Nurses Strike : राज्यभर परिचारिकांचं आजपासून काम बंद; रुग्णसेवेवर परिणाम होण्याची शक्यता
Nurses Strike in Maharashtra Mumbai: आज 26 आणि उद्या 27 मे रोजी परिचारिका काम बंद आंदोलन करणार आहेत. त्यामुळे राज्यातील शासकीय रुग्णालयात रुग्णसेवेवर मोठा परिणाम होण्याची शक्यता आहे
Statewide strike of nurses from today in Maharashtra Mumbai : खासगीकरणाला विरोध दर्शवण्यासाठी व इतर मागण्यासाठी परिचारिका संघटनेच्या वतीने 23 मे ते 25 मे पर्यंत राज्यव्यापी आंदोलन केले आहे. बाह्य स्त्रोताद्वारे (कंत्राटी) पदे भरण्यास महाराष्ट्र राज्य परिचारिका संघटनेने तीव्र विरोध केला आहे.त्यामुळे 23 ते 25 मे पर्यंत राज्यात सर्व प्रशासकीय जिल्ह्यातील रुग्णालयात 1 तास काम बंद आंदोलन आणि निदर्शने करायला सुरुवात झाली होती. मात्र या आंदोलनाची दखल प्रशासनाने घेतली नाही. त्यामुळे 26 आणि 27 मे रोजी परिचारिका काम बंद आंदोलन करणार आहेत. त्यामुळे राज्यातील शासकीय रुग्णालयात रुग्णसेवेवर मोठा परिणाम होण्याची शक्यता आहे. आज या परिचारिकांनी काम बंद आंदोलनाला सुरुवात केली असल्याची माहिती परिचारिका संघटनेच्या अध्यक्षा मीनाक्षी शिंदे यांनी एबीपी माझाशी बोलताना दिली आहे.
23 मे पासून सुरू झालेल्या या आंदोलनाचे पडसाद राज्यात अनेक ठिकाणी पाहायला मिळाले. रुग्णसेवा देत एक तास आंदोलन 23 मे ते 25 मे परिचारिकांनी केले मात्र आंदोलनाची दखल न घेतल्यामुळे आता पूर्णपणे काम बंद आंदोलन परिचारिकांनी पुकारले आहे त्यामुळे याचा परिणाम रुग्णसेवेवर देखील होण्याची शक्यता आहे. परिचारिकांनी वारंवार शासन दरबारी आपल्या मागण्या मांडल्या. मात्र त्या पूर्ण न झाल्याने संतप्त झालेल्या परिचारिकांनी आंदोलन पुकारले आहे.
23 ते 25 मे पर्यंत शांततेत आंदोलन व निदर्शन परिचारिका कडून करण्यात आले आहे. याची दखल घेतली गेली नाही म्हणून 26 ते 27 मे 2022 रोजी राज्यव्यापी काम बंद आंदोलन सुरू करण्यात आले आहे.आता याही दरम्यान शासनाने चर्चेसाठी वेळ दिला नाही तर 28 मे 2022 पासून संपूर्ण राज्यात बेमुदत आंदोलन करण्यात येणार आहे अशी माहिती परिचारिका संघटनेच्या अध्यक्षा मीनाक्षी शिंदे यांनी दिली आहे.
आजपासून सुरू झालेल्या काम बंद आंदोलनात महाराष्ट्र राज्य परिचारिका संघटनेच्या राज्यातील सर्वच रुग्णालयातील शाखेच्या परिचारिका सहभागी होणार आहेत. रुग्णसेवेवर याचा संभाव्य गंभीर परिणाम होऊ शकतो.तसे झाल्यास त्यास सर्वस्वी प्रशासन व शासन जबाबदार राहील असा इशारा महाराष्ट्र राज्य परिचारिका संघटनेच्या वतीने देण्यात आला आहे