एक्स्प्लोर
कारचोरी प्रकरणी शिवसेना उपविभागप्रमुखाला बेड्या

मीरा रोड : शिवसेनेच्या उपविभागप्रमुखाने केलेल्या कारचोरीमुळे पक्षावर नामुष्कीची वेळ ओढवली आहे. मीरा रोडच्या विभाग क्रमांक 7 आणि 8 चा उपविभागप्रमुख प्रफुल्ल शिरसाटला कार चोरीच्या आरोपात पोलिसांनी अटक केली आहे.
प्रफुल्ल शिरसाट सहा वर्षांपासून अॅड. साधना पाटील यांच्याकडे शिरसाट ड्रायव्हरचं काम करायचा. त्यांचीच कार शिरसाटने चोरल्याचं उघडकीस आलं आहे. 9 डिसेंबर 2006 रोजी शिरसाटनं साधना पाटील यांची इनोव्हा कार चोरली.
त्यानंतर नंबर प्लेट बदलून शिरसाट इनोव्हाचा बिनदिक्कतपणे वापर करत होता. अंधेरी आणि इतर भागांमध्ये शिरसाटला फिरताना पाहिल्याचं काही जणांनी अॅड. साधना पाटलांना सांगितलं. गाडीचा नंबर बदलला असला तरी रंग सारखाच असल्यानं पाटील यांचा संशय बळावला. त्यानुसार त्यांनी पोलिसात तक्रार दाखल केली.
अखेर मीरा रोड पोलिसांनी इनोव्हा कारचा चेसीज नंबर आणि इतर कागदपत्रं तपासली असता संबंधित इनोव्हा साधना पाटील यांचीच असल्याचं समोर आलं. यानंतर पोलिसांनी प्रफुल्ल शिरसाटला गजाआड केलं आहे.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
बीड
बातम्या
पुणे
क्राईम
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
