कोसळल्याचं नमूद केलं आहे.
सुनील शितपनं या इमारतीत असलेल्या नर्सिंग होमच्या जागी बार उघडण्याची तयारी चालवली होती. त्यासाठीच त्यानं इमारतीच्या पिलर्ससोबत छेडछाड केली आणि त्यानंतर इमारत कोसळल्याचं अहवालात स्पष्ट करण्यात आलंय.
चौकशी समितीच्या अहवालातील महत्त्वाचे मुद्दे
मुंबई महापालिकेचे अतिरिक्त आयुक्त विजय सिंघल, उपायुक्त विनोद चिठोरे आणि उपायुक्त चंद्रशेखर चौरे या तिघांचा चौकशी समितीत समावेश
इमारत कोसळण्यासाठी सुनील शितपच जबाबदार
पिलर तोडल्यामुळे इमारत कोसळल्याचं अहवालात नमूद
महापालिकेच्या एन वार्डमधील कार्यकारी अभियंता, सहाय्यक अभियंता यांच्यावरही कामात कसूर केल्याचा ठपका ठेवण्यात आला आहे.
एन वार्डातील स्थानित वैद्यकीय अधिकाऱ्यांवरही ठपका
अतिरिक्त आयुक्त विजय सिंघल यांनी दुर्घटनेशी संबंधित अधिकाऱ्यांची चौकशी करुन कारवाई करण्याचे आदेश देण्यात आले आहेत.
पालिकेच्या एन आणि एस वार्डात सुनील शितपची आणखीही अनधिकृत बांधकामं असल्याची माहिती अहवालात नमूद
सुनील शितपच्या अन्य अनधिकृत बांधकामांवर लवकरच हातोडा पडणार आहे.
समितीनं अहवालात नमूद केलेल्या मुद्द्यांवर 6 महिन्यात अंमलबजावणी करण्यात येणार आहे.
दरम्यान सुनील शितप सध्या पोलीस कोठडीत आहे. तसंच समितीनं आदेश दिल्यानंतरही कोणत्याही अधिकाऱ्यावर अद्याप कारवाई करण्यात आलेली नाही. मात्र याप्रकरणी दोषी असणाऱ्या अधिकाऱ्यांवर तातडीनं कारवाईची मागणी शिवसेनेनं केली आहे.
दुसरीकडे महापालिकेच्या या अहवालावर विरोधी पक्षांनी नाराजी व्यक्त केली आहे. या दुर्घटनेप्रकरणी तुर्तास सुनील शितप आणि अभियंत्यांना दोषी ठरवण्यात आलं असलं तरीही पालिकेचे बडे मासे जाळ्यातून निसटल्याचा आरोप विरोधकांनी केला आहे.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
निवडणूक
निवडणूक
निवडणूक
सिंधुदुर्ग
Advertisement