एक्स्प्लोर
Advertisement
शिवाजी पार्कवर शिवसेनेचा सुवर्ण महोत्सवी दसरा मेळावा
मुंबई : दादरच्या शिवाजी पार्कवरील शिवसेनेच्या दसरा मेळाव्याकडे सर्वांचं लक्ष लागून राहिलं आहे. या मेळाव्याची जय्यत तयारी करण्यात आली असून मराठा क्रांती मोर्चा, व्यंगचित्र वाद, मुंबई महापालिका निवडणुका, शिवसेना-भाजपमधील धुसफूस या मुद्द्यांवर पक्षप्रमुख उद्धव ठाकरे काय भाष्य करतात याची उत्सुकता आहे.
पर्यावरणदृष्ट्या संवेदनशील परिसर असल्याने या भागात लाऊडस्पीकर वापरण्यास परवानगी नव्हती. मात्र शिवाजी पार्क पोलिसांनी शिवसेनेला आता लाऊडस्पीकरसाठी परवानगी दिली आहे. यंदा शिवसेनेचा सुवर्ण महोत्सवी दसरा मेळावा आहे.
16 ऑगस्ट 2016 च्या उच्च न्यायालयाच्या निकालानुसार राज्यात सायलेंट झोनमध्ये लाऊडस्पीकर वापरण्यास बंदी आहे. त्यामुळे शिवसेनेच्या दसरा मेळाव्यात लाऊडस्पीकर वापरण्यास परवानगी नव्हती. परंतु शिवसेनेच्या अॅड. अनिल परब आणि मिलिंद नार्वेकर यांनी शिवाजी पार्क पोलिसांकडून लाऊडस्पीकरची परवानगी मिळवली. त्यामुळे शिवसेनेच्या दसरा मेळाव्याचा अखेरचा अडथळाही पार झाला आहे.
मात्र सायलेंट झोनमध्ये लाऊडस्पीकरला परवानगी मिळाल्याने, दरवर्षीप्रमाणे पर्यावरण आणि ध्वनी प्रदूषणाच्या नियमांवरुन शिवसेनेच्या दसरा मेळाव्याला विरोध करणारी, शिवाजी पार्कची रहिवासी संघटना, वेकॉम ग्रुपच्या भूमिकेकडे सगळ्यांचं लक्ष असेल.
संबंधित बातम्या :
पावसाचं सावट दूर, शिवसेनेच्या दसरा मेळाव्याचा मार्ग मोकळा
शिवसेनेच्या दसरा मेळाव्याचं विघ्न दूर, लाऊडस्पीकरला परवानगी
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
निवडणूक
निवडणूक
निवडणूक
निवडणूक
Advertisement