परफ्युम खरेदी न केल्याने फेरीवाल्यांकडून युवक-युवतीला मारहाण; तरुणीचा टी-शर्ट फाडून अश्लील शिवीगाळ, दोघांना अटक
कल्याण रेल्वे स्थानकावर दोन मित्र-मैत्रिणांना मारहाण करण्यात आल्याची धक्कादायक घटना घडली. परफ्युम खरेदी न केल्याने फेरीवाल्यांकडून तरुणी आणि तिच्या मित्राला भररस्त्यात बेदम मारहाण करण्यात आली.

मुंबई : सध्या सर्वत्र दिवाळीची (Diwali) लगबग आणि खरेदी सुरू असल्याने बाजारपेठा फुलल्या आहेत. बाजारात खरेदीसाठी नागरिकांनी गर्दी केली असून नव्या कपड्यांसह, मिठाई दुकाने आणि इतरही खरेदीसाठी उत्साह दिसून येत आहे. त्यातच, मुंबईतील (Kalyan) कल्याण रेल्वे स्थानक परिसरात परफ्युम खरेदीसाठी गेलेल्या युवक-युवतीला फेरीवाल्यांकडून मारहाण करण्यात आल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. याप्रकरणी, बजरंग दलाने पुढाकार घेतल्यानंतर पोलिसांनी (Police) आरोपींना अटक केली आहे.
कल्याण रेल्वे स्थानकावर दोन मित्र-मैत्रिणांना मारहाण करण्यात आल्याची धक्कादायक घटना घडली. परफ्युम खरेदी न केल्याने फेरीवाल्यांकडून तरुणी आणि तिच्या मित्राला भररस्त्यात बेदम मारहाण करण्यात आली. तरुणीचा टी-शर्ट फाडून अश्लील शिवीगाळ केल्याने स्टेशन परिसरात फेरीवाल्याची दहशत असल्याचा संताप पुन्हा एकदा प्रवासी आणि ग्राहकांमध्ये पाहायला मिळत आहे. या फेरीवाल्यांबद्दल ग्राहकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले असून ऐन सणासुदीच्या काळात त्यांची दंडेलशाही पोलीस वठणीवर आणणार का, असा सवालही यानिमित्ताने विचारला जात आहे.
याप्रकरणी, महात्मा फुले पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलिसांनी आरोपीला बेड्या ठोकत पुढील तपास केला सुरू आहे. महापौरांच्या कारवाईच्या आदेशानंतरही फेरीवाले फुटपाथ आणि तत्सम परिसरात कायम असल्याचे दिसून येते. दरम्यान, याप्रकरणी तरुणीला तक्रारीसाठी पाच तास पोलीस ठाण्यात थांबवल्याने सकल हिंदू समाज आणि बजरंग दल आक्रमक झाला. येथील परप्रांती फेरीवाल्यां कारवाई झाली नाही तर रस्त्यावरून फेरीवाल्यांना धडा शिकवणार असल्याचा इशाराही बजरंग दलाकडून प्रशासनाला देण्यात आला.
उकळतं मटण पत्नीच्या अंगावर फेकलं, पतीविरुद्ध गुन्हा
कल्याण पश्चिमेतील वालधुनी परिसरात राहणाऱ्या अमिर खान याने पत्नी गुलशनकडे पैशांची मागणी केली होती. मात्र, पत्नीने पैसे देण्यास नकार दिल्याने दोघांमध्ये वाद सुरू झाला. या वादातून संतापलेल्या अमिरने पत्नीला शिवीगाळ करत मारहाण करण्यास सुरुवात केली. इतकेच नव्हे तर आपल्या पाच वर्षांच्या मुलाच्या सदऱ्याची गळपट्टी पकडून त्यालाही बाथरूमच्या दिशेने फरफटत नेले. मुलाला वाचवण्यासाठी गुलशनने धाव घेतली असता दोघांमध्ये झटापट झाली. याचवेळी स्वयंपाकघरात गॅसवर मटण शिजत होते. संतापलेल्या अमिरने उकळत्या मटणाचे पातेले उचलून पत्नीच्या दिशेने फेकले. यातील गरम पाणी आणि मटण गुलशनच्या हातापायांवर पडले, तर जवळच असलेल्या पाच वर्षांच्या चिमुकल्याच्याही अंगावर उकळते पाणी पडले. या घटनेत माय-लेक गंभीररीत्या भाजले. त्यानंतर दोघांना केडीएमसीच्या रुक्मिणीबाई रुग्णालयात दाखल करण्यात आले. उपचारानंतर गुलशनने महात्मा फुले पोलीस ठाण्यात पतीविरोधात तक्रार दाखल केली आहे. या तक्रारीनुसार पोलिसांनी अमिर खानविरोधात गुन्हा दाखल केला असून पुढील तपास सुरू आहे.
हेही वाचा





















