एक्स्प्लोर

राज्य सरकारकडून विद्यार्थ्यांना मोफत चष्मे, दहा लाख विद्यार्थ्यांना चष्मा वाटण्याचा निर्णय

सार्वजनिक आरोग्य विभागातर्फे दृष्टीदोष असलेल्या मुलांना निश्चित करण्यात आलेल्या पुरवठादाराकडून त्याच्या घरी अथवा शाळेत मोफत चष्मा पोहचविण्यात येईल, असा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे.

मुंबई : राज्यातल्या तब्बल पावणे दहा लाख विद्यार्थ्यांना चष्मा वाटण्याचा निर्णय राज्य सरकारनं घेतला आहे. 16 वर्षाखालील विद्यार्थ्यांना या सुविधेचा लाभ घेता येणार आहे. राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला आहे. राज्यातील सर्व शासकीय आणि अनुदानित शाळांमधील 6 ते 18 वर्षे वयोगटातील मुलांमधील दृष्टीदोष निवारण्यासाठी त्यांना मोफत चष्मे पुरविण्यास आज झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत मान्यता देण्यात आली आहे. या योजनेसाठी सुमारे 20 कोटी रुपये अनावर्ती आणि पाच कोटी रुपये आवर्ती खर्च अपेक्षित आहे. राज्यातील 9 लाख 75 हजार विद्यार्थ्यांना चष्मा वाटपाचा हा निर्णय कॅबिनेट बैठकीत घेण्यात आला आहे. तसेच भविष्यात त्यांच्या नंबरात बदल झाल्यास त्याचा देखील खर्च सरकार उचलेल अशी तरतूद करण्यात आली आहे. राज्य सरकारकडून विद्यार्थ्यांना मोफत चष्मे, दहा लाख विद्यार्थ्यांना चष्मा वाटण्याचा निर्णय सध्या केंद्र शासनाच्या राष्ट्रीय बाल स्वास्थ्य कार्यक्रमांतर्गत शालेय मुलांची वर्षातून एकदा आरोग्य तपासणी करण्यात येते. या वर्षात 1195 वैद्यकीय पथके यासाठी कार्यरत असून त्यांच्या तपासण्यात दृष्टीदोषाचे प्रमाण वाढलेले आढळले आहे. शाळांमध्ये 1 कोटी 21 लाख 67 हजार 585 इतकी मुलं शिकत असून दृष्टीदोषाचे प्रमाण 8 टक्के इतके आहे. या मुलांना चष्मे उपलब्ध करून दिल्यास एकूणच त्यांच्या शैक्षणिक प्रगतीत सुधारणा होईल. एका चष्म्याची सरासरी किंमत 200 रुपये असून 25 टक्के विद्यार्थ्यांचा चष्म्याचा नंबर पुढील वर्षात बदलण्याची शक्यता असल्याने त्यासाठी देखील खर्च अपेक्षित आहे. सार्वजनिक आरोग्य विभागातर्फे दृष्टीदोष असलेल्या मुलांना निश्चित करण्यात आलेल्या पुरवठादाराकडून त्याच्या घरी अथवा शाळेत मोफत चष्मा पोहचविण्यात येईल, असा निर्णय आजच्या बैठकीत राज्य सरकारने घेतला आहे.

राज्यसभेच्या एका जागेवरुन महाविकास आघाडीत रस्सीखेच होण्याची शक्यता

महत्त्वाच्या बातम्या

Bombay High Court :  मोठी बातमी : राज्यातील आणखी एक परीक्षा रद्द, क्लार्क पदाची टायपिंग चाचणी पुन्हा होणार, मुंबई हायकोर्टाचा निर्णय 
मोठी बातमी : राज्यातील आणखी एक परीक्षा रद्द, क्लार्क पदाची टायपिंग चाचणी पुन्हा होणार, मुंबई हायकोर्टाचा निर्णय 
नेपाळमधून 143 भाविक मायभूमी महाराष्ट्रात परतले; रेल्वेने 106 जण नागपूरला, मुंबईत 37 जण उतरले, कुटुंबीयांन आनंदाश्रू
नेपाळमधून 143 भाविक मायभूमी महाराष्ट्रात परतले; रेल्वेने 106 जण नागपूरला, मुंबईत 37 जण उतरले, कुटुंबीयांन आनंदाश्रू
हे शेवटचं आंदोलन, मागणीत एकही माघार नाही; अंतरवालीतून जरांगे पाटलांचा पुन्हा एल्गार, म्हणाले मुंबईकडे कूच करणार
हे शेवटचं आंदोलन, मागणीत एकही माघार नाही; अंतरवालीतून जरांगे पाटलांचा पुन्हा एल्गार, म्हणाले मुंबईकडे कूच करणार
तुकाराम मुंढेंना महाराष्ट्राचं मुख्यमंत्री करा, थेट अमित शाहंना धाडलं पत्र, राज ठाकरेंचंही केलं कौतुक 
तुकाराम मुंढेंना महाराष्ट्राचं मुख्यमंत्री करा, थेट अमित शाहंना धाडलं पत्र, राज ठाकरेंचंही केलं कौतुक 

