एक्स्प्लोर
शीना बोरा हत्याकांड: इंद्राणीच्या ड्रायव्हरची माफीचा साक्षीदार होण्याची इच्छा

मुंबई : शीना बोराची हत्या गळा दाबून केली गेल्याची साक्ष आज या प्रकरणातला आरोपी ड्रायव्हर शाम रायनं दिली. तसंच मी शीनाच्या हत्यांकाडात सहभागी होतो, ज्याबाबत मला आज पश्चाताप होत असल्याची कबुलीही त्यानं कोर्टापुढे दिली. मला शीना बोरा हत्याकांडात माफीचा साक्षीदार व्हायची इच्छा असल्याचं पत्र त्यानं शुक्रवारी कोर्टाला लिहिलं होतं. त्यानंतर त्याची साक्ष नोंदवली गेली. त्यामुळे याप्रकरणात आरोपी इंद्राणीसह, पीटर मुखर्जी यांच्या अडचणीत वाढ होण्याची दाट शक्यता आहे. 2012 साली अलिबागच्या जंगल परिसरात शीना बोराचा मृतदेह सापडला होता. मात्र, मृतदेह कुजून गेल्यानं त्याची ओळख पटवण्यात बराच वेळ गेला. अखेर दोन वर्षानंतर तो मृतदेह शीना बोराचा असल्याचं उघड झालं आणि धक्कादायक म्हणजे याप्रकरणी शीनाची आई इंद्राणी मुखर्जी आणि पीटर मुखर्जी मुख्य आरोपी म्हणून समोर आले.
Before You Go
Ashwini Bhide Special Report : अश्विनी भिंडेंना शिवसेनेकडून टार्गेट, भाजप-ठाकरे गटाचा एकच सूर






















