एक्स्प्लोर
भाजपच्या मानगुटीवर पराभवाची भीती बसली आहे : संजय राऊत
‘शिवसेनेने काय करायचं हा निर्णय फक्त उद्धव ठाकरे घेतील, इतर कोणी त्यात लुडबूड करु नये.’ अशा शब्दात संजय राऊत यांनी मुनगंटीवार यांना उत्तर दिलं आहे.
मुंबई : ‘शिवसेनेच्या मुखपत्रात काय छापून येतं याकडे लक्ष देऊ नका. पण पुढची निवडणूक सेना - भाजप एकत्र लढणार.’ असं वक्तव्य करणाऱ्या भाजप नेते सुधीर मुनगंटीवार यांच्या शिवसेना खासदार संजय राऊत यांनी खरपूस समाचार घेतला आहे.
‘शिवसेनेने काय करायचं हा निर्णय फक्त उद्धव ठाकरे घेतील, इतर कोणी त्यात लुडबूड करु नये.’ अशा शब्दात संजय राऊत यांनी मुनगंटीवार यांना उत्तर दिलं आहे.
‘भाजपच्या लोकांना झोपेतसुद्धा ‘सामना’ दिसतो आणि ते दचकून उठतात, पराभवाची भीती भाजपच्या मानगुटीवर बसली आहे. गेट वेल सून माय फ्रेंड बीजेपी.’ असं म्हणत संजय राऊत यांनी भाजपवर खोचक टीका केली.
शिवसेनेचा सुधीर मुगंटीवारांना टोला
शिवसेनेच्या मुखपत्राचे संपादक उद्धव ठाकरे आहेत. हे सुधीर मुनंगटीवार विसरलेले दिसतात. शिवसेनेने पुढील निवडणूका स्वबळावर लढण्याची घोषणा उद्धव ठाकरे यांनी केली आहे. शिवसेना राष्ट्रीय कार्यकारिणीच्या सभेत ‘एकला चलो रे’ या भूमिकेवर शिक्कामोर्तब झालं आहे.
सुधीर मुनगंटीवार नेमकं काय म्हणाले होते?
‘शिवसेना आणि भाजप पुढच्या निवडणुका एकत्रच लढणार’, असा थेट दावा राज्याचे अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी विधानसभेतच केला होता.
‘शिवसेनेच्या मुखपत्रात काय छापून येतं याकडे लक्ष देऊ नका. पण पुढची निवडणूक सेना - भाजप एकत्र लढणार.’ असा दावा मुनगंटीवार यांनी विरोधकांना उद्देशून केला.
‘आमच्यात कितीही वाद झाले तरी आमचं आम्ही बघून घेऊ. काँग्रेस-राष्ट्रवादी 1999 मध्ये असेच भांडले आणि नंतर एकत्र झाले होते. आता तुम्हाला एकमेकांची गरज असल्याने एकत्र आलात त्यामुळे आम्हीही वेगळं न लढता एकत्र येऊ.’ असा विश्वास मुनगंटीवार यांनी सभागृहात विरोधकांना प्रत्युत्तर देताना व्यक्त केला होता.
संबंधित बातम्या :
शिवसेना-भाजप पुढच्या निवडणुका एकत्रच लढणार : मुनगंटीवार
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
महाराष्ट्र
महाराष्ट्र
क्रिकेट
रायगड
Advertisement