एक्स्प्लोर
आमच्या खिशावर मा. गो. वैद्यांचं लक्ष का?: शिवसेना
मुंबई: ‘राजीनामे नुसते खिशात ठेऊन चालत नाही तर ते द्यावे लागतात.’ शिवसेनेला असा खोचक सल्ला देणाऱ्या संघाचे ज्येष्ठ नेते मा.गो वैद्य यांना शिवसेनेनंही प्रत्युत्तर दिलं आहे. वैद्य यांच्या प्रतिक्रियेनंतर शिवसेना नेत्या निलम गोऱ्हे यांनी एबीपी माझाशी बोलताना शिवसेनेची भूमिका स्पष्ट केली.
‘वैद्य सर हे खूप ज्येष्ठ विचारवंत आहेत. त्यांचं वय आणि अनुभव पाहता आणि त्यांच्या वयाचा सन्मान म्हणून मी त्यांच्यावर प्रतिक्रिया देणं मला योग्य वाटत नाही. पण शिवसेनाप्रमुखांनी आम्हाला हीच शिकवण दिली आहे की, आपली भूमिका रोखठोक आणि स्पष्ट असली पाहिजे.’ असं निलम गोऱ्हे म्हणाल्या.
‘आमच्या खिशावर वैद्य सरांचं लक्ष का? याचा मला खेद वाटतो. महाराष्ट्राचे चार तुकडे करण्याचं तुम्ही वारंवार बोलता, महाराष्ट्राच्या अस्मितेचा विचार तुम्ही करत नाही. संयुक्त महाराष्ट्राच्या 105 हुतात्म्यांची बूझ तुम्ही ठेवत नाही. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे योग्य त्या वेळी योग्य तो निर्णय घेतील.’ अशी टीकाही त्यांनी वैद्य यांच्यावर केली.
‘असा अनाहूत सल्ला दिला जातो त्याला शून्य महत्व असतं. एवढं वय झालं तरी हे त्यांना कळू नये ही खरोखर शोकांतिक आहे.’ अशी बोचरी टीकाही गोऱ्हे यांनी केली.
संबंधित बातम्या:
राजीनामे खिशात ठेऊन चालत नाही ते द्यावे लागतात: मा.गो.वैद्य
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
मुंबई
निवडणूक
पुणे
विश्व
Advertisement