एक्स्प्लोर
Advertisement
(Source: ECI/ABP News/ABP Majha)
युतीच्या चर्चेला मुहूर्त, शिवसेना-भाजपची पहिली बैठक उद्या
मुंबई : मुंबई महापालिकेत शिवसेना-भाजप युतीसंदर्भात चर्चेला अखेर मुहूर्त मिळाला आहे. शिवसेना-भाजपची पहिली बैठक उद्या म्हणजेच सोमवारी होणार आहे. सुत्रांनी यासंदर्भात माहिती दिली आहे.
बैठकीला शिवसेनेतर्फे अनिल परब आणि अनिल देसाई उपस्थित राहणार आहेत, तर भाजपकडून आशिष शेलार आणि विनोद तावडे चर्चा करतील. या बैठकीतून कोणता निर्णय निघणार याकडे सर्वांचंच लक्ष लागून राहिलं आहे.
शिवसेना आणि भाजपने युतीबाबत निर्णय घेण्यापूर्वी स्वतंत्रपणे सर्वेक्षण केलं आहे. शिवसेनेच्या सर्व्हेनुसार युती केल्यास पक्षाचं नुकसान होण्याची शक्यता आहे, तर स्वबळावर लढल्यास 30 ते 40 जास्त जागा मिळण्याची शक्यता समोर आली आहे. डिसेंबरच्या शेवटच्या आठवड्यात हा सर्व्हे करण्यात आला होता.
भाजप स्वबळावर लढल्यास अधिक जागा मिळण्याचा अंदाज भाजपच्या सर्वेक्षणात होता. स्वबळावर लढल्यास शंभरच्या आसपास जागा मिळतील असा निष्कर्ष काढण्यात आला आहे. अगदी कमीतकमी म्हणजे 85 जागा तरी निश्चित मिळवता येतील, अशी खात्री भाजपच्या नेत्यांना वाटत आहे. त्यामुळे शिवसेनेशी जागावाटपात नमते घेऊन 100 पर्यंत जागा पदरात पाडून घेण्यापेक्षा सरळ लढत द्यावी, असा भाजपच्या नेत्यांचा कल आहे.
संबंधित बातम्या :
युती केल्यास नुकसान, शिवसेनेच्या सर्वेक्षणातून अंदाज
…म्हणून युतीसाठी नेत्यांचा सावध पवित्रा
महापालिका दुभती गाय नाही, पारदर्शकताच युतीचा मुद्दा : मुख्यमंत्री
दहा महापालिका निवडणुकांसाठी फडणवीसच भाजपचा चेहरा
‘ज्याच्या जास्त जागा त्याचा महापौर’, माझा कट्ट्यावर दानवेंचं स्पष्टीकरण
युतीच्या चर्चेसाठी उद्धव ठाकरेंची सेना मंत्र्यांसोबत तातडीची बैठक
…म्हणून युती गरजेची, खलबतांनंतर मुख्यमंत्र्यांचं स्पष्ट मत
स्वबळावर लढल्यास भाजपला 100+ जागा, पक्षाच्या सर्वेक्षणाचा अंदाज
मुंबई जिंकण्याची स्वप्नं पाहणाऱ्यांची राजकीय थडगी इथेच बांधली: शिवसेना
शिवसेनेसोबत युतीबाबत चर्चा करण्यासाठी भाजपचा पारदर्शी अजेंडा नेमका काय?
‘युती नको, विकास हवा’…ठाण्यात भाजपची पोस्टरबाजी
भाजपच शिवसेनेचा शत्रू नंबर 1, नागपुरात शिवसैनिकांचा सूर
शत्रू कोण हे पाहू नका, लढाईसाठी सज्ज राहा : मुख्यमंत्री
स्थानिक पातळीवर युतीशिवाय जिंकू शकतो, रावसाहेब दानवेंना विश्वास
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
निवडणूक
निवडणूक
सिंधुदुर्ग
निवडणूक
Advertisement