एक्स्प्लोर

वैधानिक विकास मंडळावरुन अधिवेशनात वातावरण तापलं, विरोधकांचा सभात्याग

कामकाजाला सुरुवात झाल्यानंतर वैधानिक विकास मंडळाच्या नियुक्त्यावरुन विरोधक आक्रमक झाल्याचं पाहायला मिळालं. मंडळावरील नियुक्त्यांसंदर्भात आक्रमक चर्चा झाल्यानंतर विरोधकांनी सरकारचा निषेध करत सभात्याग केला.

मुंबई : विधिमंडळाचं अर्थसंकल्पीय अधिवेशन (Maharashtra assembly Budget Session 2021 Live) आजपासून सुरु झालं आहे. राज्यपालांच्या अभिभाषणानं अधिवेशनाची सुरुवात झाली. कामकाजाला सुरुवात झाल्यानंतर वैधानिक विकास मंडळाच्या नियुक्त्यावरुन विरोधक आक्रमक झाल्याचं पाहायला मिळालं. मंडळावरील नियुक्त्यांसंदर्भात आक्रमक चर्चा झाल्यानंतर विरोधकांनी सरकारचा निषेध करत सभात्याग केला. विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस आणि सुधीर मुनगंटीवार यांनी वैधानिक विकास मंडळावरील नियुक्त्या केल्या जाव्यात अशी मागणी केली. यावर उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी राज्यपाल नियुक्त विधानपरिषद सदस्यांच्या निवडीची 12 नाव जाहीर होतील त्याच्या दुसऱ्या दिवशी वैधानिक विकास मंडळ जाहीर होतील, असं म्हटलं. त्यावरुन विधानसभेत वातावरण चांगलंच पेटलं.

अधिवेशनावर कोरोनाचं सावट, विधानभवनाशी संबंधित 25 जण कोरोनाबाधित

काय म्हणाले उपमुख्यमंत्री अजित पवार उपमुख्यमंत्री अजित पवार म्हणाले की, जसं मराठवाडा, विदर्भ विकास झाला पाहिजे तशी इतर भागांचाही विकास झाला पाहिजे. कोकण आणि उत्तर महाराष्ट्र विकास मंडळ झालं पाहिजे. त्याचा ठराव दिल्लीला पाठवला आहे, त्याचा विचार झाला पाहिजे. महाविकास आघाडी सरकार वैधानिक विकास मंडळ स्थापन करण्याच्या विचारत आहे. मंडळं करणार आहोत त्या बाबत राजकारण करण्याचा विचार करू नका. याबाबत कॅबिनेटमध्ये चर्चा केली आहे. मंडळ आहेत असं गृहीत धरून निधी वाटप झालं पाहिजे. यासाठी अधिकचा निधी देऊ, असं ते म्हणाले. अजित पवार यांनी राज्यपाल नियुक्त विधानपरिषद सदस्यांच्या निवडीची 12 नाव जाहीर होतील त्याच्या दुसऱ्या दिवशी वैधानिक विकास मंडळ जाहीर होतील, असं म्हटलं.

विधानसभा अध्यक्ष निवडीसाठी सरकारचा प्लॅन; तर घाबरट सरकार, फडणवीसांची टीका

12 आमदारांकरता विकास मंडळं ओलीस ठेवली : विरोधी पक्षनेते फडणवीस अजित पवार यांनी राज्यपाल नियुक्त विधानपरिषद सदस्यांच्या निवडीची 12 नाव जाहीर होतील त्याच्या दुसऱ्या दिवशी वैधानिक विकास मंडळ जाहीर होतील, असं म्हटल्यानंतर विरोधी पक्षनेते फडणवीस चांगलेच आक्रमक झाले. ते म्हणाले की, सभागृहात राज्यपालांबाबत अशी चर्चा करत येते का? 12 आमदारांकरता विकास मंडळं ओलीस ठेवली. हे किती राजकारण आहे. दादांकडून ही अपेक्षा नाही. आज अजित दादांच्या ओठावर आलं. राज्यपाल पक्षाचे नसतात. मराठवाडा, विदर्भ सरकारला माफ करणार नाही. आमची मागणी ही भीक नाही आम्ही भिकारी नाही. हे हक्काचे आहे, ते घेतल्याशिवाय राहणार नाही. अजित दादांनी जे म्हटलं त्याचा निषेध करतो, असं फडणवीस म्हणाले.

काय म्हणाले सुधीर मुनगंटीवार याव विषयावर बोलताना सुधीर मुनगंटीवार यांनी वैधानिक विकास मंडळावर नियुक्त्या करण्याची मागणी केली. ते म्हणाले की, भारतात सगळ्यात जास्त वाघ विदर्भात आहेत. विदर्भाच्या जनतेचा अपमान करू नका. सरकारचा निषेध करत आम्ही सभात्याग करतो असं ते म्हणाले.

महत्त्वाच्या बातम्या

आंदोलनाचा वणवा... काँग्रेसने आमदार, खासदारांना दिल्लीत बोलवलं; सरकारविरुद्ध मोठं आंदोलन उभारण्याची तयारी
आंदोलनाचा वणवा... काँग्रेसने आमदार, खासदारांना दिल्लीत बोलवलं; सरकारविरुद्ध मोठं आंदोलन उभारण्याची तयारी
ज्ञानेश कुमारांच्या विरोधात आंदोलन! महात्मा गांधींचे पणतू तुषार गांधी नेमके कुठे? शिवसैनिक पोलीस ठाण्याबाहेर दाखल, आदित्य ठाकरेंचा इशारा 
ज्ञानेश कुमारांच्या विरोधात आंदोलन! महात्मा गांधींचे पणतू तुषार गांधी नेमके कुठे? शिवसैनिक पोलीस ठाण्याबाहेर दाखल, आदित्य ठाकरेंचा इशारा 
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 10 ऑक्टोबर 2026 | शनिवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 10 ऑक्टोबर 2026 | शनिवार
CJP Protest Delhi LIVE Updates: महात्मा गांधींचे पणतू तुषार गांधी पोलिसांच्या ताब्यात; संजय राऊत, आदित्य ठाकरे पोलीस स्टेशनला पोहोचले
CJP Protest Delhi LIVE Updates: महात्मा गांधींचे पणतू तुषार गांधी पोलिसांच्या ताब्यात; संजय राऊत, आदित्य ठाकरे पोलीस स्टेशनला पोहोचले

