एक्स्प्लोर

आणखी किती मेजर राणेंचे बलिदान घेणार? : शिवसेना

काश्मीरमध्ये दहशतवाद्यांशी लढताना मुंबईच्या मीरा रोड येथील मेजर कौस्तुभ राणे यांना वीरमरण आले. या पार्श्वभूमीवर आज (शनिवारी) सामनाच्या अग्रलेखातून शिवसेनेने भाजपावर शरसंधान साधल आहे.

मुंबई : ‘शहीदांना श्रद्धांजल्या देणे आणि पुष्पचक्र अर्पण करणे हेच जणू राज्यकर्त्यांचे काम झाले आहे. त्यातच ते समाधानी आहेत. महाराष्ट्रात सांगली, जळगाव जिंकले व राज्यसभेत उपसभापतीपद जिंकले, पण कश्मीरातील दहशतवादावर निर्णायक विजय कधी मिळवणार? आणखी किती मेजर राणेंचे बलिदान घेणार याचे उत्तर द्या मगच 2019 च्या निवडणुकांना सामोरे जा,’ अशा परखड शब्दात शिवसेनेनं भाजप सरकारवर टीका केली आहे. सैनिकांच्या हौतात्म्याची तरी जुमलेबाजी करू नका. सैनिकांच्या बलिदानानंतर डीजे वाजवून गोंधळ घालणाऱ्यांचे राज्य आम्हाला नको असल्याचे सांगत 'सामना'तील अग्रलेखातून शिवसेनेनं भाजपवर बोचरी टीका केली आहे. काश्मीरमध्ये दहशतवाद्यांशी लढताना मुंबईच्या मीरा रोड येथील मेजर कौस्तुभ राणे यांना वीरमरण आले. या पार्श्वभूमीवर आज (शनिवारी) 'सामना'च्या अग्रलेखातून शिवसेनेने भाजपावर शरसंधान साधल आहे. एक नजर 'सामना'च्या अग्रलेखावर :   कश्मीरातील दहशतवादावर निर्णायक विजय कधी मिळवणार? 
  • पाकिस्तानची घुसखोरी सुरूच आहे व त्यांना रोखताना आमचे जवान रोज शहीद होत आहेत. पंतप्रधान मोदी यांचे जवळचे मित्र जगात आहेत. अमेरिकेचे ट्रम्प व रशियाचे पुतीन हे तर खास दोस्त आहेत. पण पुतीन यांच्या रशियातच पाकिस्तानी सैन्याला खास प्रशिक्षण व युद्ध अभ्यास दिला जातो. तोच पाकडा आज आमच्यावर बंदूक ताणून उभा आहे. मोदी हिंदुस्थानची ही भूमिका पुतीन यांना कधी सांगतील काय?
  • देशातील सर्व विरोधकांना धाराशायी केल्याचा आनंद मोदी व त्यांच्या सहकाऱ्यांच्या चेहऱ्यावर आम्हाला दिसतो, पण पाकिस्तानला धाराशायी केल्याचा आनंद हा देश कधी साजरा करणार? तो आनंदोत्सव साजरा करता यावा यासाठीच जनतेने तुम्हाला सिंहासनावर बसवले आहे. मेजर कौस्तुभ राणे, कर्नल महाडिक यांच्यासह शेकडो मराठी जवानांनी मातृभूमीसाठी बलिदान दिले. देशाचे संरक्षण करणे हाच महाराष्ट्राचा पिढीजात धंदा आहे. इतर ‘तागडी’बाज राज्ये फक्त नोटा मोजण्यात व उधळण्यात मग्न असताना शिवरायांचा महाराष्ट्र सीमेवर लढतो व हौतात्म्य पत्करतो. म्हणूनच राष्ट्रीय प्रश्नांवर मत व्यक्त करण्याचा जन्मसिद्ध हक्क आम्हाला प्राप्त झाला आहे.
  • देशाचा ‘जीडीपी’ की काय तो वाढायचा तेव्हा वाढेल, पण त्यामुळे शेतकऱ्यांच्या आत्महत्या आणि सैनिकांची बलिदाने कमी होणार आहेत काय? पैसा फेकून, ई.व्ही.एम. बंद पाडून निवडणुका जिंकणे आता सोपे आहे, पण ‘कौस्तुभच काय, आणखी मुले असती तर तीदेखील देशासाठी दिली असती,’ असे सांगणाऱ्या शहीद कौस्तुभच्या पित्याची हिंमत बाजारात मिळत नाही. ती विकत घेता येत नाही.
  • पाकिस्तानात सत्तापालट झाला आहे व हिंदुस्थानविरुद्ध सतत गरळ ओकणाऱ्या इम्रान खानचे म्हणजे तेथील सैतानी लष्करशाहीचेच राज्य तेथे आले आहे. हिंदुस्थानशी सतत युद्धाची भाषा करणे व कश्मीरात असंतोष निर्माण करणे हीच पाक सैन्याची रोजीरोटी आहे. मग कश्मीर वाचवणे व सैनिकांची रोजची बलिदाने वाचविणे हे आपल्या राज्यकर्त्यांचे कर्तव्य नाही काय?
  • महाराष्ट्रात सांगली, जळगाव जिंकले व राज्यसभेत उपसभापतीपद जिंकले, पण कश्मीरातील दहशतवादावर निर्णायक विजय कधी मिळवणार? आणखी किती मेजर राणेंचे बलिदान घेणार याचे उत्तर द्या व २०१९ च्या निवडणुकांना सामोरे जा. सैनिकांच्या हौतात्म्याची तरी जुमलेबाजी करू नका. सैनिकांच्या बलिदानानंतर डी.जे. वाजवून गोंधळ घालणाऱ्यांचे राज्य आम्हाला नकोय, तसे नक्राश्रू ढाळणाऱ्यांचेही नको! मग कुणी काय समजायचे ते समजो.

