एक्स्प्लोर

बनावट इनपुट टॅक्स क्रेडिट प्रकरणी साखरसम्राट रत्नाकर गुट्टेंच्या मुलाला अटक

साखर सम्राट रत्नाकर गुट्टे यांचा मुलगा सुनील गुट्टेला अटक करण्यात आली आहे. वस्तू किंवा सेवांचा प्रत्यक्ष पुरवठा न करता बोगस पावत्यांच्या आधारावर 520 कोटी रुपये आयटीसी मिळवल्याचा आरोप सुनील गुट्टे यांच्यावर आहे.

मुंबई : साखर सम्राट रत्नाकर गुट्टे यांचा मुलगा सुनील गुट्टेला अटक करण्यात आली आहे. बनावट इनपुट टॅक्स क्रेडिट प्रकरणी ही अटक करण्यात आली आहे. जीएसटी गुप्तचर महासंचालनायाने (डीजीजीआय)ही कारवाई केली आहे. वस्तू किंवा सेवांचा प्रत्यक्ष पुरवठा न करता बोगस पावत्यांच्या आधारावर 520 कोटी रुपये आयटीसी मिळवल्याचा आरोप सुनील गुट्टे यांच्यावर आहे. सुनील गुट्टेला न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली आहे.

सुनील गुट्टे हे हायटेक इंजिनीअरिंग लिमिटेडचे संचालक आहेत. कागदपत्रांची अफरातफर करुन बनावट इनपुट टॅक्स क्रेडिट म्हणजेच आयटीसीचा मिळवल्याच्या आरोपाखाली ही कारवाई करण्यात आली. सुनील हायटेक इंजिनीअर्स लिमिटेडने अंदाजे तीन हजार कोटी रुपयांच्या बनावट पावत्या दिल्या आणि घेतल्या. यात 520 कोटींचा आयटीसी समाविष्ट आहे. या बोगस बिलांचं जाळं नवी दिल्ली, हैदराबाद, लुधियाना, गुरुग्राम, मेरठ अहमदाबाद आणि कोलकातापर्यंत पसरलं आहे. देशभरात बनावट पद्धतीने इनपुट टॅक्स क्रेडिटचा लाभ घेतल्याप्रकरणी सुनील हायटेक इंजिनीअर्स लिमिटेडची मुख्य भूमिका आहे.

सुनील हायटेक इंजिनीअर्स लिमिटेड ही संपूर्ण भारतात बनावट आयटीसी कार्टेलमध्ये सहभागी प्रमुख घोटाळेबाज कंपन्यापैकी एक असल्याचे जीएसटी विभागाने म्हटलं आहे. सुनील गुट्टेशिवाय डीजीजीआयने श्री ओशिया फेरो एलॉय प्रायव्हेट लिमिटेडच्या विजेंद्र विजयराज रांका यांनाही अटक केली आहे. या कंपनीवरही बोगस व्यवहाराचा आरोप आहे. वस्तूंचा संपूर्ण पुरवठा न करताच 1371 कोटी रुपयांच्या बिलांची देवाणघेवाण करण्यात आली. त्यात 209 कोटींच्या आयटीसीच्या लाभाचा समावेश आहे. गुट्टे आणि रांका या दोघांनाही स्थानिक कोर्टात हजर करुन त्यांची रवानगी न्यायालयीन कोठडीत केली आहे.

