एक्स्प्लोर

Shiv Sena : शिंदे गट दादरमध्ये प्रति सेनाभवन उभारणार, प्रत्येक प्रभागात असणार कार्यालय

Shiv Sena : मुंबईतील लोकांच्या समस्या सोडवण्यासाठी दादरमध्ये शिंदे गटाचे मुख्य कार्यालय उभारण्यात येणार असून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे स्वत: या कार्यालयातून जनतेच्या समस्या जाणून घेणार आहेत.

मुंबई : शिंदे गटाकडून दादरमध्ये प्रति सेनाभवन (Shiv Sena) उभारण्यात येणार आहे.  शिंदे गटाचे आमदार सदा सरवणकर (Sada Sarvankar) यांनी याबाबत माहिती दिली आहे. यासोबतच शिंदे गटाकडून प्रत्येक प्रभागामध्ये वेगळं कार्यालय उभारण्यात येणार आहे. परंतु, याबाबत बोलताना सरवणकर यांनी हे प्रतिसेना भवन नसून ते मुंबईतील लोकांच्या समस्या सोडवण्यासाठी कार्यालय उभारण्यात येणार असल्याची माहिती दिली आहे. 

मुंबईतील लोकांच्या समस्या सोडवण्यासाठी दादरमध्ये शिंदे गटाचे मुख्य कार्यालय उभारण्यात येणार असून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे स्वत: या कार्यालयातून जनतेच्या समस्या जाणून घेणार आहेत. याबरोबरच मुंबईतील प्रत्येक प्रभागामध्ये असंच एक कार्यालय उभारण्यात येणार आहे.  येत्या 15 दिवसांमध्ये या कार्यालयाचं उद्घटान होणार आहे. मुंबई शहरातील नागरिकांच्या समस्या सोडवण्यासाठी  हा निर्णय घेण्यात आल्याची माहिती सरवणकर यांनी दिलीय.

या कार्यालयांसाठी जागा निश्चित झाल्या असून त्या- त्या प्रभागातील शाखाप्रमुख नागरिकांच्या समस्या सोडवतील. शिवसेनेचे नेते देखील या कार्यालयांतून नागरिकांच्या समस्या समजून घेतील आणि त्या सोडवण्यासाठी प्रयत्न करतील, अशी माहिती सरवणकर यांनी दिलीय.  

दरम्यान, शिवसेना आणि शिंदे गट यांच्यातील संघर्ष दिवसेंदिवस वाढत असताना आता शिंदे गटाने दादारमध्ये वेगळं कार्यालय उभारण्याचा निर्णय घेतला आहे.  शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी उभारलेलं शिवसेना भवन देखील दादरमध्येच असून आता शिंदे गाटने देखील  त्यांचे मुख्य कार्यालय दादरमध्येच उभारण्याचा निर्णय घेतलाय. त्यामुळे शिंदे गट आणि शिवसेनेतील संघर्ष आणखी वाढण्याची शक्यता आहे. मात्र, शिंदे गटाच्या या मुख्य कार्यालयाचे नाव काय असणार याबाबत अध्याप माहिती मिळालेली नाही.  शिंदे गटाच्या या निर्णयामुळे शिवसेनेला थेट आव्हान देण्यात आल्याची चर्चा आता राजकीय वर्तुळात रंगत आहे. 

याबाबत बोलताना सरवणकर म्हणाले, आम्ही शिवसेनेतून बाहेर पडलेलो नाही. आम्ही अद्याप शिवसेनेतच आहोत. त्यामुळे हे प्रतिसेना भवन नसून मुंबई शहरातील नागरिकांच्या समस्या जाणून घेण्यासाठी आणि त्या सोडवण्यासाठी हे कार्यालय असून अशीच कार्यालये प्रत्येक प्रभागात उभारली जातील. दादरमधील उभारण्यात येणारं कार्यालय हे मुख्य कार्यालय असेल. लोकांच्या समस्या समजून घेणे सोपे जावे यासाठी हा निर्णय घेण्यात आला आहे.   

 पुण्यात देखील होणार प्रति शिवसेना भवन 

मुंबई पाठोपाठ पुण्यात देखील प्रति शिवसेना भवनहोणार आहे. शहराध्यक्ष नाना भानगिरे यांनी याबाबत माहिती दिली आहे.  श्रावणात या सेना भवनची पूजा होणार आहे. पुण्यातील बालगंधर्व चौकात सेना भवन होणार आहे.  

महत्वाच्या बातम्या

BJP : भाजपची नवी कार्यकारिणी जाहीर, चंद्रशेखर बावनकुळे यांच्याकडे प्रदेशाध्यक्षपदाची तर आशिष शेलार यांच्याकडे मुंबईची जबाबदारी 

विधानसभेच्या सल्लागार समितीमध्ये ठाकरे गटाला संधी का नाही? विधानसभा अध्यक्ष म्हणाले... 

