एक्स्प्लोर

शिवसेनेच्या 25 आमदारांचा सत्तेतून बाहेर पडण्यास विरोध!

सत्तेतून बाहेर पडण्यासाठी शिवसेनेतील 25 आमदारांचा विरोध आहे. त्यामुळे शिवसेनेने दिलेल्या सत्तेतून बाहेर पडण्याच्या अल्टिमेटमचं काय? असा प्रश्न निर्माण झाला आहे.

मुंबई : शिवसेनेकडून सत्तेतून बाहेर पडण्याचा अल्टिमेटम देण्यात आला असला तरी पक्षातील एका गटाचा सत्तेतून बाहेर पडण्यास विरोध आहे. शिवसेनेच्या 25 आमदारांचा सत्तेतून बाहेर पडण्यास विरोध असल्याची माहिती समोर आली आहे. शिवसेनेतील अंतर्गत वाद पुन्हा एकदा समोर आला आहे. ‘मातोश्री’वरील शिवसेनेच्या मंत्री आणि आमदारांच्या बैठकीत दोन वेळा खडाजंगी झाली. विशेष म्हणजे शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंच्या उपस्थितीत हा सर्व प्रकार घडला. सत्तेतून बाहेर पडण्यावरुन ‘मातोश्री’वरील बैठकीत गटबाजीचं राजकारण दिसून आलं. मध्यावधी झाल्यास निवडणूक लढण्यासाठी पैसे नाहीत, असं पश्चिम महाराष्ट्रातील आमदारांचं म्हणणं आहे. त्यामुळे सत्तेतून बाहेर पडण्याचा निर्णय तूर्तास लांबणीवर पडला आहे. दरम्यान सर्व आमदारांचं एकमत असेल तर आजही सत्तेतून बाहेर पडण्याचा निर्णय घेऊ, असं आश्वासन उद्धव ठाकरे यांनी आमदारांना दिलं. मात्र आमदारांचं एकमत नसल्याने शिवसेनेने अल्टिमेटम दिला असला तरी हा अल्टिमेटम आता जवळपास लांबणीवर पडला आहे. भरत गोगावले-रामदास कदम यांच्यात वाद रायगडमधील आमदार भरत गोगावले आणि पर्यावरण मंत्री रामदास कदम यांच्यात वाद झाला. “आगामी निवडणुकीत मंत्र्यांची भूमिका काय असणार?, असा प्रश्न आमदार भरत गोगावलेंनी विचारला. शिवाय, “मंत्र्यांनी आमच्याबरोबर व्यवस्थित बोलावं. आम्हाला मंत्री व्हायचं नाही.”, असेही गोगावले म्हणाले. यावर रामदास कदम हे गोगावलेंना उद्देशून म्हटले, “सर्व मंत्र्यांना एका पिंजऱ्यात उभं करु नका. सरळ मंत्र्यांचं नाव घ्या.” त्याचसोबत, “मी आत्ताच्या आत्ता ‘मातोश्री’वर राजीनामा द्यायला तयार आहे, असेही कदम म्हणाले. संबंधित बातमी : उद्धव ठाकरेंसमोर सेना मंत्री-आमदारांमध्ये खडाजंगी, निलम गोऱ्हे रडल्या! 

महत्त्वाच्या बातम्या

Maharashtra Breaking News LIVE: ठाण्यात पावसाचा जोर वाढला! वंदना डेपो, बाजारपेठ परिसरात पाणी साचण्यास सुरुवात
Maharashtra Breaking News LIVE: ठाण्यात पावसाचा जोर वाढला! वंदना डेपो, बाजारपेठ परिसरात पाणी साचण्यास सुरुवात
Mumbai News: '3 तास खोटं बोलले, मग वाशीला पाठवलं...', ऐरोली मनपा रुग्णालयाच्या 'त्या' डोसमुळे संपूर्ण कुटुंब उद्ध्वस्त; मृत गर्भवती सोनम डोंगरेंच्या पतीने मांडली व्यथा
'3 तास खोटं बोलले, मग वाशीला पाठवलं...', ऐरोली मनपा रुग्णालयाच्या 'त्या' डोसमुळे संपूर्ण कुटुंब उद्ध्वस्त; मृत गर्भवती सोनम डोंगरेंच्या पतीने मांडली व्यथा
Mumbai Rain Updates: मुंबईत मागील 24 तासांत अतिवृष्टी, रेल्वे ट्रॅकवर पाणी साचलं, तिन्ही मार्गावरील लोकल वाहतूक उशिराने; रस्तेही पाण्याने तुडुंब
मुंबईत मागील 24 तासांत अतिवृष्टी, रेल्वे ट्रॅकवर पाणी साचलं, तिन्ही मार्गावरील लोकल वाहतूक उशिराने; रस्तेही पाण्याने तुडुंब
Maharashtra Rain Update: मुंबईसह 'या' चार जिल्ह्यांमध्ये पुढील 3 तास महत्त्वाचे, हवामान विभागाकडून'रेड अलर्ट' जारी
मुंबईसह 'या' चार जिल्ह्यांमध्ये पुढील 3 तास महत्त्वाचे, हवामान विभागाकडून'रेड अलर्ट' जारी

