एक्स्प्लोर

अभिषेक घोसाळकरांना शिवसेनेतून बडतर्फ करण्याचा निर्णय?

मुंबई : स्वपक्षीय नगरसेवकांविरोधात तक्रार करणं शिवसेना नगरसेवक अभिषेक घोसाळकरांच्या अंगलट येण्याची चिन्हं आहेत. घोसाळकर यांना बडतर्फ करण्यावर वरिष्ठ नेत्यांचं एकमत झाल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. घोसाळकर यांचं पक्षातून निलंबन करावं, या प्रस्तावावर शिवसेनेतील सर्व वरिष्ठ नेत्यांचं एकमत झाल्याची माहिती आहे. मात्र अभिषेक घोसाळकर यांचा माफीनामा आल्यास या निर्णयाचा पुनर्विचार केला जाईल, असंही म्हटलं जातं. अभिषेक यांना माफी मागण्यासाठी उद्यापर्यंत म्हणजे बुधवारपर्यंतची मुदत दिल्याचंही सूत्रांनी सांगितलं आहे. शिवसेनेचे आमदार विनोद घोसाळकर यांचा मुलगा, नगरसेवक अभिषेक घोसाळकर यांच्या तक्रारीमुळे शिवसेनेचेच नगरसेवक शुभा राऊळ, शीतल म्हात्रे आणि अवकाश जाधव यांच्यावर गुन्हा दाखल झाला आहे. त्यामुळे अभिषेक यांनी तक्रार मागे घ्यावी, अन्यथा त्यांच्यावर कडक कारवाई करण्यात येईल, असं शिवसेनेकडून सांगण्यात आलं होतं.

..अन्यथा घोसाळकरांवर कारवाई : शिवसेना

ही तक्रार मागे न घेतल्यास, शिवसेनेकडून अभिषेक घोसाळकरांना नोटीस पाठवण्यात येणार होती. कारवाई करण्यात येईल अशी तंबी पक्षाकडून मिळाल्यानंतर अभिषेक घोसाळकरांना एकाएकी अस्वस्थ वाटू लागलं आणि ते हॉस्पिटलमध्ये दाखल झाले. कायदा तुडवणाऱ्यांना धडा शिकवण्यासाठी आपण हे पाऊल उचलल्याचं घोसाळकरांनी स्पष्ट केलं. मुंबई महापालिकेचा वॉर्ड क्रमांक 1 आणि वॉर्ड क्रमांक 8 मधल्या उमेदवारीवरून हा सगळा राजकीय ड्रामा रंगल्याचं समजतं. घोसाळकर आणि इतर शिवसेना नगरसेवकांमधल्या गटबाजीमुळं, शिवसेनेला दहिसरमधली विधानसभेची जागा गमवावी लागली होती. या तक्रारीमुळे तिन्ही उमेदवारांची उमेदवारी धोक्यात आली. मुंबई महापालिका निवडणुकीत नगरसेवकांची संख्या कमी होऊ नये म्हणून पक्षप्रमुखांची डोकेदुखी वाढली आहे.

काय आहे प्रकरण?

दहिसरच्या एलआयसी कॉलनीत एक खासगी उद्यान पालिकेने ताब्यात घेतलं आहे. या उद्यानाचं नूतनीकरण करण्यात आलं. त्यासाठी माजी महापौर, नगरसेविका शुभा राऊळ, शिवसेनेचे नामनिर्देशित नगरसेवक अवकाश जाधव यांचा नगरसेवक निधी, तर आमदार रामदास कदम यांचा आमदार निधी वापरण्यात आला. कर्मयोग उद्यान नावाने हे सर्वश्रुत आहे. या उद्यानाचं 10 जानेवारीला उद्घाटन झालं. मात्र आचारसंहिता जारी झाल्यानंतर काही दिवसांनी, म्हणजेच 14 जानेवारीला मकरसंक्रांतीचं औचित्य साधून या परिसरातील सामाजिक संस्था आणि स्थानिक रहिवाशांनी कर्मयोग उद्यानात स्नेहसंमेलनाचे आयोजन केले होते.

घोसाळकरांनी करुन दाखवलं, शिवसेनेच्या तीन नगरसेवकांवर गुन्हा!