व्हिडीओ

Nepal Evacuation : नेपाळमध्ये अडकलेले पर्यटक भारतात परतले, प्रवासाचा हादरवणारा अनुभव
GTA Game : GTA 6 संदर्भातली.. सहा वर्षांच्या प्रतिक्षेनंतर रॉकस्टार गेम्सनं कोणती मोठी घोषणा केलीय
Manoj Jarange Uposhan : उद्यापासून राज्यात पुन्हा मराठा आरक्षणाच्या आंदोलनाचा धुरळा Special Report
Mumbai Marathi Auto Driver : मराठी शिकण्यासाठी एक वर्षाची मुदतवाढ | ABP Majha Special Report
Ritu tawade BMC : सोशल मीडिया पब्लिसिटीच्या 25 लाखांच्या प्रस्तावामुळे वाद | Special Report ABP Majha

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
RBI : राज्यातील 'या' बँकेतून पैसे काढण्यास मनाई, सहा महिन्यांसाठी निर्बंध लागू, आरबीआयचा मोठा निर्णय 
राज्यातील 'या' बँकेतून पैसे काढण्यास मनाई, सहा महिन्यांसाठी निर्बंध लागू, आरबीआयचा मोठा निर्णय 
Bombay High Court :  मोठी बातमी : राज्यातील आणखी एक परीक्षा रद्द, क्लार्क पदाची टायपिंग चाचणी पुन्हा होणार, मुंबई हायकोर्टाचा निर्णय 
मोठी बातमी : राज्यातील आणखी एक परीक्षा रद्द, क्लार्क पदाची टायपिंग चाचणी पुन्हा होणार, मुंबई हायकोर्टाचा निर्णय 
नेपाळमधून 143 भाविक मायभूमी महाराष्ट्रात परतले; रेल्वेने 106 जण नागपूरला, मुंबईत 37 जण उतरले, कुटुंबीयांन आनंदाश्रू
नेपाळमधून 143 भाविक मायभूमी महाराष्ट्रात परतले; रेल्वेने 106 जण नागपूरला, मुंबईत 37 जण उतरले, कुटुंबीयांन आनंदाश्रू
Ration Card EKYC Online : रेशनकार्डची केवायसी कशी करायची? AtoZ माहिती संपूर्ण माहिती जाणून घ्या
रेशनकार्डची केवायसी कशी करायची? AtoZ माहिती संपूर्ण माहिती जाणून घ्या
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 29 ऑगस्ट 2026 | शनिवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 29 ऑगस्ट 2026 | शनिवार
हे शेवटचं आंदोलन, मागणीत एकही माघार नाही; अंतरवालीतून जरांगे पाटलांचा पुन्हा एल्गार, म्हणाले मुंबईकडे कूच करणार
हे शेवटचं आंदोलन, मागणीत एकही माघार नाही; अंतरवालीतून जरांगे पाटलांचा पुन्हा एल्गार, म्हणाले मुंबईकडे कूच करणार
Xi Jinping: भारताविरोधात 'ऑपरेशन गलवान'चा आदेश देणाऱ्या जनरल झाओ जोंगकीला पदावरुन हटवलं, शी जिनपिंग यांचा तडकाफडकी निर्णय
भारताला धडा शिकवण्यासाठी ऑपरेशन गलवानचा आदेश देणाऱ्या लष्करी अधिकाऱ्याची हकालपट्टी, शी जिनपिंग यांचा मोठा निर्णय 
पर्यटनासारखं दवाखान्यात येतात, तमाशा जास्त करतात; चित्रा वाघ यांच्या दौऱ्यानंतर यशोमती ठाकूर संतापल्या
पर्यटनासारखं दवाखान्यात येतात, तमाशा जास्त करतात; चित्रा वाघ यांच्या दौऱ्यानंतर यशोमती ठाकूर संतापल्या
Embed widget