एक्स्प्लोर
Advertisement
(Source: ECI/ABP News/ABP Majha)
शेतकऱ्यांच्या 'थप्पड की गुंज' सरकारच्या स्मरणात राहील: सामना
‘सामना’तून पुन्हा एकदा सरकारवर निशाणा साधला.
मुंबई: शिवसेनेने मुखपत्र ‘सामना’तून पुन्हा एकदा सरकारवर निशाणा साधला. शेतकऱ्यांनी मुंबईत येऊन दिलेली ‘थप्पड की गुंज’ सत्ताधाऱ्यांच्या कायम स्मरणात राहिल. अन्नदाता शेतकरी आणि कष्टकरी यांच्या आयुष्याची राखरांगोळी करण्याचे धाडस सरकार यापुढे करणार नाही, अशा शब्दात किसान लाँग मार्च आंदोलनावरुन सरकारवर टीकास्त्र सोडलं आहे.
तसंच शेतकऱ्यांनी राज्यकर्त्यांना ही शेवटची संधी दिलेली आहे. मागण्यांच्या पूर्ततेचे तुम्ही लेखी आश्वासन दिले आहे. ते तरी आता पाळा, असा सल्लाही सामनातून देण्यात आला आहे.
सामनात नेमकं काय म्हटलं आहे?
मोर्चेकऱ्यांच्या मागण्या मान्य करण्याशिवाय दुसरा पर्यायही सरकारसमोर राहिला नाही. कालपर्यंत जे सरकार शेतकऱ्यांच्या मोर्चाबद्दल ढिम्म होते ते सोमवारी एकदम ‘संवेदनशील’ झाले. मोर्चेकरी शेतकऱ्यांचा आक्रोश ज्यांच्या कानावरही पडत नव्हता ते त्यांच्या मागण्यांबाबत ‘सकारात्मक’ झाले. शेतकरी आणि कष्टकऱ्यांच्या जीवनाची राखरांगोळी करण्याचा प्रयत्न आजपर्यंत ज्यांनी ज्यांनी केला त्या प्रत्येकाला त्यांच्यासमोर झुकावेच लागले हा इतिहास आहे.
शेतकऱ्यांच्या वादळामुळे सोमवारी त्याच इतिहासाची पुनरावृत्ती झाली. आंदोलनकर्त्या शेतकऱ्यांच्या जवळजवळ सर्वच मागण्या राज्य सरकारने मान्य केल्या आहेत. मुख्य म्हणजे, यावेळी सरकारला तोंडी आश्वासनांवर शेतकऱ्यांची बोळवण करता आली नाही. सर्वच मागण्या कालबद्ध पूर्ततेच्या आश्वासनासह लेखी स्वरूपात मान्य कराव्या लागल्या आहेत. थोडक्यात, बळीराजाच्या आक्रमकतेचे एक पाऊल पुढे पडले आहे आणि राज्य सरकारला एक पाऊल मागे घ्यावे लागले आहे.
संबंधित बातम्या
शेतकऱ्यांच्या लढ्याला अभूतपूर्व यश, लेखी आश्वासन घेऊन आंदोलन मागे
निर्धार..... शेवटच्या क्षणापर्यंत लढण्याचा!
किसान सभेच्या मागण्या आणि सरकारचं उत्तर!
शेतकऱ्यांच्या 80 टक्के मागण्या मान्य, शिष्टमंडळाला लेखी आश्वासन
महाजन म्हणतात 80%, पाटील म्हणतात 100% शेतकरी मागण्या मान्य!
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
रायगड
क्रिकेट
करमणूक
महाराष्ट्र
Advertisement