एक्स्प्लोर

दंगलीत तेल ओतण्यापेक्षा पाणी ओता, ‘सामना’तून प्रकाश आंबेडकरांवर निशाणा

‘प्रकाश आंबेडकर यांनी या दंगलीत तेल ओतण्यापेक्षा पाणी ओतावे व स्वतःच्या राजकीय जीर्णोद्धारासाठी या दंगलीचा वापर करू नये.’

मुंबई : दलित संघटनांनी पुकारलेल्या बंद दरम्यान राज्यभरात निर्माण झालेल्या परिस्थितीवरुन, शिवसेनेनं सरकारला लक्ष्य केलं आहे. शिवसेनेचं मुखपत्र असलेल्या 'सामना'तून राज्यातील परिस्थितीवर सरकारची भूमिका काय? असा थेट सवाल विचारण्यात आला आहे. तर भारिप बहुजन महासंघाचे नेते प्रकाश आंबेडकर यांचाही अग्रलेखातून समाचार घेतला आहे. ‘प्रकाश आंबेडकर यांनी या दंगलीत तेल ओतण्यापेक्षा पाणी ओतावे व स्वतःच्या राजकीय जीर्णोद्धारासाठी या दंगलीचा वापर करू नये.’ अशा शब्दात शिवसेनेनं प्रकाश आंबेडकरांचा समाचार घेतला. एक नजर 'सामना'च्या अग्रलेखावर : * राज्यात ठिकठिकाणी उसळलेल्या हिंसाचारात सांडलेल्या रक्ताचा प्रत्येक थेंब महाराष्ट्राचा आहे. या सर्व परिस्थितीत आज सरकारची भूमिका नक्की काय आहे? पोलीस खात्याचे राजकारण व गृहखात्याचा भाजप झाल्याचे परिणाम राज्याला भोगावे लागत आहेत. निवडणूक लढवणे आणि सरकार व पोलिसांच्या मदतीने त्या जिंकत राहणे हेच एकमेव सरकारी कार्य बनते तेव्हा राज्यातील ठिणग्यांचा हा असा उद्रेक होतो. * महाराष्ट्रात जातीय तणाव वाढला तर हे राज्य तोडू पाहणाऱ्यांचे फावेल. महाराष्ट्राचे हित ज्यांना पाहवत नाही त्यांनाच हे जातीय दंगे हवे आहेत, पण राज्याच्या फडणवीस सरकारच्या कार्यक्षमतेवर आणि भूमिकेवर प्रश्नचिन्ह उभे करणारे प्रकार आता रोजच घडू लागले आहेत. हवा बदलत आहे व बुडबुडे फुटत आहेत. भीमा-कोरेगाव दंगलीची न्यायालयीन चौकशी करण्याचे आदेश मुख्यमंत्र्यांनी दिले आहेत. दंगलीनंतर प्रत्येक राज्यकर्ता असे आदेश देतच असतो. त्यात नवे ते काय? पण दंगलखोर प्रवृत्तीचे लोक महाराष्ट्रात पडद्यामागून सूत्रे हलवीत आहेत व बाजूच्या राज्यांतील लोक आमच्या राज्यात येऊन वातावरण बिघडवत आहेत याची कल्पना राज्यकर्त्यांना असायला हवी होती. * संभाजी भिडे यांचे शिव प्रतिष्ठान व मिलिंद एकबोटे यांची हिंदू एकता आघाडी यांनी मिळून भीमा-कोरेगावच्या विजयस्तंभाकडे आलेल्या जमावावर दगडफेक केली, हिंसाचार भडकवला असा आरोप भारिप बहुजन महासंघाचे प्रकाश आंबेडकर यांनी केला आहे. प्रकाश आंबेडकर यांनी या दंगलीत तेल ओतण्यापेक्षा पाणी ओतावे व स्वतःच्या राजकीय जीर्णोद्धारासाठी या दंगलीचा वापर करू नये. दंगल भडकवण्यापेक्षा पेटलेल्या जमावास शांत करणारा व दिशा देणारा हाच खरा नेता असतो. *मृताच्या नातेवाईकांना सरकारने दहा लाखांची मदत केली, पण गेल्या २४ तासांतील दंगलीने सरकारचे कोट्यवधीचे नुकसान झाले. सामान्य लोकांच्या गाड्या, घरांना, दुकानांना आगी लागल्या. त्यांचे नुकसान कोणी भरून द्यायचे? * सरकारने आता तरी निवडणुकांच्या चक्रव्यूहातून स्वतःला सोडवावे, जमिनीवर यावे. शिवसेनेशी लढायला सारे जीवन आहे. शिवसेनेस राजकारणातून खतम करण्यासाठी शक्ती पणास लावण्यापेक्षा महाराष्ट्राच्या शत्रूंशी लढा. संंबंधित बातम्या : सणसवाडी दगडफेकीची न्यायालयीन चौकशी होणार : मुख्यमंत्री दगडफेकीप्रकरणी भिडे गुरुजी, मिलिंद एकबोटेंवर गुन्हा

