एक्स्प्लोर
Advertisement
शीना बोरा हत्याकांड : पीटरचा हत्याकांडात सहभाग नव्हता, वकिलांचा दावा
निव्वळ इंग्लंडहून आलेल्या 'त्या' फोन कॉल्सवरून इंद्राणीचा पती पीटर मुखर्जीदेखील या हत्याकांडात सामिल आहे, किंवा त्याला या सर्व घटनेची माहीती होती असं सिद्ध होत नाही. असा युक्तिवाद करण्यात आला आहे.
मुंबई : शीना बोरा हत्याकांड प्रकरणी पीटर मुखर्जीनंच इंग्लंडहून ते कॉल्स इंद्राणी मुखर्जीला केले होते कशावरून? असा सवाल उपस्थित करून पीटर मुखर्जीचा या संपूर्ण हत्याकांडात सहभागच नव्हता असा युक्तिवाद पीटरच्या वकिलांनी कोर्टात केला आहे. पीटर मुखर्जीनं सीबीआय कोर्टात दाखल केलेल्या जामीन अर्जावरील सुनावणी दरम्यान हा युक्तिवाद करण्यात आला आहे.
शीनाची हत्या पीटरने केली, इंद्राणी मुखर्जीचा आरोप
ज्या कालावधीत शीनाची हत्या करून तिच्या मृतदेहाची विल्हेवाट लावण्यात आली. त्यादरम्यान इंद्राणी सतत इंग्लंडहून एका लँडलाईनच्या संपर्कात असल्याचे पुरावे तपासयंत्रणेकडे आहेत. मात्र हे कॉल्स पीटर मुखर्जीनेच केले होते याचा काही पुरावा आहे का? असा सवाल पीटरच्यावतीनं उपस्थित करण्यात आलाय. त्याच कालावधीत इंद्राणीची दुसरी मुलगी विधी ही देखील पीटरसोबत इंग्लंडमध्ये होती. कदाचित तिनं आपल्या आईशी बोलण्यासाठी ते फोन कॉल्स केले असावेत, असा दावाही पीटरच्या वकिलांनी मुंबई सत्र न्यायालयात केला. त्यामुळे निव्वळ इंग्लंडहून आलेल्या 'त्या' फोन कॉल्सवरून इंद्राणीचा पती पीटर मुखर्जीदेखील या हत्याकांडात सामिल आहे, किंवा त्याला या सर्व घटनेची माहीती होती असं सिद्ध होत नाही. असा युक्तिवाद करण्यात आला आहे. 2012 मध्ये झालेल्या शीना बोराच्या भीषण हत्याकांडाचा खुलासा साल 2015 मध्ये झाला होता. ज्यात इंद्राणी मुखर्जीचा ड्रायव्हर श्यामवर रायच्या कबूली जबाबानंतर शीनाची आई इंद्राणी मुखर्जी, तिचा पूर्व पती संजीव खन्ना आणि पती पीटर मुखर्जी यांना याप्रकरणी अटक करण्यात आली आहे. या सर्वांविरोधात मुंबई सत्र न्यायालयातील सीबीआय कोर्टात खटला सुरू आहे.शीना बोरा हत्येप्रकरणी इंद्राणी मुखर्जीचं कोर्टात घुमजाव
बड्या लोकांच्या दबावामुळे शीना बोरा हत्येचा तपास 3 वर्षे रखडला: मारिया
शीना बोरा हत्या : सर्व आरोपींवर हत्येचा आरोप निश्चित
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
राजकारण
भारत
महाराष्ट्र
राजकारण
Advertisement