एक्स्प्लोर

Satara News : ज्वेलर्सचं दुकान फोडत 4 किलो चांदी, 4 तोळे सोन्याची चोरी, चोरट्यांचा डाव हाणून पाडत पोलिसांकडून चार तासात करेक्ट कार्यक्रम, दोघांना बेड्या 

Satara News : सातारा पोलिसांनी शहरातील अवधूत ज्वेलर्समधील चोरीचा छडा लावला आहे. अवघ्या चार तासात आरोपींना अटक करण्यात आली आहे.

सातारा: साताऱ्यातील अवधूत ज्वेलर्स दुकानफोडीचा पोलिसांनी छडा लावला आहे. या प्रकरणी रिहान शेख आणि शुभम हादगे या दोन आरोपींना अटक करण्यात आली आहे. गुरुवार पेठेतील शेटे चौकात दुकानाचे शटर तोडून सोन्या-चांदीचे दागिने, सीसीटीव्ही कॅमेरे आणि डीव्हीआर चोरून नेण्यात आला होता.सातारा शहर पोलिसांच्या डी.बी. पथकाने तांत्रिक तपास आणि गोपनीय माहितीच्या आधारे आरोपींचा शोध घेतला.

आरोपींनी मोटारसायकल चोरी करून त्याचाच वापर दुकानफोडीसाठी केल्याचे तपासात निष्पन्न झाले आहे. या कारवाईत पोलिसांनी 10 लाख 30 हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. दुकानफोडी आणि मोटारसायकल चोरी असे दोन गुन्हे उघडकीस आणले आहेत.

पोलीस उपअधीक्षक विपुल पाटील यांनी दिलेल्या माहितीनुसार  सातारा शहर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील शेटे चौकातील अवधूत ज्वेलर्समध्ये 8 ऑक्टोबरला मध्यरात्री  2 ते 4 च्या सुमारास काही अज्ञात चोरट्यांनी दुकानाचे शटर उचकटून त्यामध्ये दुकानातील चार किलो चांदीचे दागिने आणि चार तोळे सोन्याचे दागिने चोरुन नेले होते. घटनेची माहिती 7 वाजता मिळताच सातारा शहर पोलीस स्टेशनचे प्रभारी अधिकारी म्हेत्रे, गुन्हे अन्वेषणचे मोरे यांच्यासह त्यांची टीम घटनास्थळी दाखल झाली.  या घटनेची माहिती पोलीस अधीक्षक निखील पिंगळे आणि अतिरिक्त पोलीस अधीक्षक वैशाली कडूकर यांना देण्यात आली. त्यांच्याकडून अधिक सूचना मिळाली. 

डॉग स्कॉड, फिंगर प्रिंटच्या टीम दाखल झाल्या आणि फॉरेन्सिक पुरावे जमा करण्याचं काम केलं. चोरांनी हँड ग्लोव्हज वापरणं, डीव्हीआर घेऊन गेले होते. चोरीसाठीचं वाहन 200 मीटरवर लावलं होतं. मात्र, गुन्हे अन्वेषणच्या पथकानं सीसीटीव्हीवरुन चार तासात आरोपी निष्पन्न केले. चार तासात आरोपींवर अटकेची कारवाई करण्यात आली. आरोपींकडून सर्व मुद्देमाल, सोन्याचे दार तोळे दागिने, चार किलो दागिने जप्त करण्यात आले आहेत. 

चोरी करणाऱ्या आरोपींची संख्या तीन आहे. दोन आरोपींची नावं रिहान शेख आणि शुभम हादगे अशी असून तिसरा आरोपी अल्पवयीन आहे. अल्पवयीन आरोपीबाबत नियमानुसार प्रक्रिया सुरु असल्याची माहिती पोलीस अधीक्षक विपुल पाटील यांनी दिली आहे. आरोपींनी यापूर्वी दोन दुचाकींची चोरी केली असल्याचं निष्पन्न झालं होतं. पोलिसांनी त्या दोन दुचाकी देखील जप्त करण्यात आले आहेत. 

Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Solapur : सोलापूर हादरलं! भरदिवसा मोबाईल शॉपीत घुसून 30 वर्षीय तरुणाला संपवलं; लोखंडी पाईपने बेदम मारहाण
सोलापूर हादरलं! भरदिवसा मोबाईल शॉपीत घुसून 30 वर्षीय तरुणाला संपवलं; लोखंडी पाईपने बेदम मारहाण
FDA Action on Vaishali Rupali Hotel : मोठी बातमी : पुण्यातील वैशाली आणि रुपाली हॉटेलचे परवाने निलंबित, तुकाराम मुंढेंच्या FDA ची धडक कारवाई, कारण काय?
मोठी बातमी : पुण्यातील वैशाली आणि रुपाली हॉटेलचे परवाने निलंबित, तुकाराम मुंढेंच्या FDA ची धडक कारवाई, कारण काय?
Nagpur Accident: नागपुरात दहा महिन्यांत तब्बल 224 जणांचा रस्ते अपघातात मृत्यू; रात्री 9 ते 12 काळ ठरतोय सर्वाधिक धोकादायक, आता रस्ता सुरक्षा समितीकडून महत्वाचे आदेश
नागपुरात दहा महिन्यांत तब्बल 224 जणांचा रस्ते अपघातात मृत्यू; रात्री 9 ते 12 काळ ठरतोय सर्वाधिक धोकादायक, आता सर्वोच्च न्यायालयाच्या रस्ता सुरक्षा समितीकडून महत्वाचे आदेश
Navi Mumbai Crime News: प्रेमसंबंधाचा दुर्दैवी शेवट! लॉजमध्ये नेऊन आधी प्रेयसीला ठार केलं, मग स्वत: ही गळ्याला दोर लावला, नवी मुंबईतील उलवे परिसरात नेमकं काय घडलं?
प्रेमसंबंधाचा दुर्दैवी शेवट! लॉजमध्ये नेऊन आधी प्रेयसीला ठार केलं, मग स्वत: ही गळ्याला दोर लावला, नवी मुंबईतील उलवे परिसरात नेमकं काय घडलं?
Advertisement

