एक्स्प्लोर
Advertisement
मुंबई विद्यापीठाचा गोंधळ, परदेशात जाणाऱ्या विद्यार्थ्यांचं भवितव्य टांगणीला
मुंबई विद्यापीठाच्या निकालाची 31 जुलैची पहिली डेडलाइन निघून गेल्यानंतर 5 ऑगस्टची दुसरी डेडलाईन देण्यात आली. मात्र, ही डेडलाईनही हुकण्याची शक्यता आहे. कारण अजून 2 लाखांपेक्षा जास्त उत्तरपत्रिका तपासण्याचं काम बाकी आहे.
मुंबई : मुंबई विद्यापीठाच्या निकालाची 31 जुलैची पहिली डेडलाइन निघून गेल्यानंतर 5 ऑगस्टची दुसरी डेडलाईन देण्यात आली. मात्र, ही डेडलाईनही हुकण्याची शक्यता आहे. कारण अजून 2 लाखांपेक्षा जास्त उत्तरपत्रिका तपासण्याचं काम बाकी आहे.
राज्यपाल आणि शिक्षणमंत्र्यांनी दिलेली 31 जुलैची डेडलाईन संपल्यानंतर विद्यापीठाच्या कुलसचिवांनी 5 ऑगस्टची डेडलाईन दिली. मात्र सध्याचं चित्र पाहिलं तर अजूनही 2 लाख 46 हजार 661 उत्तरपत्रिका तापसण्याचं आणि 234 विभागांचे निकाल लावण्याचं काम बाकी आहे. हे सगळं पाहता आता स्वतः कुलगुरू संजय देशमुखांनी हे उर्वरित सर्व निकाल 15 ऑगस्टपर्यंत लागतील, असं सांगून टाकलं आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांना निकालासाठी विद्यापीठाकडून आज-उद्या करुन केवळ आशेला लावण्याचं काम केलं जात आहे.
विद्यापीठाच्या या भोंगळ कारभारामुळे परदेशात जाणाऱ्या विद्यांर्थ्यांचे चांगलेच हाल होत आहेत. कारण अनेकांच्या परदेशात प्रवेश घ्यायच्या डेडलाईन या निकालाच्या गोंधळामुळे निघून गेल्या आहेत.
निकाल तात्काळ पाहिजे त्यांच्यासाठी विद्यापीठाने हेल्प डेस्क सुविधा सुरु केली आहे. या डेस्कवर जाऊन फॉर्म भरून आपला तत्काळ निकाल दिला जातोय. तुम्ही परदेशात प्रवेश घेत असाल तर तुमचा निकाल परदेशातील विद्यापीठाला पाठवला जातो.
विद्यार्थ्यांना परदेशात शिकायला जायचं असेल तर त्याची तयारी त्याला सहा महिने आधी करावी लागते. तेव्हा कुठे प्रवेश प्रक्रिया पूर्ण होते. आधी ज्या कॉलेजात प्रवेश घ्यायचा आहे ते कॉलेज शॉर्टलिस्ट करावं लागतं. नंतर कागदपत्र आणि संबंधित कॉलेजनुसार आर्थिक नियोजन करावं लागतं.
डिसेंबर किंवा जानेवारीमध्ये शॉर्टलिस्ट केलेल्या कॉलेजला डेडलाईन अगोदर अर्ज करावा लागतो. त्यानंतर परदेशातील कॉलेजची लाखांमध्ये असलेली फी भरावी लागते. हे सर्व झाल्यानंतर विद्यार्थी निकालाची वाट पाहतात. कारण मिळालेल्या गुणपत्रकावर व्हिसासाठी अर्ज करावा लागतो. शिवाय हेच गुणपत्रक परदेशातील विद्यापीठाला पाठवावं लागतं.
मुंबई विद्यापीठाच्या गोंधळामुळे परदेशात जाणाऱ्या विद्यार्थ्यांचं भविष्य कसं टांगणीला लागलंय, ते हे या प्रक्रियेवरुन समजतं. अनेकांनी सहा महिन्यांपासून परदेशात जायची तयारी केली. शैक्षणिक कर्जासाठीही अनेकांची धावपळ सुरु आहे. मात्र ऐनवेळी मुंबई विद्यापीठाने विद्यार्थ्यांचं परदेशात शिकण्याचं स्वप्न धुळीला मिळवलं आहे.
कारण आता ज्याला अमेरिकेत प्रवेश घ्यायचा होता, त्यांना ऑगस्टच्या पहिल्या-दुसऱ्या आठवड्यात प्रवेश निश्चित करायचा होता. मात्र आता विद्यापीठाचे हेल्पडेस्क तात्काळ अशा विद्यार्थ्यांचे गुणपत्रकं देत असले तरी यानंतर व्हिसासाठी अजून 15 दिवसांचा वेळ विद्यार्थ्यांना लागणार आहे. त्यामुळे या सर्व गोंधळात काहींना प्रवेश मिळेलही, पण अनेकांचं भवितव्य टांगणीला लागलंय.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
निवडणूक
निवडणूक
निवडणूक
निवडणूक
Advertisement