एक्स्प्लोर

युतीसाठी मनसेने दिलेली टाळी उद्धव ठाकरेंनी झिडकारली

मुंबई : शिवसेना आणि मनसे हे दोन्ही पक्ष निवडणुकांच्या तोंडावर युती करण्याच्या शक्यता मावळल्या आहेत. युतीसाठी अद्याप कोणाचाही प्रस्ताव आलेला नसून आपण कोणाशीही युती करणार नसल्याचं शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी स्पष्ट केलं आहे. युतीसाठी कुठल्याही पक्षाकडून प्रस्ताव आलेला नाही, मात्र कोणाशीही युती करण्याचा विचार नाही, असं म्हणत उद्धव ठाकरेंनी शिवसेना-मनसे युतीच्या शक्यता फेटाळून लावल्या आहेत. दहा महापालिका आणि सर्व जिल्हा परिषदेच्या निवडणुकांमध्ये शिवसेना स्वबळावर लढणार असल्याचा पुनरुच्चार उद्धव ठाकरेंनी केला. आम्ही पूर्ण सामर्थ्याने मैदानात उतरत आहोत, असं सांगत संपूर्ण महाराष्ट्र भगवा करण्याचा मानसही त्यांनी यावेळी बोलून दाखवला. मनसेचे नेते बाळा नांदगावकर यांनी शिवसेनेच्या पहिल्या फळीतील नेत्यांची भेट घेतली होती. उद्धव ठाकरे यांच्याशी मात्र नांदगावकरांची भेट होऊ शकली नाही. तरीही शिवसेना-मनसे युती होण्याची आशा समर्थकांमध्ये निर्माण झाली होती. नांदगावकर यांनी मनसेचा संदेश शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांना दिला. राज ठाकरे युती करण्यासाठी अनुकूल असून, तुमची इच्छा असल्यास राज ठाकरे आपली भेट घेतील, असा निरोप दिला. उद्धव ठाकरेंच्या वक्तव्यानंतर सेना-मनसे एकत्र येण्याची शक्यता संपुष्टात आली आहे. शिवसेनेची उमेदवार यादी अंतिम टप्प्यात आहे, त्यावर बैठकांमध्ये चर्चा सुरु आहे. त्यामुळे पुन्हा युतीच्या प्रस्तावावर नव्याने बोलणी करण्याची शिवसेनेची तयारी नसल्याचं बोललं जात आहे.

राज-उद्धव एकत्र आल्यास इतिहास घडेल, मनोहर जोशींना विश्वास

राज-उद्धव एकत्र आल्यास इतिहास घडेल, असा विश्वास शिवसेनेचे ज्येष्ठ नेते मनोहर जोशी यांनी व्यक्त केला. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आणि मनसे अध्यक्ष राज ठाकरे या दोघा बंधूंनी एकत्र यावं, अशी सर्वांची इच्छा आहे. ते दोघे एकत्र आल्यास राज्याच्या राजकारणात इतिहास घडेल. मात्र त्यासाठी दोघांची इच्छा महत्त्वाची आहे, असं वक्तव्य मनोहर जोशी यांनी शनिवारी पुण्यात केलं.

संबंधित बातम्या :

मनसेसोबत युती अशक्य, शिवसेनेच्या सूत्रांची माहिती

..तर राज ठाकरे स्वत: 'मातोश्री'वर जाणार?

दोन्ही ठाकरे बंधू फार काळ वेगळे राहू शकत नाही: विखे-पाटील

राज ठाकरेंचा निरोप घेऊन बाळा नांदगावकर ‘मातोश्री’वर

राज-उद्धव एकत्र आल्यास इतिहास घडेल, मनोहर जोशींना विश्वास

मनसेच्या प्रस्तावाबाबत उद्धव ठाकरे निर्णय घेतील : राऊत

महत्त्वाच्या बातम्या

Maharashtra Rain LIVE: राज्यात मुसळधार पावसाचं धुमशान, मुंबईला झोडपलं, रायगड, रत्नागिरी, चिपळुणवर पुराचं सावट, मिसिंग लिंकवर दरड कोसळल्यामुळे मुंबई-पुणे महामार्ग ठप्प
Maharashtra Rain LIVE: राज्यात मुसळधार पावसाचं धुमशान, मुंबईला झोडपलं, रायगड, रत्नागिरीवर पुराचं सावट, मिसिंग लिंकवर दरड कोसळल्यामुळे मुंबई-पुणे महामार्ग ठप्प
Mumbai Goa Highway Rain: राज्यात पावसाचा हाहा:कार! मुंबई-गोवा महामार्ग ठप्प, मिसिंग लिंकवर दरड कोसळली, खोपोली-पेण महामार्ग पाण्याखाली
राज्यात पावसाचा हाहा:कार! मुंबई-गोवा महामार्ग ठप्प, मिसिंग लिंकवर दरड कोसळली, खोपोली-पेण महामार्ग पाण्याखाली
Maharashtra Rain: मुंबईसह उपनगरात मुसळधार पावसाचा रौद्रावतार, संकटांच वादळ आजही घोंघावणार, हवामान विभागाकडून राज्यभरातील 'या' जिल्ह्यांना अलर्ट, वाचा पावसाचे सर्व अपडेट्स
मुंबईसह उपनगरात मुसळधार पावसाचा रौद्रावतार, संकटांच वादळ आजही घोंघावणार, हवामान विभागाकडून राज्यभरातील 'या' जिल्ह्यांना अलर्ट, वाचा पावसाचे सर्व अपडेट्स
Mumbai Pune Expressway missing Link: मोठी बातमी: मिसिंग लिंकवर स्लॅब कोसळला, मुंबई-पुणे एक्स्प्रेस वेवरील वाहतूक ठप्प, प्रशासनाकडून महत्वाचं आवाहन
मोठी बातमी: मिसिंग लिंकवर स्लॅब कोसळला, मुंबई-पुणे एक्स्प्रेस वेवरील वाहतूक ठप्प, प्रशासनाकडून महत्वाचं आवाहन