या कार्यक्रमाला शुभा राऊळ यांच्याबरोबर नगरसेविका शीतल म्हात्रे आणि अवकाश जाधव यांना आमंत्रित करण्यात आलं होतं. पण शिवसेनेचे नगरसेवक अभिषेक घोसाळकर यांचा या सर्व प्रकाराला आक्षेप होता.  आचारसंहिता लागू असताना या कार्यक्रमात कर्मयोग उद्यानाचे उद्घाटन करण्यात आलं, असा दावा शिवसेनेचे नगरसेवक अभिषेक घोसाळकर यांनी केला होता. निवडणुका जाहीर झाल्यानंतर उद्यानाचे उद्घाटन झाल्यामुळे आचारसंहितेचा भंग झाला आहे. या कार्यक्रमात उपस्थित असलेल्यांविरुद्ध कारवाई करावी, अशी मागणी घोसाळकर यांनी केली होती.

प्रतिमा मलिन करण्याचा प्रयत्न, माजी महापौर शुभा राऊळ यांचं पत्र

आचारसंहिता भंग केल्याप्रकरणी गुन्हा दाखल झाल्यानंतर शुभा राऊळ यांनी महापालिका आयुक्तांकडे धाव घेतली. अधिकार नसताना महापालिकेच्या सहाय्यक आयुक्तांनी गुन्हे दाखल केल्याचं पत्र राऊळ यांनी लिहिलं. मतदारसंघातील आमची प्रतिमा मलिन करण्याचा जाणीवपूर्वक प्रयत्न केला जात आहे, असा दावा शुभा राऊळ यांनी महापालिका आयुक्तांना लिहिलेल्या पत्रात केला. संबंधित अधिकाऱ्यांना आपल्यावर गुन्हा दाखल करण्याचे अधिकार नसल्याचं राऊळ यांनी पत्रात म्हटलं आहे.

महत्त्वाच्या बातम्या

नागरिकांच्या आरोग्याशी तडजोड होणार नाही, संशय आल्यास ग्राहकांनी थेट टोल फ्री क्रमांकर तक्रार करावी : तुकाराम मुंढे
नागरिकांच्या आरोग्याशी तडजोड होणार नाही, संशय आल्यास ग्राहकांनी थेट टोल फ्री क्रमांकर तक्रार करावी : तुकाराम मुंढे
Tukaram Mundhe: ॲनालॉग पनीर काय आहे, 1 वर्षांनंतरही बंदी वाढवणार का? तुकाराम मुंढेंनी सगळं सांगितलं, म्हणाले, आरोग्याशी तडजोड नाही
ॲनालॉग पनीर काय आहे, 1 वर्षांनंतरही बंदी वाढवणार का? तुकाराम मुंढेंनी सगळं सांगितलं, म्हणाले, आरोग्याशी तडजोड नाही
Video: जय पवार धनंजय मुंडेंची पक्षातून हकालपट्टी करतील का? महिला सन्मानाचा मुद्दा सांगत म्हणत करुणा शर्मांचा सवाल
Video: जय पवार धनंजय मुंडेंची पक्षातून हकालपट्टी करतील का? महिला सन्मानाचा मुद्दा सांगत म्हणत करुणा शर्मांचा सवाल
Sanjay Raut on Bankipur By-election Result: कुत्रा-मांजराला उभे केले तरी लोक निवडून देतील, हा अहंकार लोकांनी मोडून काढला; बांकीपूर पोटनिवडणुकीवरून संजय राऊतांचा भाजपवर घणाघात
कुत्रा-मांजराला उभे केले तरी लोक निवडून देतील, हा अहंकार लोकांनी मोडून काढला; बांकीपूर पोटनिवडणुकीवरून संजय राऊतांचा भाजपवर घणाघात

व्हिडीओ

Sunil Tatkare On Congress : काँग्रेसने वैचारिक दिवाळखोरी दाखवली; सुनील तटकरेंचा घणाघाती हल्ला
Mumbai Police Salary Scam | पोलिसात ‘घुसखोरी’ पगारात चोरी | ABP Majha Special Report
Congress On Sunetra Pawar : गूंगी गुडियाचा टोला, वाद विकोपाला | Special Report ABP Majha
Ketan Agarwal Case Update : सियाचं कांड, लग्नाआधीच गुप्तहेरांना डिमांड | Special Report ABP Majha
Sanjay Raut Delhi PC : बिहारमधील निकालावरून संजय राऊतांचा भाजपवर हल्लाबोल