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

विधानसभेची खडाजंगी: सोलापूर उत्तरमध्ये पुन्हा भाजपचं कमळ खुलणार की पवारांची तुतारी वाजणार, अपक्षाचा फटका कोणाला बसणार
विधानसभेची खडाजंगी: सोलापूर उत्तरमध्ये पुन्हा भाजपचं कमळ खुलणार की पवारांची तुतारी वाजणार, अपक्षाचा फटका कोणाला बसणार
Sangli Assembly Constituency : भाजपची हॅट्रिक की काँग्रेसची बाजी? वसंतदादा घराणं कमबॅक करणार का? सांगली विधानसभेचं गणित काय? 
भाजपची हॅट्रिक की काँग्रेसची बाजी? वसंतदादा घराणं कमबॅक करणार का? सांगली विधानसभेचं गणित काय? 
निवडणुकीच्या धामधुमीत नागपुरात 17 किलो सोने आणि 55 किलो चांदी सापडली, 14 कोटींचा मुद्देमाल जप्त
निवडणुकीच्या धामधुमीत नागपुरात 17 किलो सोने आणि 55 किलो चांदी सापडली, 14 कोटींचा मुद्देमाल जप्त
शरद पवारांना गरिबांची नावं अन् श्रीमंतांची कामं लक्षात राहतात; राज ठाकरेंचा भुजबळांवरही निशाणा
शरद पवारांना गरिबांची नावं अन् श्रीमंतांची कामं लक्षात राहतात; राज ठाकरेंचा भुजबळांवरही निशाणा
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Pawan Kalyan Solapur Road Show : पवन कल्याण यांचा सोलापुरात भव्य रोड शो; नागरिकांची तोबा गर्दीSpecial Report Sharad Pawar : 'पवार'फुल खेळीची इनसाईड स्टोरी! 2014 सालची रणनीती काय होती?Special Report Mahayuti CM  Post : महायुतीच्या गोटात नेमकं काय सुरुय? पुढील मुख्यमंत्री कोण होणार?Special Report Pawar VS Dilip Walse Patil : 'गुरू'चा कोप, शिष्य भावूक; पवारांच्या टीकेवर वळसे काय म्हणाले?

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
विधानसभेची खडाजंगी: सोलापूर उत्तरमध्ये पुन्हा भाजपचं कमळ खुलणार की पवारांची तुतारी वाजणार, अपक्षाचा फटका कोणाला बसणार
विधानसभेची खडाजंगी: सोलापूर उत्तरमध्ये पुन्हा भाजपचं कमळ खुलणार की पवारांची तुतारी वाजणार, अपक्षाचा फटका कोणाला बसणार
Sangli Assembly Constituency : भाजपची हॅट्रिक की काँग्रेसची बाजी? वसंतदादा घराणं कमबॅक करणार का? सांगली विधानसभेचं गणित काय? 
भाजपची हॅट्रिक की काँग्रेसची बाजी? वसंतदादा घराणं कमबॅक करणार का? सांगली विधानसभेचं गणित काय? 
निवडणुकीच्या धामधुमीत नागपुरात 17 किलो सोने आणि 55 किलो चांदी सापडली, 14 कोटींचा मुद्देमाल जप्त
निवडणुकीच्या धामधुमीत नागपुरात 17 किलो सोने आणि 55 किलो चांदी सापडली, 14 कोटींचा मुद्देमाल जप्त
शरद पवारांना गरिबांची नावं अन् श्रीमंतांची कामं लक्षात राहतात; राज ठाकरेंचा भुजबळांवरही निशाणा
शरद पवारांना गरिबांची नावं अन् श्रीमंतांची कामं लक्षात राहतात; राज ठाकरेंचा भुजबळांवरही निशाणा
Raj Thackeray on Uddhav Thackeray : उद्धव ठाकरेंच्या जागी मी असतो, तर म्हटलो असतो मला नको मुख्यमंत्रीपद : राज ठाकरे
उद्धव ठाकरेंच्या जागी मी असतो, तर म्हटलो असतो मला नको मुख्यमंत्रीपद : राज ठाकरे
Priyanka Gandhi In Kohapur : महाराष्ट्रात सरकार खरेदी करण्याची नवीन परंपरा मोदींनी सुरु केली आणि हे संविधान, भ्रष्टाचारावर बोलणार? प्रियांका गांधींचा हल्लाबोल
महाराष्ट्रात सरकार खरेदी करण्याची नवीन परंपरा मोदींनी सुरु केली आणि हे संविधान, भ्रष्टाचारावर बोलणार? प्रियांका गांधींचा हल्लाबोल
निवडणुकीसाठी परराज्यात महाराष्ट्रात किती लोकं आले, पंकजा मुंडेंनी सांगितला आकडा; भुवया उंचावल्या
निवडणुकीसाठी परराज्यात महाराष्ट्रात किती लोकं आले, पंकजा मुंडेंनी सांगितला आकडा; भुवया उंचावल्या
मुंडेंच्या परळीत यंदा निवडणुकीचा धनुभाऊ पॅटर्न; शरद पवारांचे उमेदवार म्हणाले, ही निवडणूक अंडरकरंट
मुंडेंच्या परळीत यंदा निवडणुकीचा धनुभाऊ पॅटर्न; शरद पवारांचे उमेदवार म्हणाले, ही निवडणूक अंडरकरंट
×
Embed widget