एक्स्प्लोर

शिवरायांच्या ज्या मावळ्यांना मुस्लिम व्हावं लागलं, त्यांचाही मराठा आरक्षणावर अधिकार, कोर्टात युक्तिवाद

शिवाजी महाराजांचे मावळे ज्यांना काही कारणांमुळे मुस्लिम व्हावे लागले त्यांच्याकडे आजही मराठा असल्याचे दाखले आहेत. म्हणून त्यांचाही आरक्षणावर अधिकार आहे, असा अॅड. एजाज नक्वी यांचा युक्तिवाद होता. मात्र आम्ही हे पहिल्यांदाच ऐकत आहोत असे सांगत हायकोर्टाने यावर आश्चर्य व्यक्त केले.

मुंबई : मराठा आरक्षणाला विरोध करणाऱ्या सर्व याचिकाकर्त्यांचा युक्तिवाद अंतिम टप्यात आल्याने आता या प्रकरणी राज्य सरकार बुधवारपासून आपला युक्तिवाद सुरु करण्याची शक्यता आहे. राज्य सरकारच्या वतीने देशाचे माजी अॅटर्नी जनरल मुकुल रोहतगी हे मुख्य युक्तिवाद करणार आहेत. शिवाजी महाराजांचे मावळे ज्यांना काही कारणांमुळे मुस्लिम व्हावे लागले त्यांच्याकडे आजही मराठा असल्याचे दाखले आहेत. म्हणून त्यांचाही आरक्षणावर अधिकार आहे, असा युक्तिवाद करण्यात आला. मात्र आम्ही हे पहिल्यांदाच ऐकत आहोत असे सांगत हायकोर्टाने यावर आश्चर्य व्यक्त केले. दरम्यान, मंगळवारी पाचव्या दिवशी अखेर रझा अकादमीच्या वतीने अॅड. सतीश तळेकर यांनी आपला युक्तिवाद संपवला. राज्यातील मुस्लिम आरक्षणाचा मुद्दा बाजूला ठेवून मराठ्यांना आरक्षण देणं चुकीचं आहे. तसंच राष्ट्रपतींनाच अधिकार असताना राज्य मागास आयोगाने अशाप्रकारे एखाद्या समाजाला आरक्षण देण्याची शिफारस करणं, हेदेखील असंविधानिक असल्याचं त्यांनी म्हटलं आहे. आमचा मराठा आरक्षणाला विरोध नाही, मात्र राज्य सरकार अशा पद्धतीने मराठ्यांना स्वतंत्र वर्गाचा दर्जा देऊ शकत नाही. मुळात मराठा समाज सुरुवातीपासूनच मागास होता. 1952 मध्ये इतर मागासवर्गीयांसोबत मराठा समाजही आरक्षणच्या प्रतीक्षेत होता. मात्र, 1952 नंतर अचानक मराठ्यांना या यादीतून वगळण्यात आले. मराठा हा स्वतंत्र गट स्थापन न करता त्यांचा ओबीसीमध्ये समावेश करावा जेणेकरुन आरक्षणाची टक्केवारी वाढणार नाही आणि ते कायद्याच्या चौकटीतही बसवता येईल, असा युक्तिवाद मंगळवारच्या सुनावणीत राजेळ टेकाळे यांच्या वतीने अॅड. प्रमोद पाटील यांनी हायकोर्टात केला. मुस्लिम मराठ्यांनाही आरक्षणाचा हक्क आहे, असा दावा दुधनाथ सरोज आणि अमीन इद्रीसी या याचिकाकर्त्यांच्या वतीने अॅड. एजाज नक्वी यांनी हायकोर्टात केला. शिवाजी महाराजांचे मावळे ज्यांना काही कारणांमुळे मुस्लिम व्हावे लागले त्यांच्याकडे आजही मराठा असल्याचे दाखले आहेत. म्हणून त्यांचाही आरक्षणावर अधिकार आहे, असा नक्वी यांचा युक्तिवाद होता. मात्र आम्ही हे पहिल्यांदाच ऐकत आहोत असे सांगत हायकोर्टाने यावर आश्चर्य व्यक्त केले. आणि एखाद्या व्यक्तीनं धर्मच बदलला असेल त्यांना मराठा कसं म्हणता येईल? असा सवाल हायकोर्टानं उपस्थित केला. न्यायमूर्ती रणजित मोरे आणि न्यायमूर्ती भारती डांगरे यांच्या खंडपीठापुढे बुधवारीही या मराठा आरक्षणासंदर्भातील सुनावणी सुरु राहील.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Uddhav Thackeray : मुंबई तोडता येत नाही म्हणून मोदींच्या मित्राकडून ओरबाडणं सुरू; उद्धव ठाकरेंचा भाजपवर वार
मुंबई तोडता येत नाही म्हणून मोदींच्या मित्राकडून ओरबाडणं सुरू; उद्धव ठाकरेंचा भाजपवर वार
Priyanka Gandhi : भाजप कार्यकर्त्यांना निवडणुकीच्या शुभेच्छा पण जिंकणार महाविकास आघाडीच, महाराष्ट्र की जय : प्रियांका गांधी
भाजप कार्यकर्त्यांनी पक्षाचे झेंडे दाखवले, प्रियांका गांधी नमस्कार करत म्हणाल्या महाविकास आघाडीच जिंकणार
Ashok Chavan : पैशाच्या जोरावर निवडणूक लढवत नाही, रेवंत रेड्डींकडून पक्षनिष्ठेचे धडे मला घेण्याची गरज नाही, अशोक चव्हाण यांचा पलटवार
पैशाच्या जोरावर निवडणूक लढवत नाही, तेलंगणाचा पैसा महाराष्ट्रात आलाय, अशोक चव्हाण यांचा रेवंत रेड्डींवर पलटवार
Land Scam News : 224 एकर जमीन हडपली, 75 एकर उद्योगपतीला भाड्याने दिली; हातकणंगलेतील जमीन घोटाळ्यात आतापर्यंत काय काय झालं?
224 एकर जमीन हडपली, 75 एकर उद्योगपतीला भाड्याने दिली; हातकणंगलेतील जमीन घोटाळ्यात आतापर्यंत काय काय झालं?
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Sadabhau Khot on Jayant Patil : मुख्यमंत्रिपदावरुन सदाभाऊंनी उडवली जयंत पाटलांची खिल्ली, म्हणाले...Uddhav Thackeray BKC Speech | अमित शाह डोक्याला तेल लावा, बुद्धी वाढेल, उद्धव ठाकरेंचा भाजपवर वारSpecial Report Baramati Vidhan Sabha : बारामतीत पवारांमध्ये शाब्दिक-इमोशनल युद्ध, कोण मारणार बाजी?Special Report Soybean :आगामी विधानसभेत सोयाबीनचा मुद्दा ठरणार निर्णायक,नेत्यांकडून आश्वासनांचा पाऊस