महत्त्वाच्या बातम्या

Samadhan Sarvankar On Shivsena UBT Vishakha Raut: व्यवसाय मजूर-घरकाम...बाप रे?; विशाखा राऊतांचं जात वैधता प्रमाणपत्र रद्द झाल्यानंतर समाधान सरवणकरांचा आणखी एक आरोप
व्यवसाय मजूर-घरकाम...बाप रे?; विशाखा राऊतांचं जात वैधता प्रमाणपत्र रद्द झाल्यानंतर समाधान सरवणकरांचा आणखी एक आरोप
Mumbai Crime News : मेसेज करून भेटण्यासाठी बोलावलं; हात पकडून जबरदस्तीने मिठी मारण्याचा प्रयत्न केला अन्...; नराधम शिक्षकाच्या कृतीनंं मुंबई हादरली
मेसेज करून भेटण्यासाठी बोलावलं; हात पकडून जबरदस्तीने मिठी मारण्याचा प्रयत्न केला अन्...; नराधम शिक्षकाच्या कृतीनंं मुंबई हादरली
BMC Fellowship Programme: 61 हजार 500 रुपये मानधनासाठी तरुणाईची गर्दी; 50 जागांसाठी अडीच हजार तरुणांची रुची, BMC फेलोशिपला डॉक्टर, इंजिनिअरसह उच्चशिक्षितांचाही प्रतिसाद
61 हजार 500 रुपये मानधनासाठी तरुणाईची गर्दी; अवघ्या 50 जागांसाठी अडीच हजार तरुणांची रुची, महापालिका फेलोशिपला डॉक्टर, इंजिनिअरसह उच्चशिक्षितांचाही प्रतिसाद
Share Market News : शेअर बाजारात 'देसी दम'! म्युच्युअल फंड, किरकोळ गुंतवणूकदारांचा दबदबा वाढला, परदेशी गुंतवणूकदारांना टाकले मागे
शेअर बाजारात 'देसी दम'! म्युच्युअल फंड, किरकोळ गुंतवणूकदारांचा दबदबा वाढला, परदेशी गुंतवणूकदारांना टाकले मागे

व्हिडीओ

Mahabaleshwar Tourist News: धुक्यात हरवलं महाबळेश्वर; सह्याद्रीच्या हिरवाईने पर्यटकांना घातली भुरळ
Abhijeet Dipke On School : शाळेत धडक, नियम किती कडक? | Special Report ABP Majha
Prithviraj Chavan On NCP : पृथ्वीराज चव्हाणांचा दावा, तापली राजकीय हवा | Special Report ABP Majha
Anganwadi Sevika : पोषण आहाराचं वास्तव, अन्याय कारवाईचा विस्तव | Special Report ABP Majha
Vishakha Raut BMC : नगरसेवक पद धोक्यात, कुणबी प्रमाणपत्र रद्द; विखाशा राऊत काय म्हणाल्या? | ABP Majha Marathi News

