एक्स्प्लोर
शिवसेना मंत्र्यांच्या राजीनाम्याची तारीख ठरली?

मुंबई: खिशात राजीनामा घेऊन फिरणाऱ्या शिवसेना मंत्र्यांच्या राजीनाम्याची तारीख ठरल्याचं सांगण्यात येत आहे. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या 18 फेब्रुवारीच्या मुंबईतील सभेत, शिवसेना मंत्री राजीनामे देणार असल्याचं सांगण्यात येत आहे. उद्धव ठाकरेंकडे हे राजीनामे सोपवण्याची चिन्हं आहेत. मुंबई महापालिकेसाठी 21 फेब्रुवारीला मतदान होत आहे. त्या पार्श्वभूमीवर भाजपवर दबाव टाकण्यासाठी आणि मतदारांमध्ये संदेश देण्यासाठी शिवसेना ही खेळी करण्याच्या तयारीत आहे. यापूर्वी कल्याण-डोंबिवली महापालिका निवडणुकीत सार्वजनिक बांधकाम मंत्री एकनाथ शिंदे यांनी जसं भर सभेत उद्धव ठाकरे यांच्याकडे राजीनामा सुपूर्द केला होता, तसंच मुंबई महापालिका निवडणुकीत सेनेचे मंत्री मुख्यमंत्र्यांना राजीनामे न देता उद्धव ठाकरे यांना राजीनामे देण्याची शक्यता आहे. राजीनामे खिशात दरम्यान, शिवसेना मंत्र्यांचे राजीनामे खिशात असल्याचा दावा परिवहन मंत्री दीवाकर रावते यांनी केला होता. शिवसेना मंत्र्यांनी काल मुख्यमंत्र्यांची भेट घेतली. यानंतर रावतेंनी त्यांचं राजीनामा पत्रही दाखवलं होतं. शिवसेना मंत्र्यांनी ‘वर्षा’ बंगल्यावर जाऊन मुख्यमंत्र्यांची भेट घेतली. त्यावेळी शेतकऱ्यांच्या कर्जमाफीबद्दल शिवसेनेच्या मंत्र्यांनी मुख्यमंत्र्यांशी चर्चा केली. ‘वर्षा’ बंगल्याबाहेर आल्यानंतर परिवहन मंत्री दिवाकर रावतेंनी राजीनाम्याचं पत्रच दाखवलं. संबंधित बातम्या
राजीनामे खिशात नाहीत, पण आदेश येताच मंत्रिपद सोडू : शिवतारे
पक्षविरोधी कारवाई करणाऱ्या 26 शिवसैनिकांची पक्षातून हकालपट्टी
सात शिवसैनिकांचा अपघाती मृत्यू, उद्धव यांची विलेपार्लेतील सभा रद्द
“राजीनामा खिशात, फक्त पक्षप्रमुखांचा आदेश हवा”
शेतकऱ्यांच्या कर्जमाफीसाठी सेना मंत्र्यांची फौज ‘वर्षा’ बंगल्यावर
आणखी वाचा