महत्त्वाच्या बातम्या

School Admission Age : शाळा प्रवेशासाठी बालकांचे वयाचे नवे निकष जाहीर, नर्सरी आणि पहिलीसाठी 'इतकी' वर्षे पूर्ण असणं बंधनकारक
शाळा प्रवेशासाठी बालकांचे वयाचे नवे निकष जाहीर, नर्सरी आणि पहिलीसाठी 'इतकी' वर्षे पूर्ण असणं बंधनकारक
मालेगाव सुपारी घोटाळा प्रकरण! FDA च्या पाच अधिकाऱ्यांचं निलंबन, मंत्री झिरवळ आणि तुकाराम मुंढेंची मोठी कारवाई
मालेगाव सुपारी घोटाळा प्रकरण! FDA च्या पाच अधिकाऱ्यांचं निलंबन, मंत्री झिरवळ आणि तुकाराम मुंढेंची मोठी कारवाई
Voter Registration : मतदार यादीत नाव नोंदणीसाठी राज्यात विशेष मोहीम, मतदान केंद्रांवर विशेष शिबिरांचं आयोजन, तारखा जाहीर
मतदार यादीत नाव नोंदणीसाठी राज्यात विशेष मोहीम, मतदान केंद्रांवर विशेष शिबिरांचं आयोजन, तारखा जाहीर
Same Language Subtitling : आता टीव्ही पाहता पाहता शिका मराठी, 'समान भाषा उपशीर्षक केंद्रा'चा ब्रिजेश सिंह यांच्या हस्ते शुभारंभ
आता टीव्ही पाहता पाहता शिका मराठी, 'समान भाषा उपशीर्षक केंद्रा'चा ब्रिजेश सिंह यांच्या हस्ते शुभारंभ

व्हिडीओ

Pune Election : मुख्यमंत्री म्हणाले, महायुती म्हणून एकत्र लढू, मात्र एकनाथ शिंदेंची वेगळी भूमिका,
Shetitil Navdurga : Rekha Rayate | ती स्वतः परदेशात गेली नाही, पण तिच्या 40 गुंठ्यांतली द्राक्षं परदेशात पोहोचली
Sanjay Raut On Amit Shah : अमित शाह यांचे डोळे म्युझियममध्ये ठेवले पाहिजे; संजय राऊत यांची टीका
Shetitil Navdurga | Pooja Gawli | खेळाच्या मैदानातून शेतीच्या बांधावर! कॅनोइंगमध्ये पदकं जिंकली…
Shivsena Pune Election : पुणे पदवीधरची जागा भाजपला सोडल्यानं शिवसेनेत नाराजी

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Gold Import: सप्टेंबरमध्ये सोन्याची आयात 81.27 टक्क्यांनी घटली, सलग दुसऱ्या महिन्यात ट्रेंड कायम, चांदीच्या आयातीमध्येही घसरण
सप्टेंबरमध्ये सोन्याची आयात 81.27 टक्क्यांनी घटली, सलग दुसऱ्या महिन्यात ट्रेंड कायम, जाणून घ्या कारण
School Admission Age : शाळा प्रवेशासाठी बालकांचे वयाचे नवे निकष जाहीर, नर्सरी आणि पहिलीसाठी 'इतकी' वर्षे पूर्ण असणं बंधनकारक
शाळा प्रवेशासाठी बालकांचे वयाचे नवे निकष जाहीर, नर्सरी आणि पहिलीसाठी 'इतकी' वर्षे पूर्ण असणं बंधनकारक
Election Commission : SIR वादाच्या भडक्यात निवडणूक आयोगाचा मोठा निर्णय! यूपी, मणिपूरसह 17 राज्यांसाठी SSR जाहीर; 1 जानेवारी 2027 कट-ऑफ डेट
SIR वादाच्या भडक्यात निवडणूक आयोगाचा मोठा निर्णय! यूपी, मणिपूरसह 17 राज्यांसाठी SSR जाहीर; 1 जानेवारी 2027 कट-ऑफ डेट
CJP : सीजेपीकडून सेंट्रल पार्कमध्ये लहरा दो तिरंगा मार्चचं आयोजन, NDMC नं पार्क 2 दिवस बंद ठेवण्याचा आदेश काढला, अभिजीत दीपकेंची प्रतिक्रिया समोर
सीजेपीचा लहरा दो तिरंगा मार्च रोखण्यास हायकोर्टाचा नकार, NDMC नं सेंट्रल पार्क बंद ठेवण्याचा आदेश काढला
Mumbai Firecracker Ban : दिवाळीत रस्त्यांवर फटाके फोडण्यास 'सुप्रीम' ब्रेक, मुंबई उच्च न्यायालयाचा मोठा आदेश; DJ आणि लेझर लाईट्सवरही निर्बंध
दिवाळीत रस्त्यांवर फटाके फोडण्यास 'सुप्रीम' ब्रेक, मुंबई उच्च न्यायालयाचा मोठा आदेश; DJ आणि लेझर लाईट्सवरही निर्बंध
Voter Registration : मतदार यादीत नाव नोंदणीसाठी राज्यात विशेष मोहीम, मतदान केंद्रांवर विशेष शिबिरांचं आयोजन, तारखा जाहीर
मतदार यादीत नाव नोंदणीसाठी राज्यात विशेष मोहीम, मतदान केंद्रांवर विशेष शिबिरांचं आयोजन, तारखा जाहीर
Tukaram Mundhe : MPSC चौकशी समिती संदर्भात माझ्याशी अधिकृत पत्रव्यवहार झाला नाही पण चर्चा झालीय, तुकाराम मुंढे अपडेट देत म्हणाले...
तुकाराम मुंढे यांच्याकडून MPSC चौकशी समिती संदर्भात मोठी अपडेट, नेमकं काय म्हणाले?
Jalgaon Accident : काळीज पिळवटून टाकणारी घटना! जळगावात ट्रकची दुचाकीला धडक; 3 महिन्यांच्या चिमुकलीसह एकाच कुटुंबातील 6 जणांचा अंत
काळीज पिळवटून टाकणारी घटना! जळगावात ट्रकची दुचाकीला धडक; 3 महिन्यांच्या चिमुकलीसह एकाच कुटुंबातील 6 जणांचा अंत
Embed widget