एक्स्प्लोर

विद्यार्थी परिषद निवडणुका पुन्हा महाविद्यालयांच्या रणांगणात

विद्यार्थी परिषदेच्या निवडणुकांना कडक आचारसंहिता आखण्यात आली आहे. त्यानुसार कोणत्याही राजकीय पक्ष किंवा सामाजिक संस्थेचं चिन्ह उमेदवारांना वापरता येणार नाही

मुंबई : तब्बल 25 वर्षांनंतर विद्यार्थी परिषदेच्या निवडणुका आता थेट महाविद्यालयांच्या रणांगणात रंगणार आहेत. उच्च आणि तंत्र शिक्षण विभागाने या संदर्भातील अध्यादेश जारी केला आहे. यंदा किंवा पुढील वर्षापासून या निवडणुका पुन्हा सुरु होतील. विद्यार्थी परिषदेच्या निवडणुकांना कडक आचारसंहिता आखण्यात आली आहे. त्यानुसार कोणत्याही राजकीय पक्ष किंवा सामाजिक संस्थेचं चिन्ह उमेदवारांना वापरता येणार नसून थेट खर्चावरही लगाम घालण्यात आला आहे. महाविद्यालयीन निवडणुकांना राजकीय स्वरुप आल्यामुळे आणि हिंसाचाराचे गालबोट लागल्यामुळे त्या बंद करण्यात आल्या होत्या. 1991 नंतर गुणवत्तेच्या निकषांवर विद्यार्थी प्रतिनिधींची निवड होत आहे. गुणवंत विद्यार्थ्यांच्या इच्छेनुसार प्रतिनिधींची निवड करण्यात येत होती. आता पुन्हा निवडणुकीनुसार विद्यार्थी परिषद प्रतिनिधींच्या निवडणुका होतील. यासंदर्भात सर्वच विद्यार्थी संघटनांच्या प्रतिनिधींची मतं विचारात घेऊन उच्च आणि तंत्र शिक्षण विभागाने अध्यादेश जारी केले आहेत. नियम आणि अटी निवडणुकांदरम्यान कडक आचारसंहिता लागू केली जाणार उमेदवाराला राजकीय पक्ष किंवा सामाजिक संस्थेचं चिन्ह किंवा बोधचिन्ह वापरता येणार नसल्याचं स्पष्ट केले आहे. निवडणुकीच्या प्रचारादरम्यान कोणत्याही प्रकारचे मेळावे किंवा मिरवणूक काढण्यास देखील मज्जाव करण्यात आला आहे. निवडणुका दरवर्षी 30 सप्टेंबरपर्यंत विद्यापीठाने पूर्ण कराव्यात, अशी सूचना दिली आहे. निवडणुकीसाठी विद्यार्थ्याची नेमकी पात्रता काय असेल? निवडणूक लढवणारा विद्यार्थी पूर्णवेळ अभ्यासक्रमासाठी प्रवेश घेतलेला असावा उमेदवार विद्यार्थ्याला त्यावर्षी एटीकेटी नसावी, तो फेरप्रवेशार्थी नसावा शैक्षणिक वर्षाच्या 30 सप्टेंबर रोजी त्या विद्यार्थ्याची वयाची मर्यादा 25 वर्ष असावी.

महत्त्वाच्या बातम्या

मंदिर सोडून देवच दर्शन देण्यासाठी आले, असा मुख्यमंत्री पुन्हा कधी भेटणे नाही, भाजप आमदाराचं जोरदार भाषण
मंदिर सोडून देवच दर्शन देण्यासाठी आले, असा मुख्यमंत्री पुन्हा कधी भेटणे नाही, भाजप आमदाराचं जोरदार भाषण
ज्ञानेश कुमार माफिया, सिस्टीमचं अपराधीकरण केलं; इंडिया आघाडीच्या बैठकीनंतर संजय राऊत कडाडले, सांगितली पुढील रणनीती
ज्ञानेश कुमार माफिया, सिस्टीमचं अपराधीकरण केलं; इंडिया आघाडीच्या बैठकीनंतर संजय राऊत कडाडले, सांगितली पुढील रणनीती
मोठी बातमी : 4 कोटींची लँड क्रुझर, 32 इनोव्हा, 2 फॉर्च्युनर, राज्य सरकारकडून नव्या कोऱ्या 44 गाड्यांच्या खरेदीचा निर्णय!
मोठी बातमी : 4 कोटींची लँड क्रुझर, 32 इनोव्हा, 2 फॉर्च्युनर, राज्य सरकारकडून नव्या कोऱ्या 44 गाड्यांच्या खरेदीचा निर्णय!
Contractors: शासनानं तब्बल 96 हजार कोटी थकवले; दहा महिन्यात नऊ कंत्राटदारांनी आयुष्य संपवलं; आता राज्य कंत्राटदार महासंघाचा एल्गार, राज्यभरातील जिल्हाधिकारी कार्यालयांवर धडकणार
शासनानं तब्बल 96 हजार कोटी थकवले; दहा महिन्यात नऊ कंत्राटदारांनी आयुष्य संपवलं; आता राज्य कंत्राटदार महासंघाचा एल्गार, राज्यभरातील जिल्हाधिकारी कार्यालयांवर धडकणार