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Uddhav Thackeray : मुंबई तोडता येत नाही म्हणून मोदींच्या मित्राकडून ओरबाडणं सुरू; उद्धव ठाकरेंचा भाजपवर वार
मुंबई तोडता येत नाही म्हणून मोदींच्या मित्राकडून ओरबाडणं सुरू; उद्धव ठाकरेंचा भाजपवर वार
Priyanka Gandhi : भाजप कार्यकर्त्यांना निवडणुकीच्या शुभेच्छा पण जिंकणार महाविकास आघाडीच, महाराष्ट्र की जय : प्रियांका गांधी
भाजप कार्यकर्त्यांनी पक्षाचे झेंडे दाखवले, प्रियांका गांधी नमस्कार करत म्हणाल्या महाविकास आघाडीच जिंकणार
Ashok Chavan : पैशाच्या जोरावर निवडणूक लढवत नाही, रेवंत रेड्डींकडून पक्षनिष्ठेचे धडे मला घेण्याची गरज नाही, अशोक चव्हाण यांचा पलटवार
पैशाच्या जोरावर निवडणूक लढवत नाही, तेलंगणाचा पैसा महाराष्ट्रात आलाय, अशोक चव्हाण यांचा रेवंत रेड्डींवर पलटवार
Land Scam News : 224 एकर जमीन हडपली, 75 एकर उद्योगपतीला भाड्याने दिली; हातकणंगलेतील जमीन घोटाळ्यात आतापर्यंत काय काय झालं?
224 एकर जमीन हडपली, 75 एकर उद्योगपतीला भाड्याने दिली; हातकणंगलेतील जमीन घोटाळ्यात आतापर्यंत काय काय झालं?
Ind vs Aus 1st test : सरप्राईज! BCCI ने धाडला मेसेज, संघात निवड नाही तरी पठ्ठ्या पर्थ कसोटीत खेळणार, कोणाची घेणार जागा?
सरप्राईज! BCCI ने धाडला मेसेज, संघात निवड नाही तरी पठ्ठ्या पर्थ कसोटीत खेळणार, कोणाची घेणार जागा?
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 17 नोव्हेंबर 2024 | रविवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 17 नोव्हेंबर 2024 | रविवार
Priyanka Gandhi : प्रियांका गांधी यांचा नागपूरमध्ये रोड शो, काँग्रेस- भाजप आमने सामने, कार्यकर्त्यांची घोषणाबाजी
प्रियांका गांधी यांचा नागपूरमध्ये रोड शो, काँग्रेस- भाजप आमने सामने, कार्यकर्त्यांची घोषणाबाजी
Manipur Violence : मणिपुरात पुन्हा रक्तपात, मुख्यमंत्र्यांसह 10 आमदारांच्या घरावर हल्ला; अमित शाह तीन सभा रद्द करून तडकाफडकी दिल्लीत
मणिपुरात पुन्हा रक्तपात, मुख्यमंत्र्यांसह 10 आमदारांच्या घरावर हल्ला; अमित शाह तीन सभा रद्द करून तडकाफडकी दिल्लीत
Embed widget