एक्स्प्लोर
मुंबईतील सभेत असदुद्दीन ओवेसींवर बूट भिरकावला
बूट फेकणाऱ्याबाबत बोलताना ओवेसी म्हणाले की, "हे लोक महात्मा गांधी, गोविंद पानसरे आणि नरेंद्र दाभोलकर यांच्या मारेकऱ्यांच्या विचारधारेचं अनुकरण करणारे आहेत."
मुंबई : एमआयएमचे अध्यक्ष आणि हैदराबादचे खासदार असदुद्दीन ओवेसी यांच्यावर बूट भिरकावल्याची घटना घडली आहे. मुंबईच्या नागपाडा भागात मंगळवारी झालेल्या सभेत हा प्रकार घडला.
रात्री पावणे दहाच्या सुमारास असदुद्दीन ओवेसी तीन तलाक कायद्याबाबत बोलत असताना, अचानक लोकांमधून ओवेसींच्या दिशेने बूट भिरकावला. यामुळे गोंधळ झाल्याने ओवेसींनी काही क्षण भाषण थांबवलं.
"हे सगळे निराश लोक आहेत, जे हे पाहू शकत नाहीत की, तलाकवर सरकारचा निर्णय जनतेने विशेषत: मुस्लीमांनी स्वीकारला नाही. पण मी लोकहितासाठी लढणारा नेता आहे. अशाप्रकारे द्वेष करणाऱ्या माणसांना घाबरत नाही. त्यांच्याविरोधात सत्य बोलण्यास ते आम्हाला रोखू शकत नाही," असं म्हणत ओवेसी यांना पुन्हा सभेला सुरुवात केली.
बूट फेकणाऱ्याबाबत बोलताना ओवेसी म्हणाले की, "हे लोक महात्मा गांधी, गोविंद पानसरे आणि नरेंद्र दाभोलकर यांच्या मारेकऱ्यांच्या विचारधारेचं अनुकरण करणारे आहेत."
"ओवेसी यांनी बूट लागला नाही. पोलिसांनी सीसीटीव्ही फुटेजद्वारे आरोपीची ओळख पटवली असून त्याला अद्याप अटक केलेली नाही," असं झोन 3 चे पोलिस उपायुक्त वीरेंद्र मिश्र यांनी सांगितलं.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
महाराष्ट्र
रायगड
भारत
नाशिक
Advertisement