व्हिडीओ

Rahul Gandhi Special Report : राहुल गांधींनी धक्का दिल्याचा महिला पत्रकाराचा आरोप; भाजपाचा हल्लाबोल
BJP Vs India Aghadi Special Report : इंडिया आघाडीच्या मोर्चावरून राजकीय वाद, दोन गुन्हे दाखल
Shetitil Navdurga | Bharti Nirgude | घरात संकट होतं, पण शेतात तिची हिंमत पिकत होती!
India Alliance Supreme Court Morcha : विरोधकांची 'सुप्रीम' धाव; कुणाकुणावर घाव? | Special Report ABP Majha
Abhijeet Dipke vs Delhi Police : दिपके, पोलीस भिडले; कोण कुणाला नडले? | Special Report ABP Majha

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
PHOTO : MPSC आंदोलन गाजवणारा विवेकानंद पाटील कोल्हापुरात, मूळ गावी जंगी स्वागत
MPSC आंदोलन गाजवणारा विवेकानंद पाटील कोल्हापुरात, मूळ गावी जंगी स्वागत
सोशल मीडियावर बेडशीटची विक्री, सायबर फसवणुकीचा नवा फंडा; 1 कोटीची फसवणूक, दोन घटनांत तिघांना अटक
सोशल मीडियावर बेडशीटची विक्री, सायबर फसवणुकीचा नवा फंडा; 1 कोटीची फसवणूक, दोन घटनांत तिघांना अटक
काम आपण करतो, पण ज्ञानेश कुमारांच्या कृपेने दुसरेच निवडून येतात; शर्मिला ठाकरेंचा निवडणूक आयुक्तांवर हल्लाबोल
काम आपण करतो, पण ज्ञानेश कुमारांच्या कृपेने दुसरेच निवडून येतात; शर्मिला ठाकरेंचा निवडणूक आयुक्तांवर हल्लाबोल
'चीन लडाखला केंद्रशासित प्रदेश म्हणून मान्यता देत नाही..' लडाखमधील 28 ठिकाणांवर दावा; गोगरा-हॉट स्प्रिंगचाही समावेश, जिथं 2020 मध्ये दोन्ही देशांच्या सैन्यांमध्ये घनघोर संघर्ष
'चीन लडाखला केंद्रशासित प्रदेश म्हणून मान्यता देत नाही..' लडाखमधील 28 ठिकाणांवर दावा; गोगरा-हॉट स्प्रिंगचाही समावेश, जिथं 2020 मध्ये दोन्ही देशांच्या सैन्यांमध्ये घनघोर संघर्ष
L Murugan Resignation : मोठी बातमी! मोदींच्या कॅबिनेटमधील मंत्र्याचा राजीनामा, राज्यसभेचे खासदारपदही सोडलं, विरोधकांनी घेरलं असताना दिल्लीत मोठी घडामोड
मोठी बातमी! मोदींच्या कॅबिनेटमधील मंत्र्याचा राजीनामा, राज्यसभेचे खासदारपदही सोडलं, विरोधकांनी घेरलं असताना दिल्लीत मोठी घडामोड
पुण्यात IT अभियंता महिलेनं संपवलं जीवन, चिठ्ठीत लिहला सासरच्याकडून होणारा त्रास; पतीसह 5 जणांविरुद्ध गुन्हा दाखल
पुण्यात IT अभियंता महिलेनं संपवलं जीवन, चिठ्ठीत लिहला सासरच्याकडून होणारा त्रास; पतीसह 5 जणांविरुद्ध गुन्हा दाखल
ज्ञानेश कुमार माफिया, सिस्टीमचं अपराधीकरण केलं; इंडिया आघाडीच्या बैठकीनंतर संजय राऊत कडाडले, सांगितली पुढील रणनीती
ज्ञानेश कुमार माफिया, सिस्टीमचं अपराधीकरण केलं; इंडिया आघाडीच्या बैठकीनंतर संजय राऊत कडाडले, सांगितली पुढील रणनीती
Cyberattack on Refrigeration: फ्रान्समधील शेकडो सुपरमार्केटच्या रेफ्रिजरेशन प्रणालीवर सायबर हल्ला; फ्रीझर तापमान 50 अंश सेल्सिअसपर्यंत पोहोचून आगीचा भडका
फ्रान्समधील शेकडो सुपरमार्केटच्या रेफ्रिजरेशन प्रणालीवर सायबर हल्ला; फ्रीझर तापमान 50 अंश सेल्सिअसपर्यंत पोहोचून आगीचा भडका, अनेक दुकानांमध्येही आगीचा भडका
Embed widget