 

महत्त्वाच्या बातम्या

Asim Sarode On Shivsena Name And Symbol Hearing Supreme Court: तोच कागदोपत्री पुरावा आता एकनाथ शिंदेंसाठी अडचण ठरणार; शिवसेना सुनावणीवर असीम सरोदे यांचं मोठं विधान, सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडलं?
तोच कागदोपत्री पुरावा आता एकनाथ शिंदेंसाठी अडचण ठरणार; शिवसेना सुनावणीवर असीम सरोदे यांचं मोठं विधान, सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडलं?
Ashram School Student Deaths: आदिवासी आश्रमशाळा की 'मृत्यूचा सापळा'? दोन वर्षांत राज्यात तब्बल 584 विद्यार्थ्यांचा मृत्यू; धक्कादायक आकडेवारी समोर
आदिवासी आश्रमशाळा की 'मृत्यूचा सापळा'? दोन वर्षांत राज्यात तब्बल 584 विद्यार्थ्यांचा मृत्यू; धक्कादायक आकडेवारी समोर
Mumbai Taj Lands End vs BMC: ताज लँड्स एंडच्या टॅक्सवरून BMC-Tata पुन्हा आमने-सामने; ताज लँड्स एंडवर BMCचा 103 कोटींचा दंड, नेमकं प्रकरण काय?
ताज लँड्स एंडच्या टॅक्सवरून BMC-Tata पुन्हा आमने-सामने; ताज लँड्स एंडवर BMCचा 103 कोटींचा दंड, नेमकं प्रकरण काय?
पाऊस पडणार की नाही? 'या' 27 जिल्ह्यांसाठी पुढचे पाच दिवस अत्यंत महत्वाचे, मुंबईसह कोकण विदर्भ ते मराठवाडा कसं असणार हवामान? 
पाऊस पडणार की नाही? 'या' 27 जिल्ह्यांसाठी पुढचे पाच दिवस अत्यंत महत्वाचे, मुंबईसह कोकण विदर्भ ते मराठवाडा कसं असणार हवामान? 

व्हिडीओ

Shiv Sena SC Hearing Special Report : निवडणूक आयोगावर गंभीर आरोप..शिवसेनेच्या सुनावणीत काय घडलं?
Majha Vishesh:व्हेज-नॉनव्हेजचा ते शुद्धीकरणावरुन काँग्रेस विरुद्ध भाजप,माझा विशेषमध्ये आज काय विशेष?
Buldhana Khamgaon Ajji on FDA : तुकाराम मुंढेंना विनंती करणाऱ्या खामगावातील व्हायरल आजी 'माझा'वर
Sanjay Raut on Amit Shah: अमित शाहांना तातडीने उपपंतप्रधान व्हायचंय, पण मोदींनी नकार दिलाय
Manoj Jarange Patil: आआथातू अरअरअर...अ‍ॅक्शन केली, डायलॉग बोलले; जरांगेंनी बावनकुळेंची बाहुबलीमधील कालकेयशी केली तुलना

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Sri Lankan Coach News : श्रीलंकेच्या खेळाडूने संघाच्या कोचला संपवलं; पोलिसांकडून क्रिकेटपटूला अटक, टीम इंडियाच्या कसोटी सामन्याआधी खळबळ, नेमकं काय घडलं?
श्रीलंकेच्या खेळाडूने संघाच्या कोचला संपवलं; पोलिसांकडून क्रिकेटपटूला अटक, टीम इंडियाच्या कसोटी सामन्याआधी खळबळ, नेमकं काय घडलं?
Nagpur SIR News: सव्वादोन लाख मतदार मृत, साडेचार लाख कायमस्वरूपी स्थलांतरित; नागपुरमध्ये मतदार यादीच्या SIR प्रक्रियेत धक्कादायक माहिती
सव्वादोन लाख मतदार मृत, साडेचार लाख कायमस्वरूपी स्थलांतरित; नागपुरमध्ये मतदार यादीच्या SIR प्रक्रियेत धक्कादायक माहिती
Share Market: निफ्टी 50 सलग तिसऱ्या सत्रात घसरला; सेन्सेक्स 0.15 टक्के वाढीसह बंद
Share Market: निफ्टी 50 सलग तिसऱ्या सत्रात घसरला; सेन्सेक्स 0.15 टक्के वाढीसह बंद
Solapur Crime News : झोपेतून उठवल्याचा राग, बिहारी साथिदाराला हातोड्याने वार करुन संपवलं, करमाळ्यातील धक्कादायक घटना
झोपेतून उठवल्याचा राग, बिहारी साथिदाराला हातोड्याने वार करुन संपवलं, करमाळ्यातील धक्कादायक घटना
BAN vs AUS : बांगलादेशचा बलाढ्य ऑस्ट्रेलियाला दणका,  पहिल्या डावात 200 धावांच्या आत गुंडाळलं, कसोटीचा पहिला दिवस गाजवला 
बांगलादेशचा बलाढ्य ऑस्ट्रेलियाला दणका, पहिल्या डावात 200 धावांच्या आत गुंडाळलं, कसोटीचा पहिला दिवस गाजवला
Bar Council : बार काऊन्सिलनं निर्णय फिरवला, सरन्यायाधीशांना विरोध करणाऱ्या हैदराबाद येथील कायदा पदवीधर विद्यार्थ्यांच्या नोंदणीवरील स्थगिती मागे
बार काऊन्सिलनं निर्णय बदलला, सरन्यायाधीशांना विरोध विद्यार्थ्यांना दिलासा, कायदा पदवीधरांच्या वकील म्हणून नोंदणीचा मार्ग मोकळा 
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 13 ऑगस्ट 2026 | गुरुवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 13 ऑगस्ट 2026 | गुरुवार
Shiv Sena Symbol Case : चंद्रचूड यांच्या घटनापीठाने दिलेल्या शिवसेनेच्या निकालाचा फेरविचार व्हावा, ठाकरेंच्या वकिलांची मोठी मागणी
चंद्रचूड यांच्या घटनापीठाने दिलेल्या शिवसेनेच्या निकालाचा फेरविचार व्हावा, ठाकरेंच्या वकिलांची मोठी मागणी
Embed widget