शिंदेंचं ठरलं, शिवाजी पार्कसाठीचा अर्ज मागे घेणार, दसरा मेळाव्यासाठी ठाकरेंचा मार्ग मोकळा?
Uddhav Thackeray vs CM Eknath Shinde: यंदाही दोन्ही गटांनी शिवाजी पार्कसाठी अर्ज करत दावा केला होता. पण, आता शिंदे गटानं याबाबत एक पाऊल मागे येत, शिवाजी पार्कऐवजी इतर मैदानांच्या पर्यायाचा विचार करण्याचा निर्णय घेतला आहे.
Shivsena Dasara Melava Row : यंदा शिवाजी पार्कात दसरा मेळावा (Dasara Melava 2023) कोणाचा? यावरुन शिंदे गट (Shinde Group) आणि ठाकरे गट (Thackeray Group) आक्रमक झाले होते. आता मात्र शिंदे गटानं एक पाऊल मागे घेत, दसरा मेळाव्याचा शिवाजी पार्क मैदानावरचा आपला दावा सोडला आहे. मुंबई महापालिकेकडे (BMC) शिंदे गटानं शिवाजी पार्कसाठी केलेला अर्ज शिंदे गट मागे घेणार आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या सूचनेनंतर सदा सरवणकर स्वतः मुंबई महापालिकेच्या कार्यालयात जाऊन अर्ज मागे घेणार असल्याची माहिती मिळत आहे.
शिवसेनेचा दसरा मेळावा प्रत्येक शिवसैनिकासाठी अत्यंत महत्त्वाचा आणि नवचैतन्य जागवणारा असतो. पण शिवसेनेतील अंतर्गत बंडाळीनंतर इतर अनेक मुद्द्यांप्रमाणेच दसरा मेळाव्यावरुनही वादावादी झाली. गेल्या वर्षी दसरा मेळाव्याचा वाद हायकोर्टापर्यंत गेला होता. यंदाही दोन्ही गटांनी शिवाजी पार्कसाठी अर्ज करत दावा केला होता. पण, आता शिंदे गटानं याबाबत एक पाऊल मागे येत, शिवाजी पार्कऐवजी इतर मैदानांच्या पर्यायाचा विचार करण्याचा निर्णय घेतला आहे. शिंदे गटाचा यंदाचा मेळावा दक्षिण मुंबईतील क्रॉस मैदान किंवा ओव्हल ग्राउंडवर घेण्यात येणार असल्याची माहिती शिंदे गटाचे नेते आणि मंत्री दीपक केसरकर यांनी दिली. तसेच, आपण इतर मैदानांची चाचपणी करतोय, त्यामुळे शिवाजी पार्कसाठीचा अर्ज मागे घेण्याच्या सूचना स्वतः मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिल्या आहेत. शिवाजी पार्कवर दसरा मेळाव्यासाठी सदा सरवणकरांनी महापालिकेकडे अर्ज केला होता. आता स्वतः सदा सरवणकच हा अर्ज मागे घेणार असल्याची माहिती मिळत आहे.
दसरा हा हिंदूंचा महत्वाचा सण !
— Sada Sarvankar (@misadasarvankar) October 10, 2023
शिवसैनिकांसाठी हा महोत्सवच असतो.
माननीय शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे गेली ५० वर्षे शिवतीर्थावरून ज्वलंत हिंदुत्वाचे विचार अखंड पणे देत आले.
यावर्षी देखील शिवसेनेचा दसरा मेळावा त्याच उत्साहात व्हावा व हिंदूसणांमध्ये एकमेकांमधील वाद टाळावा म्हणून…
शिंदेंचं एक पाऊल मागे, ठाकरेंचा मार्ग मोकळा?
मंत्री दीपक केसरकरांच्या वक्तव्यानंतर शिंदे गटानं एक पाऊल मागे घेतल्याच्या चर्चा राजकीय वर्तुळात सुरू झाल्या आहेत. अशातच आता ठाकरेंना दसरा मेळाव्यासाठी शिवाजी पार्क मैदान मिळाल्याचा मार्ग मोकळा झाला असल्याचं बोललं जात आहे. मात्र अद्याप मुंबई महानगरपालिकेकडून शिवाजी पार्क मैदानाबाबत कोणताही निर्णय घेण्यात आलेला नाही. त्यामुळे शिंदे गटानं एक पाऊल मागे घेत जरी दसरा मेळाव्याचं ठिकाण बदललं असलं तरी, ठाकरेंचा दसरा मेळावा शिवाजी पार्कवर होणार का? हा प्रश्न कायम आहेच. तसेच, शिंदे गटानं घेतलेली नमती भूमिका ठाकरेंना अडचणीत आणण्याची नवी खेळी तर नाही, अशा चर्चाही राजकीय वर्तुळात दबक्या आवाजात सुरू आहेत.
शिंदेंनी दसरा मेळाव्यासाठी नवे पर्याय शोधले असून शिवाजी पार्कसाठीचा अर्ज मागे घेण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे ठाकरेंना शिवाजी पार्कात दसरा मेळाव्यासाठी परवानगी मिळणार का? हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. सध्या मात्र शिवसेनेच्या शिंदे गटानं घेतलेल्या भूमिकेमुळे दसरा मेळाव्यासाठी शिवाजी पार्क नेमकं कोणाला मिळणार? हा वाद संपुष्टात आला आहे.
पाहा व्हिडीओ : Deepak Kesarkar : शिंदे गटाचा दसरा मेळावा ओव्हल आणि क्रॉस मैदानावर : केसरकर
महत्त्वाच्या इतर बातम्या :