व्हिडीओ

Gold-Silver Price Today : जुलैच्या पहिल्याच दिवशी सोने-चांदी स्वस्त; जाणून घ्या आजचे नवे दर!
Zero Hour Full : खासदार, आमदारांच्या फुटीनंतर आता ठाकरेंनी आत्मचिंतन करायला हवं असं वाटतं का?
Uddhav Thackeray Special Report : ऑपरेशन टायगरनंतर उद्धव ठाकरे आत्मचिंतन करणार?
Raj Thackeray Special Report : फोडाफोडी, ऑपरेशनवर राज ठाकरेंची टीका, भाजपला इशारा
Satej Patil on Sachin Ahir : सचिन अहिर फुटले, आता सतेज पाटील म्हणतात...

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
दगडी खाणीत 40 फूट उंचीवरून महाकाय दगड अंगावर कोसळला; रोजंदारीवरील आठ कामगार जाग्यावर गतप्राण, जखमीचा आकडा अजूनही निश्चित नाही
दगडी खाणीत 40 फूट उंचीवरून महाकाय दगड अंगावर कोसळला; रोजंदारीवरील आठ कामगार जाग्यावर गतप्राण, जखमीचा आकडा अजूनही निश्चित नाही
Ketan Agrawal Case Pune: हातात बाटली, फोनवरून मोठ्या आवाजात शिव्या अन् नंतर चेतनला मारलेली मिठी, सियाचा पबमधील VIDEO समोर
हातात बाटली, फोनवरून मोठ्या आवाजात शिव्या अन् नंतर चेतनला मारलेली मिठी, सियाचा पबमधील VIDEO समोर
Gokul Election: 'गोकुळ' गुजरातच्या दावणीला बांधायचा आहे का? जाब विचारण्याची धमक महायुतीमधील एकाही नेत्यामध्ये नाही; राजू शेट्टींचा हल्लाबोल
'गोकुळ' गुजरातच्या दावणीला बांधायचा आहे का? जाब विचारण्याची धमक महायुतीमधील एकाही नेत्यामध्ये नाही; राजू शेट्टींचा हल्लाबोल
Pune News: पुण्यातील पोलीस उपनिरीक्षकाचं निलंबन, रात्रीच्या वेळी गस्त घालतानाची कॅफेतील 'ती' चूक नडली, व्हिडीओ व्हायरल, नेमकं काय घडलं?
पुण्यातील पोलीस उपनिरीक्षकाचं निलंबन, रात्रीच्या वेळी गस्त घालतानाची कॅफेतील 'ती' चूक नडली, व्हिडीओ व्हायरल, नेमकं काय घडलं?
Ram Mandir: राम मंदिरातील दानपेटीतील राजरोस लूट, आता आरोपीचा भाऊ हातात नोटांचा ढीग घेऊन जातानाचा व्हिडिओ समोर!
राम मंदिरातील दानपेटीतील राजरोस लूट, आता आरोपीचा भाऊ हातात नोटांचा ढीग घेऊन जातानाचा व्हिडिओ समोर!
England vs India, 1st T20I: पहिल्या टी-20 सामन्यात पावसाचा खेळ झाला, पण अभिषेक शर्मा अन् कॅप्टन श्रेयस अय्यरनं पराक्रम नावावर केला
पहिल्या टी-20 सामन्यात पावसाचा खेळ झाला, पण अभिषेक शर्मा अन् कॅप्टन श्रेयस अय्यरनं पराक्रम नावावर केला
Devendra Fadnavis: ठाकरे गटातील सहापैकी दोन फुटीर खासदारांना भाजपत प्रवेश करायचा होता, पण त्यांना का रोखलं? सीएम फडणवीसांनीच सांगितली पडद्यामागची स्टोरी
ठाकरे गटातील सहापैकी दोन फुटीर खासदारांना भाजपत प्रवेश करायचा होता, पण त्यांना का रोखलं? सीएम फडणवीसांनीच सांगितली पडद्यामागची स्टोरी
Ketan Agrawal Case Pune: इंडोनेशियाची ट्रिप कॅन्सल, वारंवार भांडणं अन् चेतनचा येणारा फोन..., केतन आग्रवाल केसमध्ये वडिलांच्या FIR मधून समोर आलेलं धक्कादायक वास्तव!
इंडोनेशियाची ट्रिप कॅन्सल, वारंवार भांडणं अन् चेतनचा येणारा फोन..., केतन आग्रवाल केसमध्ये वडिलांच्या FIR मधून समोर आलेलं धक्कादायक वास्तव!
Embed widget