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Sugar Import: मोठी बातमी! सणासुदीच्या काळात साखरेचा गोडवा कायम राहणार; केंद्र सरकारच मोठं पाऊल, 10 लाख मेट्रिक टन साखरेच्या शुल्कमुक्त आयातीला परवानगी
मोठी बातमी! सणासुदीच्या काळात साखरेचा गोडवा कायम राहणार; केंद्र सरकारच मोठं पाऊल, 10 लाख मेट्रिक टन साखरेच्या शुल्कमुक्त आयातीला परवानगी
Who Is Medhavi Bidhuri: विकेट घेताच 'Gen-Z' स्टाईलमध्ये जल्लोष अन् रातोरात सोशल मीडियात व्हायरल झालेली ती दिल्लीची क्विन नेमकी कोण?
विकेट घेताच 'Gen-Z' स्टाईलमध्ये जल्लोष अन् रातोरात सोशल मीडियात व्हायरल झालेली ती दिल्लीची क्विन नेमकी कोण?
Kolhapur News: सत्ताधारी नगरसेविकेच्या विनयभंग तक्रारीमुळे कोल्हापुरात खळबळ; वारंवार अश्लील शिवीगाळ करून धमकी दिल्याचा आरोप
सत्ताधारी नगरसेविकेच्या विनयभंग तक्रारीमुळे कोल्हापुरात खळबळ; वारंवार अश्लील शिवीगाळ करून धमकी दिल्याचा आरोप
Mumbai Crime News : मेसेज करून भेटण्यासाठी बोलावलं; हात पकडून जबरदस्तीने मिठी मारण्याचा प्रयत्न केला अन्...; नराधम शिक्षकाच्या कृतीनंं मुंबई हादरली
मेसेज करून भेटण्यासाठी बोलावलं; हात पकडून जबरदस्तीने मिठी मारण्याचा प्रयत्न केला अन्...; नराधम शिक्षकाच्या कृतीनंं मुंबई हादरली
Accident: लेकाच्या सहाव्या वाढदिवसाला ऑर्केस्ट्रा ठेवला अन् त्याच कार्यक्रमात भरधाव बस घुसली, बापासह पाच जणांचा चिरडून जीव गेला, 12 जण जखमी
लेकाच्या सहाव्या वाढदिवसाला ऑर्केस्ट्रा ठेवला अन् त्याच कार्यक्रमात भरधाव बस घुसली, बापासह पाच जणांचा चिरडून जीव गेला, 12 जण जखमी
Chhatrapati Sambhajinagar News : गेल्या वर्षीही कुणाल जीवन संपवण्यासाठी पोहोचलेला खवड्या डोंगरावर; तेव्हा मनधरणी केली पण यावेळी...; संभाजीनगरमधील त्रिकुटाच्या मृत्यू प्रकरणात हादरवणारी माहिती समोर
गेल्या वर्षीही कुणाल जीवन संपवण्यासाठी पोहोचलेला खवड्या डोंगरावर; तेव्हा मनधरणी केली पण यावेळी...; संभाजीनगरमधील त्रिकुटाच्या मृत्यू प्रकरणात हादरवणारी माहिती समोर
Rahul Gandhi Chhatron Ki Goonj: पुण्यात राहुल गांधींच्या ‘छात्रों की गूंज’ची जोरदार तयारी; बाराशे पोलिसांचा बंदोबस्त, कसा असणार कार्यक्रम? A टू Z माहिती
पुण्यात राहुल गांधींच्या ‘छात्रों की गूंज’ची जोरदार तयारी; बाराशे पोलिसांचा बंदोबस्त, कसा असणार कार्यक्रम? A टू Z माहिती
IND vs SL 2nd Test : कुलदीप यादव OUT, एका खेळाडूचं पदार्पण; श्रीलंकेविरुद्धच्या दुसऱ्या कसोटी सामन्यात अशी असेल टीम इंडियाची Playing XI
कुलदीप यादव OUT, एका खेळाडूचं पदार्पण; श्रीलंकेविरुद्धच्या दुसऱ्या कसोटी सामन्यात अशी असेल टीम इंडियाची Playing XI
Embed widget