एक्स्प्लोर
“भोंदूबाबा श्रीकृष्ण पाटीलमुळे माझं कुटुंब उद्ध्वस्त झालं”
श्रीकृष्ण पाटील या भोंदूबाबाने माझ्या परिवाराला नादी लावल्यानं माझं घर उद्ध्वस्त झाल्याचा आरोप कल्याणच्या अमित पारकर यांनी केला आहे.
कल्याण : स्वतःला स्वामी समर्थांचा आधुनिक युगातील अवतार असल्याचं सांगणाऱ्या भोंदूबाबा श्रीकृष्ण पाटील याला रत्नागिरी पोलिसांनी ताब्यात घेतलेलं असताना आता त्याची अनेक कृष्णकृत्य समोर येऊ लागली आहेत.
श्रीकृष्ण पाटील या भोंदूबाबाने माझ्या परिवाराला नादी लावल्यानं माझं घर उद्ध्वस्त झाल्याचा आरोप कल्याणच्या अमित पारकर यांनी केला आहे. पारकर हे मूळचे रत्नागिरी जिल्ह्यातील असून त्यांनी 'माझा'शी बोलताना बाबाचे अनेक किस्से सांगितले आहेत.
या भोंदूबाबाविरोधात काही दिवसांपासून सोशल मीडियावर एक व्हिडीओ व्हायरल झाला होता. हा व्हिडीओ अमित पारकर यांनीच समोर आणला होता. ज्यात हा भोंदू बाबा एका महिलेला अर्वाच्य शब्दात शिवीगाळ करताना दिसतोय. हा व्हिडीओ रत्नागिरी जिल्ह्यात वाऱ्यासारखा पसरला आणि संबंधित महिलेनं तक्रार केल्यानंतर आज बाबाला ताब्यात घेण्यात आलं. यानंतर आता अमित पारकर यांनीही बाबाची अनेक कृष्णकृत्य आणि तथाकथित किस्से समोर आणले असून पोलिसांना सर्वतोपरी मदत करण्याची तयारी दर्शवली आहे.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
भारत
व्यापार-उद्योग
क्राईम
क्राईम
Advertisement