व्हिडीओ

Hotel Vaishali and Rupali Pune : हॉटेल वैशाली-रुपाली बंद,हळवे पुणेकर भरभरून बोलले
Rahul Gandhi Phone Tapping Case : वादविवादाचं आवतण 'फोन टॅपिंग'चा बाण | Special Report ABP Majha
Microsoft Outage Today : मायक्रोसॉफ्ट गंडलं, कामकाज कोलमडलं | Special Report ABP Majha
Satej Patil Coffee With Kaushik: शांत झालेल्या गोकुळमध्ये पवारांची एन्ट्री, सतेज पाटलांचे गौप्यस्फोट
Sanjay Raut PC : शरद पवार गट चर्चेलाच तयार नाही, मग सुनेत्रा पवार विलीनीकरण कोणासोबत करणार?
Advertisement

फोटो गॅलरी

Advertisement

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Jalgaon Bank Election : जळगाव जिल्हा बँक निवडणुकीत गिरीश महाजन यांचा मार्ग मोकळा; विरोधी उमेदवाराचा अर्ज तांत्रिक कारणास्तव बाद, नेमकं काय घडलं?
जळगाव जिल्हा बँक निवडणुकीत गिरीश महाजन यांचा मार्ग मोकळा; विरोधी उमेदवाराचा अर्ज तांत्रिक कारणास्तव बाद, नेमकं काय घडलं?
FDA Action on Vaishali Roopali Hotel : कच्चा माल साठवण्याचे फ्रीजर महिलांच्या स्वच्छतागृहाच्या; डोसा तयार करण्याचा तवा पुरुषांच्या स्वच्छतागृहाजवळ, अधिकाऱ्यांना रूपाली अन् वैशाली हॉटेलमध्ये काय-काय दिसलं?
कच्चा माल साठवण्याचे फ्रीजर महिलांच्या स्वच्छतागृहाच्या; डोसा तयार करण्याचा तवा पुरुषांच्या स्वच्छतागृहाजवळ, अधिकाऱ्यांना रूपाली अन् वैशाली हॉटेलमध्ये काय-काय दिसलं?
Meenakshi Shinde : मीनाक्षी शिंदे पुन्हा अडचणीत येणार? प्रतिज्ञापत्रात फक्त 3 दुचाकी, प्रत्यक्षात कंत्राटदाराच्या 1.5 कोटींच्या व्होल्वोतून प्रवास; सामाजिक कार्यकर्त्यांकडून पुराव्यांसह तक्रार
मीनाक्षी शिंदे पुन्हा अडचणीत येणार? प्रतिज्ञापत्रात फक्त 3 दुचाकी, प्रत्यक्षात कंत्राटदाराच्या 1.5 कोटींच्या व्होल्वोतून प्रवास; सामाजिक कार्यकर्त्यांकडून पुराव्यांसह तक्रार
मोठी बातमी : ना सत्तेत जाणार, ना विलिनीकरण होणार, सुप्रिया सुळेंचा शब्द, म्हणाल्या, दादा होता तोपर्यंतच चर्चा, आता फुल्ल स्टॉप!
मोठी बातमी : ना सत्तेत जाणार, ना विलिनीकरण होणार, सुप्रिया सुळेंचा शब्द, म्हणाल्या, दादा होता तोपर्यंतच चर्चा, आता फुल्ल स्टॉप!
FDA Action on Vaishali Rupali Hotel : मोठी बातमी : पुण्यातील वैशाली आणि रुपाली हॉटेलचे परवाने निलंबित, तुकाराम मुंढेंच्या FDA ची धडक कारवाई, कारण काय?
मोठी बातमी : पुण्यातील वैशाली आणि रुपाली हॉटेलचे परवाने निलंबित, तुकाराम मुंढेंच्या FDA ची धडक कारवाई, कारण काय?
Sinhagad Technical Educational Institute: सिंहगड संस्था गैरकारभार प्रकरण; मारुती नवले यांच्यासह विश्वस्तांना पुणे सोडण्यास मनाई, सीबीआय, ईडी चौकशीचे आदेश, न्यायलयाने ओढले ताशेरे
सिंहगड संस्था गैरकारभार प्रकरण; मारुती नवले यांच्यासह विश्वस्तांना पुणे सोडण्यास मनाई, सीबीआय, ईडी चौकशीचे आदेश, न्यायलयाने ओढले ताशेरे
SIR Maharashtra : राज्यातील 1.22 कोटी मतदारांना मोठा दिलासा; 'एसआयआर' मोहिमेत कागदपत्रांची पूर्तता केल्याने 99.94 टक्के मतदारांची नावे यादीत कायम
राज्यातील 1.22 कोटी मतदारांना मोठा दिलासा; 'एसआयआर' मोहिमेत कागदपत्रांची पूर्तता केल्याने 99.94 टक्के मतदारांची नावे यादीत कायम
NCP Merger: दोन्ही राष्ट्रवादी एकत्र नको, अन्यथा...; राष्ट्रवादीच्या विलीनीकरणात सुनेत्रा पवारांना अडचण?, भाजपला कोणता प्रस्ताव दिला?, वेगळीच माहिती समोर
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र नको, अन्यथा...; राष्ट्रवादीच्या विलीनीकरणात सुनेत्रा पवारांना अडचण?, भाजपला कोणता प्रस्ताव दिला?, वेगळीच माहिती समोर
Embed widget