व्हिडीओ

Anandache Paan : तीस लेखिका तीस संघर्ष, अनवट पुस्तकावर गप्पा, पाहा आनंदाचे पान
Jawhar Waterfall | 'मिनी महाबळेश्वर'चं मनमोहक रूप; धबधबे, धुकं अन् काचेचा व्ह्यूइंग ब्रिज - ABP Majha
Uddhav Thackeray | राम मंदिर देणगी प्रकरणावर ठाकरे आक्रमक; फडणवीसांचा जोरदार पलटवार | Special Report
Mumbai Rain Tree Fall | मुंबईच्या रस्त्यांवर मृत्यूच्या झाडांचं 'जाळं' | ABP Majha Special Report
Dr. Budhajirao Mulik On Majha Katta :शेतकरी राजा कधी होईल? कृषितज्ज्ञ बुधाजीराव मुळीक माझा कट्ट्यावर

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Mumbai Goa Highway Rain: राज्यात पावसाचा हाहा:कार! मुंबई-गोवा महामार्ग ठप्प, मिसिंग लिंकवर दरड कोसळली, खोपोली-पेण महामार्ग पाण्याखाली
राज्यात पावसाचा हाहा:कार! मुंबई-गोवा महामार्ग ठप्प, मिसिंग लिंकवर दरड कोसळली, खोपोली-पेण महामार्ग पाण्याखाली
Maharashtra Rain LIVE: राज्यात मुसळधार पावसाचं धुमशान, मुंबईला झोडपलं, रायगड, रत्नागिरी, चिपळुणवर पुराचं सावट, मिसिंग लिंकवर दरड कोसळल्यामुळे मुंबई-पुणे महामार्ग ठप्प
Maharashtra Rain LIVE: राज्यात मुसळधार पावसाचं धुमशान, मुंबईला झोडपलं, रायगड, रत्नागिरीवर पुराचं सावट, मिसिंग लिंकवर दरड कोसळल्यामुळे मुंबई-पुणे महामार्ग ठप्प
Mutual Fund : गेल्या एका वर्षातील सर्वोत्तम कामगिरी कोणत्या म्युच्युअल फंड्सनं केली, जाणून घ्या यादी
गेल्या एका वर्षातील सर्वोत्तम कामगिरी कोणत्या म्युच्युअल फंड्सनं केली, जाणून घ्या यादी
Raigad Palghar Rain Alert : रायगड आणि पालघरमध्ये पावसाचा 'रेड अलर्ट', सोमवारी शाळा-महाविद्यालयांना सुट्टी जाहीर!
रायगड आणि पालघरमध्ये पावसाचा 'रेड अलर्ट', सोमवारी शाळा-महाविद्यालयांना सुट्टी जाहीर!
Ram Mandir: राम मंदिरातील राजरोस लूट समोर आली, 'श्री राम जन्मभूमी तीर्थ क्षेत्र ट्रस्ट'ला RTI अंतर्गत आणा, खासदाराचे थेट अमित शाहांना पत्र
राम मंदिरातील राजरोस लूट समोर आली, 'श्री राम जन्मभूमी तीर्थ क्षेत्र ट्रस्ट'ला RTI अंतर्गत आणा, खासदाराचे थेट अमित शाहांना पत्र
Mumbai Pune Expressway missing Link: मोठी बातमी: मिसिंग लिंकवर स्लॅब कोसळला, मुंबई-पुणे एक्स्प्रेस वेवरील वाहतूक ठप्प, प्रशासनाकडून महत्वाचं आवाहन
मोठी बातमी: मिसिंग लिंकवर स्लॅब कोसळला, मुंबई-पुणे एक्स्प्रेस वेवरील वाहतूक ठप्प, प्रशासनाकडून महत्वाचं आवाहन
Sensex : सेन्सेक्सवरील टॉप 10 पैकी 6 कंपन्यांची पाच दिवसात 1 लाख कोटींची कमाई, भारती एअरटेलला सर्वाधिक फायदा तर एल अँड टी आणि रिलायन्सला फटका
सेन्सेक्सवरील टॉप 10 पैकी 6 कंपन्यांचे गुंतवणकदार मालामाल, 1 लाख कोटींची कमाई, चार कंपन्यांना फटका
Ayatollah Ali Khamenei: इराणचे सर्वोच्च धर्मगुरु अयातुल्ला खामेनींना शेवटचा निरोप देण्यासाठी कोट्यवधी देशवासी जनता फक्त काळ्या रंगाच्या पोशाखातच का पोहोचली?
इराणचे सर्वोच्च धर्मगुरु अयातुल्ला खामेनींना शेवटचा निरोप देण्यासाठी कोट्यवधी देशवासी जनता फक्त काळ्या रंगाच्या पोशाखातच का पोहोचली?
Embed widget