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
आता तर विधिमंडळ पक्ष दुसऱ्याच राजकीय पक्षात विलीन होत आहेत, लोकशाही मूल्यांचे रक्षण कसे करायचे, याचा निर्णय तुम्हालाच घ्यावा लागेल; कपिल सिब्बलांची 'सर्वोच्च' साद
आता तर विधिमंडळ पक्ष दुसऱ्याच राजकीय पक्षात विलीन होत आहेत, लोकशाही मूल्यांचे रक्षण कसे करायचे, याचा निर्णय तुम्हालाच घ्यावा लागेल; कपिल सिब्बलांची 'सर्वोच्च' साद
इकडं जंतर मंतरवर विद्यार्थ्यांना अमानुष मारहाण, राम मंदिर लुटीवर चर्चेसाठी विरोधक एकवटले अन् तिकडं संसदेत पराभव होऊन सुद्धा केंद्र सरकार मतदारसंघ पुनर्रचना विधेयक पुन्हा आणण्याच्या तयारीत
इकडं जंतर मंतरवर विद्यार्थ्यांना अमानुष मारहाण, राम मंदिर लुटीवर चर्चेसाठी विरोधक एकवटले अन् तिकडं संसदेत पराभव होऊन सुद्धा केंद्र सरकार मतदारसंघ पुनर्रचना विधेयक पुन्हा आणण्याच्या तयारीत
Tukaram Mundhe: ॲनॉलॉग पनीर काय आहे, 1 वर्षांनंतरही बंदी वाढवणार का? तुकाराम मुंढेंनी सगळं सांगितलं, म्हणाले, आरोग्याशी तडजोड नाही
ॲनॉलॉग पनीर काय आहे, 1 वर्षांनंतरही बंदी वाढवणार का? तुकाराम मुंढेंनी सगळं सांगितलं, म्हणाले, आरोग्याशी तडजोड नाही
Mumbai Mayor Bunglow : मुंबई महापालिकेचा नव्या टेंडरमुळे वादंग; टीकेची झोड उठताच महापौर रितू तावडेंचं स्पष्टीकरण, म्हणाल्या महापौर बंगल्याचा चुकून उल्लेख
मुंबई महापालिकेचा नव्या टेंडरमुळे वादंग; टीकेची झोड उठताच महापौर रितू तावडेंचं स्पष्टीकरण, म्हणाल्या महापौर बंगल्याचा चुकून उल्लेख
FDA Raid Analog Paneer: संभाजीनगरमधील डेअरीवर एफडीएची धाड, ड्रममध्ये भरलेलं पनीर अन् तूप सापडलं, किळस आणणारे फोटो
संभाजीनगरमधील डेअरीवर एफडीएची धाड, ड्रममध्ये भरलेलं पनीर अन् तूप सापडलं, किळस आणणारे फोटो
वाल्मिक कराडला नागपूर कारागृहात पाठवा, पोलिसांवरही गुन्हे दाखल करा; सुप्रिया सुळेंची CM फडणवीसांकडे मागणी
वाल्मिक कराडला नागपूर कारागृहात पाठवा, पोलिसांवरही गुन्हे दाखल करा; सुप्रिया सुळेंची CM फडणवीसांकडे मागणी
Rahul Gandhi on Amit Shah: विद्यार्थ्यांचे गुन्हेगार असल्यानेच अमित शाह तोंड लपवत आहेत; गृहमंत्री संसदेत येत नसल्याने राहुल गांधींचा हल्लाबोल
विद्यार्थ्यांचे गुन्हेगार असल्यानेच अमित शाह तोंड लपवत आहेत; गृहमंत्री संसदेत येत नसल्याने राहुल गांधींचा हल्लाबोल
Babasaheb Patil Farmer Loan Waiver : ठरलेली तारीख उजाडली, पण शेतकऱ्यांच्या खात्यात कर्जमाफीचे पैसे जाण्यात नवीन अडचण, मंत्र्यांनी सांगितलं कारण
ठरलेली तारीख उजाडली, पण शेतकऱ्यांच्या खात्यात कर्जमाफीचे पैसे जाण्यात नवीन अडचण, मंत्र्यांनी सांगितलं कारण
Embed widget