व्हिडीओ

Sanjay Raut Pune :पंतप्रधान म्हणून यंदा मोदींचा शेवटचा वाढदिवस असेल, संजय राऊतांचं मोठं वक्तव्य
Datta Bharne Vijay Shivtare : वाहिनी गप्पा मारणारी आणि जास्त कानाला लागणारी माणसं आता ओळखा
Abhijeet Dipke On Delhi Protest : CJP आंदोलनाला दिल्ली पोलिसांनी परवानगी का नाकारली?
Nana Patekar Funeral Full VIDEO : 'नटसम्राट' अनंतात विलीन.. डोणजे गावी शासकीय इतमामात अंत्यसंस्कार
Abhijeet Dipke on PM Modi : 'मोदींनी 'आणीबाणी'अधिकृत ठरवली', अभिजीत दिपकेंची टीका : ABP Majha

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
दिल्लीत लाॅकडाऊन, तब्बल 38 हजार सशस्त्र पोलिसांच्या फौजाच फौजा, तरीही CJP, जेनझी, वकिल, विद्यार्थी संघटनांचा ज्ञानेश कुमारांविरोधात वणवा पेटला; तीन माजी सीएमसह तब्बल 4 हजार जणांना छावण्यांमध्ये डांबलं
दिल्लीत लाॅकडाऊन, तब्बल 38 हजार सशस्त्र पोलिसांच्या फौजाच फौजा, तरीही CJP, जेनझी, वकिल, विद्यार्थी संघटनांचा ज्ञानेश कुमारांविरोधात वणवा पेटला; तीन माजी सीएमसह तब्बल 4 हजार जणांना छावण्यांमध्ये डांबलं
आंदोलनाचा वणवा... काँग्रेसने आमदार, खासदारांना दिल्लीत बोलवलं; सरकारविरुद्ध मोठं आंदोलन उभारण्याची तयारी
आंदोलनाचा वणवा... काँग्रेसने आमदार, खासदारांना दिल्लीत बोलवलं; सरकारविरुद्ध मोठं आंदोलन उभारण्याची तयारी
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 10 ऑक्टोबर 2026 | शनिवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 10 ऑक्टोबर 2026 | शनिवार
गेल्या आठ तासांपासून अभिजित दिपके आशुतोष रांका, सौरभ दासना कुठं कैद केलंय आम्हाला माहीत नाही, जोपर्यंत ज्ञानेश कुमारांचा राजीनामा होणार नाही, तोपर्यंत माघार नाही; सीजेपीनं रणशिंग फुंकलं
गेल्या आठ तासांपासून अभिजित दिपके आशुतोष रांका, सौरभ दासना कुठं कैद केलंय आम्हाला माहीत नाही, जोपर्यंत ज्ञानेश कुमारांचा राजीनामा होणार नाही, तोपर्यंत माघार नाही; सीजेपीनं रणशिंग फुंकलं
'भारत अघोषित आणीबाणीत, अटकेतील आंदोलकांची उद्यापर्यंत सुटका झाली नाही, तर..' सोनम वांगचूक यांचा गर्भित इशारा, दिल्लीतील रस्त्यावरची उचलाउचली पाहून निर्णय अवघ्या काही तासात बदलला
'भारत अघोषित आणीबाणीत, अटकेतील आंदोलकांची उद्यापर्यंत सुटका झाली नाही, तर..' सोनम वांगचूक यांचा गर्भित इशारा, दिल्लीतील रस्त्यावरची उचलाउचली पाहून निर्णय अवघ्या काही तासात बदलला
महात्मा गांधींचे पणतू ताब्यात, आदित्य ठाकरे, संजय राऊत पोलीस ठाण्यात; मुंबई, पुण्यात धरपकड, 300 आंदोलक उचलले
महात्मा गांधींचे पणतू ताब्यात, आदित्य ठाकरे, संजय राऊत पोलीस ठाण्यात; मुंबई, पुण्यात धरपकड, 300 आंदोलक उचलले
Satara News : ज्वेलर्सचं दुकान फोडत 4 किलो चांदी, 4 तोळे सोन्याची चोरी, चोरट्यांचा डाव हाणून पाडत पोलिसांकडून चार तासात करेक्ट कार्यक्रम, दोघांना बेड्या 
साताऱ्यात ज्वेलर्सचं दुकान फोडून 10 लाखांचे दागिने पळवले, पोलिसांकडून 4 तासात करेक्ट कार्यक्रम
Gondia Crime News: वृद्ध महिलेला संपवलं; एक महिना तपास अन्...; चघळलेल्या सुपारीच्या तुकड्यामुळं सापडला आरोपी, शेजाऱ्यानेच..., गोंदियातील घटनेचा महिन्याने झाला उलगडा
वृद्ध महिलेला संपवलं; एक महिना तपास अन्...; चघळलेल्या सुपारीच्या तुकड्यामुळं सापडला आरोपी, शेजाऱ्यानेच..., गोंदियातील घटनेचा महिन्याने झाला उलगडा
Embed widget